

पुणे, ता. २४: ‘‘‘पुणे बाल पुस्तक जत्रा’सारख्या उपक्रमातून बालमनावर चांगले संस्कार होत असल्याने पुढील वर्षांपासून बाल पुस्तक जत्रेत सांस्कृतिक कार्य विभागातर्फे विविध सांस्कृतिक कार्यक्रम देखील आयोजित करण्यात येतील. मुलांवर चांगले संस्कार व्हावेत आणि त्यांच्या गुणांचा विकास व्हावा यासाठी अशा उपक्रमांचे आयोजन गरजेचे आहे. राज्यात बालसंस्काराचे एक मॉडेल म्हणून हा उपक्रम ओळखला जाईल,’’ असे मत राज्याचे सांस्कृतिक कार्य मंत्री अॅड. आशिष शेलार यांनी व्यक्त केले.
‘राष्ट्रीय पुस्तक न्यास’, ‘पुणे महापालिका’, ‘पुणे पुस्तक महोत्सव’, आणि ‘संवाद पुणे’तर्फे गणेश कला क्रीडा मंच येथे आयोजित ‘पुणे बाल पुस्तक जत्रे’त ते बोलत होते. यावेळी आमदार हेमंत रासने, महापालिका उपायुक्त पृथ्वीराज बी. पी, पुणे पुस्तक महोत्सवाचे संयोजक राजेश पांडे, भाजपचे शहर अध्यक्ष धीरज घाटे, संवाद संस्थेचे संस्थापक संचालक सुनील महाजन, चिंटूकार चारूहास पंडीत आदी उपस्थित होते. बालगोपाळांसाठी आयोजित या जत्रेचा रविवार (ता. २५) हा शेवटचा दिवस आहे. सकाळी १० ते रात्री १० दरम्यान ही जत्रा सर्वांसाठी खुली आहे.
शेलार म्हणाले, ‘‘कृत्रिम बुद्धिमत्तेला वास्तविक बुद्धिमत्तेची जोड दिल्याशिवाय प्रगती साधता येत नाही. मुलांमध्ये अशी बुद्धिमत्ता निर्माण करण्याची क्षमता बाल पुस्तक जत्रेत आहे.’’ तर पृथ्वीराज म्हणाले, ‘‘पुणे महानगरपालिका स्थापनेचे ७५वे वर्ष असल्याने विविध सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित करण्यात येत आहेत. बाल पुस्तक जत्रेला पहिल्याच वर्षी मिळालेला प्रतिसाद पाहता दरवर्षी हे आयोजन करण्यासाठी सहकार्य करण्यात येईल.’’
या महोत्सवात सुमारे ७२ स्टॉल आहेत. त्यामधील ६५ स्टॉल हे पुस्तकांचे असून बाकी इतर उपक्रमांचे आहेत. या दोन दिवसांत सुमारे २५ हजार मुलांनी या जत्रेत सहभाग नोंदविला असून तिथे आलेल्या प्रत्येक चिमुकल्याला ‘हेल्दी किट’ देण्यात आले आहे, अशी माहिती महाजन यांनी दिली. या प्रसंगी जॉर्ज कार्व्हर ल. म. कड, गोष्ट छबीची, अनोखे मित्र कविता मेहेंदळे आणि साने गुरुजी या पुस्तकांचे प्रकाशन शेलार यांच्या हस्ते प्रकाशित झाले.
आम्हाला दोघीनां येथे येऊन खूप मज्जा आली. आम्ही कालही येथे आलेलो, आम्हाला इथून घरी जाऊच वाटत नाही. ही पुस्तक जत्रा दर वर्षी ठेवावे अशी आमची इच्छा आहे. येथे असलेले पुस्तके पाहायला, चाळायला, विकत घेयला आणि घरी जाऊन वाचायला मज्जा येईल. तसेच येथे विविध मैदानी खेळ आहेत जसेकी लगोरी, वीटी दांडू, भोवरा, हे खेळ आम्ही कधी खेळे नव्हते. ते खेळून आम्हाला खुप मज्जा आली. आम्ही इथून १३ पुस्तके घेतली.
- गार्गी वैद्य, रावी पागे पुस्तक महोत्सवात आलेल्या चिमुकल्या.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.