बापू दिनकर कातळे (प्रभाग क्र.१६) ः जनसेवेचा ध्यास असलेले युवा नेतृत्व
बापू दिनकर कातळे (प्रभाग क्र.१६)
जनसेवेचा ध्यास असलेले युवा नेतृत्व
इंट्रो ः शहरातील किवळे परिसरात विधायक विचारांचा संकल्प अंगी बाणणारे, आरोग्य, शैक्षणिक, क्रीडा, धार्मिक, सामाजिक, राजकीय क्षेत्रांत अथक परिश्रम करणारे युवा नेतृत्व म्हणजे बापू दिनकर कातळे. किवळे व परिसराच्या सर्वांगीण विकासाबरोबरच समाजमन घडविण्यासाठी त्यांनी केलेले कार्य विशेष उल्लेखनीय ठरते. त्यांच्या नेतृत्वाखालील उपक्रमांमुळे केवळ पायाभूत सुविधाच नव्हे; तर संस्कार, आरोग्य आणि संस्कृतीचेही जतन होत आहे. आपल्या नवीन संकल्पना निःस्वार्थीपणे मांडून परिसराचे चित्र पालटण्याचा निर्धार त्यांनी केला आहे. 
------------------
बापू दिनकर कातळे यांना धार्मिक आणि सामाजिक बांधिलकीचा वारसा लाभला आहे. समाजातील विविध क्षेत्रांतील आणि घटकांची गरज लक्षात घेऊन संकल्प फाउंडेशन या समाजोपयोगी संस्थेची स्थापना त्यांनी केली. त्याद्वारे त्यांनी समाजकार्याची जणू मुहूर्तमेढच रोवली. संकल्प फाउंडेशनच्या माध्यमातून अनेक आरोग्य, शैक्षणिक, क्रीडा, धार्मिक, सामाजिक उपक्रम राबवून नवीन विचारांचा संकल्प जणू अंगीकारला आहे.
आरोग्य सुधारण्यावर भर
आरोग्य क्षेत्रातील उणीवा समजून घेऊन कातळे यांनी परिसरातील नागरिकांचे आरोग्य सुधारण्यासाठी महाआरोग्य शिबिरे आयोजित केली. महानगरपालिकेच्या आरोग्य योजनांचा लाभ महिला, लहान मुले व ज्येष्ठांर्यंत पोहोचविला. ज्येष्ठ नागरिक संघ स्थापन करून त्यांनी ज्येष्ठ नागरिकांच्या आरोग्याला जणू नवसंजीवनीच दिली. अंगणवाडी सेविका आणि अपंग व्यक्तींना वेळोवेळी मदत करुन त्यांनी आरोग्य क्षेत्रात आपला ठसा उमटविला. नागरिकांच्या आरोग्यदायी जीवनशैलीवर भर देत विविध आरोग्य शिबिरे आणि योग, आध्यात्मिक शिबिरे आयोजित केली. नियमित तपासण्या, जनजागृती मोहिमा, तज्ज्ञांचे मार्गदर्शन आणि साधकांसाठी योग प्रशिक्षण अशा उपक्रमांमुळे आरोग्यविषयक जागरूकता वाढली असून नागरिकांचा सहभाग लक्षणीय राहिला.
शिक्षणाशिवाय विकास अशक्य 
शैक्षणिक क्षेत्रातील उदासीनता पाहता कातळे यांनी विद्यार्थ्यांसाठी अनेक शैक्षणिक व त्यांच्या बुद्धीला चालना देणारे उपक्रम राबविले. त्याचबरोबर मुलांमध्ये सांघिक भावनेला बळ देण्यासाठी सांस्कृतिक कार्यक्रम, किल्ले स्पर्धा आणि विविध स्पर्धांचे आयोजन केले. विविध घटकांतील गरजू विद्यार्थ्यांना वेळोवेळी शैक्षणिक साहित्याचे वाटप तसेच आर्थिक मदतही केली.
क्रीडा क्षेत्रात तरुणाईचे प्रतिबिंब
क्रीडा क्षेत्रातही कातळे यांनी भरीव कामगिरी केली. तरुणाईच्या आवडत्या खेळांवर व विविध उपक्रमांचे आयोजन करुन तरुणांना प्रोत्साहन देण्याचा त्यांनी वेळोवेळी प्रयत्न केला. पारंपरिक खेळांसोबत आधुनिकतेची सांगड घालून अनेक क्रीडा उपक्रम यशस्वीरीत्या राबवून त्यांनी तरुणांचे क्रीडा क्षेत्रातील महत्व अधोरेखित करण्याचा प्रयत्न केला.
धार्मिक क्षेत्र एकतेचे प्रतीक 
सर्व धार्मिक क्षेत्रातही तितक्याच ताकदीने उपक्रम राबवून बापूंनी विविध कार्यक्रमांना वेळोवेळी उपस्थिती दर्शविली. या उपक्रमांच्या माध्यमातून त्यांनी सर्व समाजाला एकत्र आणण्याचे काम आणि विविध धर्म, पंथ आणि समाजातल्या कार्यक्रमांना उपस्थित राहून कातळे यांनी वेळोवेळी समाजात एकोप्याची आणि सर्वधर्मसमभावाची भावना जागृत ठेवण्याचे काम केले.
प्रभावाचे नाणे खणखणीत
राजकीय पक्षांसमवेत मैत्रीपूर्ण संबंध जपून कातळे यांनी राजकीय स्थिरता निर्माण करण्यात महत्वपूर्ण भूमिका बजाविली. तसेच आपल्या राजकीय प्रभावाचे नाणेही खणखणीत वाजविले. विविध क्षेत्रांत कार्यरत राहून समाजाच्या प्रत्येक घटकांपर्यंत पोहोचणाऱ्या आणि समाजातील बांधिलकी, एकोपा टिकून राहावा यासाठी बापू हे आजही अहोरात्र झटत आहेत. राजकीय क्षेत्रात सलोखा आणि मैत्रीपूर्ण संबंध राखण्यासाठी सतत प्रयत्न केले आणि यामुळे कातळे  
यांना समाजाचे हित साधण्यात यश मिळाले. राजकीय प्रतिस्पर्ध्यांमध्येही सौहार्दपूर्ण संबंध असल्याने त्यांनी राजकीय क्षेत्रात आपला प्रभाव वाढविला.
समाज जीवनाचा आधारस्तंभ
सामाजिक क्षेत्रामध्ये आपल्या प्रगल्भ राजकीय इच्छाशक्तीचा आणि ओळखीचा उपयोग करून अनेक शासकीय कल्याणकारी योजनांचा लाभ वंचित घटकांपर्यंत पोहोचवण्यासाठी त्यांनी अथक प्रयत्न केले. विशेषतः महिला सक्षमीकरणासाठी त्यांनी महत्वपूर्ण योगदान दिले. लाडकी बहीण योजना, महिला बाल कल्याण योजना, विधवा व घटस्फोटित महिलांना अर्थसाहाय्य, अशा अनेक योजनांचा लाभ त्यांनी महिलांना मिळवून दिला. आधार कार्ड, मतदान कार्ड, नोंदणी, दुरुस्ती अशा अनेक समाजोपयोगी सेवा त्यांनी जनसंपर्क कार्यालयाच्या माध्यमातून उपलब्ध करुन दिल्या.
मुले, महिला, ज्येष्ठांसाठी कार्य 
लहान मुलांमध्ये कला आणि संस्कार रुजविण्यासाठी कातळे यांनी विशेष लक्ष केंद्रित केले आहे. किल्ले बनवा स्पर्धा या उपक्रमातून मुलांना इतिहासाची ओळख, परंपरा आणि सर्जनशीलतेला प्रोत्साहन मिळते. शिवजयंती, राष्ट्रीय दिन, सांस्कृतिक दिवस आदी निमित्ताने आयोजित कार्यक्रमांतून मुलांमध्ये स्वाभिमान, नेतृत्वगुण आणि देशभक्तीची भावना वृद्धिंगत होत आहे. महिलांसाठी विविध सांस्कृतिक कार्यक्रम, कला स्पर्धा, आरोग्य मार्गदर्शन आणि स्वावलंबन उपक्रम आयोजित करून  सामाजिक - आर्थिक प्रगतीसाठी सक्षम करण्याचा प्रयत्न त्यांनी केला आहे. महिला सक्षमीकरणाशी निगडित व्याख्याने, कौशल्यवर्धन शिबिरे आणि सांस्कृतिक व्यासपीठांद्वारे महिलांच्या सहभागास प्रोत्साहन देण्यात आले आहे. ज्येष्ठ नागरिकांसाठी आदर आणि कृतज्ञतेची भावना दृढ करण्याच्या उद्देशाने ज्येष्ठ नागरिक सन्मान कार्यक्रम, आरोग्य तपासण्या, आनंद मिलन आणि मनोरंजनात्मक उपक्रम राबविण्यात आले. समाजातील अनुभवसंपन्न व्यक्तींना गौरवून तरुण पिढीसाठी आदर्श मूल्ये जिवंत ठेवण्याचा त्यांचा हा प्रयत्न उल्लेखनीय ठरला.
समाज विकासाची चळवळ
केवळ कार्यक्रमांच्या आयोजनासाठी कातळे यांचे प्रयत्न नसून ती समाजविकासाची सातत्यपूर्ण चळवळ आहे. त्याने किवळे परिसर अधिक सजग, सशक्त आणि प्रगत दिशेने वाटचाल करत आहे. या सर्व उपक्रमांतून शिक्षण, संस्कृती, आरोग्य, कला आणि परंपरा यांचा समन्वय राखून संवर्धन झाल्याचे दिसून येते. समाजाच्या सर्व घटकांना एकत्र घेऊन, संस्कारयुक्त आणि जागरूक नागरिक घडविणे, समृद्ध, सुदृढ आणि संस्कृतीप्रधान परिसर उभारण्याचे कातळे यांचे ध्येय सातत्याने आकार घेत आहे.
‘स्मार्ट किवळे’चे स्वप्न 
पायाभूत सुविधा देण्यासोबतच स्मार्ट सिटी म्हणून नावलौकीक असलेल्या पिंपरी चिंचवडमध्ये ‘स्मार्ट किवळे’ अशी प्रभागाची ओळख कातळे यांना निर्माण करायची आहे. प्रशस्त रस्ते, २४ तास स्वच्छ पाणीपुरवठा, महिला सक्षमीकरण, उद्योग व्यवसाय, शिक्षण, आरोग्य यासह शांत, सुसंस्कृत परिसर, सर्वांगीण विकासाचे आदर्श मॉडेल म्हणून परिसराची ओळख व्हावी असा त्यांचा मनोदय आहे. प्रशस्त उद्याने, ज्येष्ठांसाठी विरंगुळा केंद्रे, सार्वजनिक सांस्कृतिक सभागृह, प्रशस्त ५० खाटांचे आरोग्य केंद्र, विद्यार्थ्यांसाठी स्पर्धा परीक्षा अभ्यासिका केंद्र आदी कार्यान्वित करण्याचेही त्यांचे उद्दिष्ट आहे.
पुरस्काराने सन्मान 
नव्या विचारांचा संकल्प हाती घेतलेल्या युवकांचे प्रेरणास्थान, ज्येष्ठांचा आधारवड, महिलांचा सन्मान, राजकारणातील उदयोन्मुख चेहरा असलेल्या कातळे यांना समाजात मानाचा समजला जाणारा मेट्रोसिटी आयकॉन पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

