उसाच्या गाळपात बारामतीची आघाडी

उसाच्या गाळपात बारामतीची आघाडी

Published on

पुणे, ता. १८ : जिल्ह्यात ऊस गाळप हंगाम सुरू झाल्यानंतर दोन महिन्यानंतर ६२ लाख २० हजार १२४ टन उसाचे गाळप पूर्ण झाले असून, १०.४१ टक्के साखरेच्या उताऱ्याच्या सरासरीने ५४ लाख ५० हजार ५९९ क्विंटल साखरेचे उत्पादन झाले आहे. जिल्ह्यात विविध तालुक्यातील गाळप हंगाम घेत असलेल्‍या चौदा कारखान्यांमध्ये बारामती तालुक्यातील कारखान्यांनी आघाडी घेतली आहे.
जिल्ह्यात १५ नोव्हेंबरला पाच साखर कारखान्यांकडून गाळप हंगामास सुरुवात झाल्यानंतर टप्प्याने इतर कारखाने सुरू झाले. सर्वात शेवटी ६ डिसेंबर रोजी इंदापूर तालुक्यातील नीरा-भीमा सहकारी कारखान्याकडून हंगाम सुरू करण्यात आला. जिल्ह्यात चौदा कारखाने पूर्ण क्षमतेने उत्पादन करत असून, आत्तापर्यंत नऊ सहकारी साखर कारखान्यांनी ३० लाख ८९ हजार १५५ टन उसाचे गाळप करून १०.३ टक्के सरासरी साखरेच्या उताऱ्याने ३० लाख ९७ हजार ८६५ क्विंटल साखरेचे उत्पादन झाले आहे. तर पाच खासगी साखर कारखान्यांनी आत्तापर्यंत ३१ लाख ३० हजार ९६९ टन उसाचे गाळप केले असून, ७.५१ टक्केच्या साखरेच्या उताऱ्याने २३ लाख ५२ हजार ७३४ साखरेचे उत्पादन घेतले आहे. यामध्ये सहकारी साखर कारखान्यांच्या तुलनेत खासगी साखर कारखान्यांनी अधिक गाळप केले असले, तरी साखरेचे उत्पादन मात्र कमी झाले आहे. इंदापूर तालुक्यातील चार, दौंडमधील तीन, बारामती तालुक्यातील दोन, शिरूरमधील दोन, जुन्नर, आंबेगाव आणि मुळशी तालुक्यातील प्रत्येकी एक कारखाना सुरू आहे. यामध्ये बारामती तालुक्यातील दोन कारखान्यांनी इतरांच्या तुलनेत सर्वाधिक उसाचे गाळप आणि साखरेचे उत्पादन झाले आहे.

पाच साखर कारखान्यांचा साखर उताऱ्याचे टक्केवारी दहाच्या वर
साखर उताऱ्याचे प्रमाण बारामती तालुक्यातील सोमेश्वर सहकारी कारखान्याला सर्वाधिक ११.०३ टक्के साखर उतारा मिळाला आहे. तर, माळेगाव सहकारीने १०.४७ टक्के साखरेचा उताऱ्याने साखरेचे उत्पादन झाले आहे. तर, श्री संत तुकाराम सहकारी कारखान्याला १०.८८ टक्के साखरेचा उतारा मिळाला आहे. विघ्नहर सहकारी १०.२९ टक्के, भिमाशंकर सहकारी १०.३५ टक्के साखरेचा उतारा मिळाला आहे.

जिल्ह्यातील साखर कारखान्यांची आकडेवारी
कारखाना -- ऊस गाळप (टन) -- साखर (क्विंटल)
सोमेश्वर- ५,३७,७९६ -- ५,९७,०५०
माळेगाव- ५,४३,६५० -- ५,६२,५००
छत्रपती- ३,६४,०५५ -- ३,६६,२००
विघ्नहर- २,३९,४६० -- २,४०,१००
कर्मयोगी- १,४५,००५ -- १,३३,९५०
श्री संत तुकाराम-- १,९७,६४० -- २,१५,२७५
भीमाशंकर-- ४,७०,३३० -- ४,८०,८००
नीरा-भीमा -- १,६२,२७० -- १,१७,३४०
भीमा पाटस (साईप्रिया)- ४,२८,९४९- ३,८४,६५०
श्रीनाथ म्हस्कोबा- २,९३,५८०...१,६४,८५५
दौंड शुगर- १०,०९,८२०...७,६०,३५०
व्यंकटेश कृपा- २,८६,७३०...१,९४,५४०
बारामती ॲग्रो- १२,०३,१०३....८,९३,२६५
पराग- ३,३७,७३६....३,३९,७२४

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com