यंदाच्या वैशाख वणव्यावर पावसाचे ‘पाणी’

यंदाच्या वैशाख वणव्यावर पावसाचे ‘पाणी’

Published on

अश्विनी पवार ः सकाळ वृत्तसेवा
पिंपरी, ता. ३१ ः दरवर्षी मे महिन्यातील वैशाख वणव्यात सर्वांगाची नुसती काहिली होत असते. उन्हाच्या तडाख्याने केवल बाहेर फिरणेच नव्हे; तर घरात बसणेही अशक्य होत असते. उन्हाचा तडाखा. मात्र, यावर्षीचा मे महिना मात्र याला अपवाद ठरला आहे. अरबी समुद्रावर तयार झालेल्या कमी दाबाच्या क्षेत्रामुळे या वर्षी मे महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यापासूनच पावसाला सुरुवात झाली. हवामान बदलल्याने एरवी ४० अंश सेल्सिअसच्या घरात नोंदविले जाणारे मे महिन्यातील कमाल तापमान तब्बल १० अंश सेल्सिअसने घसरले. त्यामुळे दरवर्षी शरीराची काहिली करणारा मे महिना थंडगार ठरला आहे.
पुणे वेधशाळेकडून मिळालेल्या आकडेवारीनुसार यापूर्वी २०२१ साली १७ मे रोजी मे महिन्यातील कमाल तापमान २७.८ अंश सेल्सिअस एवढे नोंदविण्यात आले होते. मात्र, त्यानंतरही दुसऱ्याच दिवशी तापमानाचा पारा हा तिशीच्या पुढे गेला होता. या वर्षी मात्र मे महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यातच पूर्वमोसमी पावसाला सुरुवात झाली. त्यामुळे तापमानाचा पारा घसरला. त्यातच मॉन्सूनचेही आगमन दहा दिवस आधीच झाले. त्यामुळे शहरात गेल्या आठवड्यात झालेल्या मुसळधार पावसाने हजेरी लावली. परिणामी कमाल तापमानात कमालीची घट झाली. परिणामी, मे महिन्यात जाणवणारा वैशाख वणवा यंदा जाणवलाच नाही.

गेल्या आठवड्यात पिंपरी-चिंचवडमधील चिंचवड, दापोडी, तळेगाव येथील तापमान सलग तास ते आठ दिवस ३० अंश सेल्सिअसच्या खाली नोंदविण्यात आले होते. जेव्हा उन्हाळ्यात तापमानाचा पारा वर जात असतो, तिथे २२ मे पासून तापमानाचा पारा उतरताना दिसून आला. शेवटच्या आठवडा सोडल्यास इतर दिवशीही चिंचवडचे कमाल तापमान ३२ ते ३६ अंश सेल्सिअसच्या आसपास नोंदविण्यात आले. त्यामुळे यंदाचा मे महिना थोडाफार सुसह्य ठरला असे म्हटल्यास वावगे ठरणार नाही. दरम्यान नजीकच्या काळात सलग सात ते आठ दिवस ऐन उन्हाळ्यात कमाल तापमान ३० अंश सेल्सिअसच्या खाली नोंदविण्यात आले नसल्याचेही हवामान शास्त्रज्ञांनी सांगितले आहे.

चिंचवडचे तापमान अंश सेल्सिअसमध्ये
तारीख ः किमान ः कमाल
२२ मे ः २४ ः २९.१
२३ मे ः २३.१ ः २६.१
२४ मे ः २१.५ ः २७.२
२५ मे ः २२.५ ः २७.१
२६ मे ः २२.१ ः २७.४
२७ मे ः २२.० ः २३.७
२८ मे ः २२.३ ः २९.१


‘पूर्वमोसमी पावसामुळे एखाद्या दिवशी तापमान कमी होऊ शकते. मात्र, हवामान बदलामुळे तसेच मॉन्सून लवकर सक्रिय झाल्याने या वर्षी मे महिन्यात महिन्यात सलग सात दिवस तापमानात मोठी घट झाली. नजीकच्या काळातील आकडेवारी पाहिली तर मे महिन्यातील कमाल तापमान एवढ्या खाली उतरल्याची नोंद दिसत नाही.’
- डॉ. अनुपम काश्‍यपी, माजी हवामान प्रमुख, पुणे वेधशाळा

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com