शंकरराव पाटील चॅरिटेबल ट्रस्टतर्फे ‘सद्गुणांचा गुढीपाडवा’ ''सद्गुणांचा गुढीपाडवा उपक्रमाने दिला समाजाला प्रेरणादायी संदेश"

शंकरराव पाटील चॅरिटेबल ट्रस्टतर्फे ‘सद्गुणांचा गुढीपाडवा’
''सद्गुणांचा गुढीपाडवा उपक्रमाने दिला समाजाला प्रेरणादायी संदेश"
Published on

इंदापूर, ता. ३० : इंदापूर येथे हिंदू नववर्षाच्या स्वागतार्थ शंकरराव पाटील चॅरिटेबल ट्रस्टच्या वतीने ‘सद्गुणांचा गुढीपाडवा’ या उपक्रमाचे आयोजन केले होते. संस्थेच्या अध्यक्षा श्रीमती पद्माताई भोसले, सचिव डॉ. गिरीश देसाई, खजिनदार तुषार रंजनकर व विश्वस्त अरविंद गारटकर यांच्या मार्गदर्शनाखाली संस्थेच्या कार्यालयात करण्यात आले.

हिंदू नववर्षाच्या मुहूर्तावर आयोजित उपक्रमात उपस्थित सर्वांनी एकत्र येऊन ‘सद्गुणांची माला’ गुढीवर घातली. या अभिनव संकल्पनेच्या माध्यमातून समाजाला एक प्रेरणादायी संदेश देण्यात आला. जीवनात सद्गुणांचा स्वीकार करून एक आदर्श आणि सुसंस्कृत समाज घडविणे हेच आपल्या परंपरांचे खरे सार आहे. गुढीपाडव्याच्या सणात प्रथा आणि परंपरा असतात, परंतु या उपक्रमात गुढीला विविध सद्गुणांची माला घालून त्या सद्गुणांची जाणीव करून देण्यात आली.

या सद्गुणांच्या मालेत प्रामाणिकपणा, करुणा, धैर्य, सहकार्य, सत्य, अहिंसा आणि प्रेम यांसारख्या मूल्यांचे महत्त्व अधोरेखित करण्यात आले. उपक्रमाच्या माध्यमातून संस्थेने समाजातील प्रत्येक घटकाला आपले जीवन अधिक साधक आणि गुणकारी कसे बनवता येईल, याचा विचार करण्यास प्रवृत्त केले. मराठी नववर्षाच्या प्रारंभाचा हा शुभसंकेत सकारात्मक विचारांचा प्रसार करणारा ठरला. या उपक्रमामुळे उपस्थितांना जीवनात सद्गुणांचा समावेश करून एक आदर्श समाज निर्माण करण्याची प्रेरणा मिळाली.

दरम्यान, कार्यक्रमासाठी संस्थेचे खजिनदार तुषार रंजनकर, विश्वस्त अरविंद गारटकर, मीनल रंजनकर, यश रंजनकर, सई रंजनकर, इन्चार्ज दीपक जगताप तसेच संस्थेचे सर्व कर्मचारी आणि विद्यार्थी उपस्थित होते.

02180

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com