नीलेश बोराटे (प्रभाग क्र.२)

नीलेश बोराटे (प्रभाग क्र.२)

Published on

नीलेश बोराटे (प्रभाग क्र.२)

समाजासाठी ‘आपल्या माणसा’चे निःस्वार्थी योगदान

किंवा

समाजसेवेचा एक नवा आदर्श

इंट्रो ः
मोशी प्रभाग क्रमांक दोन मधील नीलेश उद्धव बोराटे हे नाव आज प्रत्येक नागरिकाच्या ओठांवर आहे. कोणताही राजकीय वा सामाजिक वारसा नसताना, शैक्षणिक, सांस्कृतिक, धार्मिक, क्रीडा, आरोग्य आणि उद्योग क्षेत्रांमध्ये कार्यरत राहून त्यांनी समाजसेवेचा एक नवा आदर्श घालून दिला आहे. त्यांच्या कार्याची दखल घेऊन आमदार महेशदादा लांडगे यांनी त्यांना ‘प्रेरणादायी कार्यकर्ते’ असे कौतुक केले असून त्यांचे बंधू कार्तिक लांडगे यांनी ‘समाजाची सेवा करणारा आपला माणूस’ ही उपाधी बहाल केली आहे.
---------------
नीलेश उद्धव बोराटे यांचे कार्य केवळ समाजसेवा नव्हे; तर लोकांच्या भावना, संवेदना आणि ऐक्याचा उत्सव ठरत आहे. आमदार महेशदादा लांडगे यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांनी मोशी प्रभागातील विकासाच्या वाटचालीत नवा आत्मविश्वास निर्माण केला आहे. जनतेच्या मनात जागा निर्माण करणे, हाच खरा वारसा असल्याची त्यांची भावना आहे. त्यामुळेच मोशी प्रभागाला या आपल्या माणसाचा अभिमान वाटतो. विविध संस्था-संघटना, सोसायटीतील सांस्कृतिक कार्यक्रमांना बोराटे यांचे नेहमी प्रोत्साहन राहिले आहे. प्रभागातील अनेक सामाजिक, सांस्कृतिक संघटनांना ते पाठबळ देत असतात. समाजातील प्रत्येक घटकाला सहभागी करून विकासाचा प्रवास घडवणे, हा त्यामागे त्यांचा निखळ हेतू दिसून येतो.

पूरग्रस्तांसाठी हृदयस्पर्शी उपक्रम
मराठवाडा आणि सोलापूर जिल्ह्यातील शेतकरी बांधवांवर आलेल्या अतिवृष्टी आणि पूर संकटाच्या काळात बोराटे यांनी ‘एक हात मदतीचा’ या उपक्रमाअंतर्गत ५० वाहनांमधून जीवनावश्यक वस्तू आणि अन्नधान्य त्यांच्यापर्यंत पोहोचविले. १०० हून अधिक गावांपर्यंत पोहोचलेल्या या मदतीत फक्त अन्नधान्यच नव्हे; तर आशेचा हात आणि मायेचा शब्द होता. म्हैसगाव, दारफळ आणि कुंभेज या गावांतील कुटुंबांना किराणा किट, पाण्याच्या बाटल्या आणि आवश्यक साहित्य देऊन त्यांनी माणुसकीची खरी ओळख निर्माण केली.

मोशीतील रस्ते विकासाची दिशा
चिखली - मोशी शिव रस्त्यावरची वाहतूक कोंडी आणि रस्त्यांच्या अडचणींचा प्रश्न वर्षानुवर्षे होता. आमदार महेशदादा लांडगे यांच्या मार्गदर्शनाखाली आणि नीलेश बोराटे यांच्या पुढाकारातून वुड्सविले फेज-वन, कुमार प्रिन्सविले, स्वराज सोसायटीसमोरून जाणारा रस्ता पूर्ण करण्यात आला. या कामामुळे स्थानिक नागरिकांचा दिलासा मिळालाच. शिवाय वाहतुकीसाठी सुरक्षित पर्यायही निर्माण झाला.


विद्युत समस्येचे निराकरण
योगीराज कॉलनीतील नागरिकांनी विद्युत समस्येबाबत तक्रार केल्यानंतर बोराटे यांनी ती आमदार महेशदादा लांडगे यांच्याकडे मांडली. त्यांनी दिलेल्या आदेशानंतर काम त्वरीत पूर्ण झाले. त्यामुळे स्थानिक नागरिकांनी दिलासा व्यक्त केला.

रस्त्याचे काम मार्गी
वाघेश्वर कॉलनीतील रखडलेले रस्त्याचे काम महापालिका प्रशासन आणि शेतकऱ्यांच्या सहकार्याने बोराटे यांनी मार्गी लावले. या कामाच्या पाहणीसाठी महापालिकेचे अधिकारी स्वतः उपस्थित राहिले. नागरिकांनी त्यांच्या सातत्यपूर्ण प्रयत्नांचे मनापासून कौतुक केले.


विद्यार्थ्यांचा गुणगौरव सोहळा
इयत्ता १० वी आणि १२ वीमध्ये ७५ टक्क्यांपेक्षा जास्त गुण मिळविलेल्या विद्यार्थ्यांचा सन्मान करून बोराटे यांनी शिक्षणाला प्रोत्साहन दिले. विद्यार्थी हेच भविष्याचे शिल्पकार या भावनेतून त्यांनी हा उपक्रम राबवला.


भव्य गुजर क्रिकेट स्पर्धा
श्री नीलेश बोराटे सोशल फाउंडेशनतर्फे आयोजित ‘भव्य गुजर क्रिकेट स्पर्धा २०२५’ यामुळे परिसरातील युवकांमध्ये क्रीडा संस्कार, तंदुरुस्ती आणि स्पर्धात्मकता वाढली. हा उपक्रम समाजातील उर्जावान युवा पिढीला सकारात्मक मार्गदर्शन करणारा ठरला.


शिक्षणासाठी ध्वनीक्षेपक भेट
मोशीतील श्री नागेश्वर विद्यालयाच्या विद्यार्थ्यांच्या कार्यक्रमांसाठी बोराटे यांनी ध्वनिक्षेपक यंत्रणा देऊन शाळेला ‘फुल ना फुलाची पाकळी’ म्हणून योगदान दिले. विद्यार्थ्यांच्या शिक्षणाला अधिक प्रभावी करण्याच्यादृष्टीने ही देणगी अनोखी ठरली.


डबल डेकर बससेवा
स्थानिक नागरिकांच्या मागणीला प्रतिसाद देत बोराटे यांनी श्री देहू-आळंदी मार्गावर प्रवाशांसाठी सुसज्ज आणि आरामदायक डबल डेकर पीएमपी बससेवेची कल्पना पुढे आणली आहे. या उपक्रमामुळे प्रवासी वाहतुकीला नवीन दिशा मिळणार आहे.

छत्रपती संभाजीराजांना मानवंदना
मोशी येथे आयोजित ‘स्टॅच्यू ऑफ हिंदुभूषण’ या जगातील सर्वात उंच स्मारकासमोर ३ हजार ढोल आणि १ हजार ताशांच्या गजरात दिलेली मानवंदना ही बोराटे यांच्या सांस्कृतिक आणि ऐतिहासिक जाणीव दर्शविणारी ठरली.
हा सोहळा ‘ना भूतो ना भविष्यती’ असा ठरला.

स्त्रीशक्तीला प्रोत्साहन
गणेशोत्सवानिमित्ताने बोराटे यांनी प्रभागातील सर्व सोसायट्यांमध्ये विराजमान गणरायाचे दर्शन घेण्याचा आनंद घेतला. सोसायट्यांमध्ये भक्ती आणि उत्साहाचे वातावरण राहिले. बाप्पाच्या आशीर्वादाने सुख, समृद्धी आणि आनंद नांदावा, अशी प्रार्थना त्यांनी गणरायाकडे व्यक्त केली. गणेश विसर्जन मिरवणुकीत ढोल-ताशांच्या गजरात सहभागी होत बोराटे यांनी प्रत्येक नागरिकाशी संवाद साधला. मंगळागौर स्पर्धेत महिलांच्या सहभागातून समाजातील स्त्रीशक्तीला प्रोत्साहन दिले. प्रभागातील अनेक सोसायट्यांमध्ये जाऊन बोराटे यांनी झेंडावंदन केले. तसेच ‘घराघरात तिरंगा, हृदयात अभिमान’ हा संदेश नागरिकांना दिला.


कार्यालयात सुविधा
शासकीय योजना नागरिकांच्या दारात पोहोचल्या पाहिजेत. योजना जनतेपर्यंत पोहोचविणे ही खरी लोकसेवा आहे.
त्यासाठी आधार कार्ड, पॅन कार्ड, आरोग्य कार्ड, रेशन कार्ड अशा विविध प्रकारची कार्ड काढून देण्यासाठी बोराटे यांनी आपल्या कार्यालयातच नागरिकांना सुविधा उपलब्ध करून दिल्या आहेत.


महिलांसाठी प्रेरणादायी कार्य
महिलांच्या आत्मनिर्भरतेवर बोराटे यांचा विशेष भर असतो. महिलांना आर्थिकदृष्ट्या स्वावलंबी होणे गरजेचे आहे, अशी त्यांची भावना आहे. त्यामुळे त्यांच्या पुढाकाराने परिसरात महिला बचत गट, हस्तकला प्रशिक्षण, आरोग्य शिबिरे आणि उद्यमशीलतेविषयी मार्गदर्शन कार्यक्रम राबविले गेले. त्यामुळे अनेक महिलांना छोट्या व्यवसायांद्वारे आर्थिक स्वावलंबन मिळाले.

आदर्श प्रभागाचे स्वप्न
मोशी, जाधववाडी, चिखली समाविष्ट सर्व भाग (प्रभाग क्रमांक २) हा आदर्श प्रभाग करण्याचा मानस नीलेश बोराटे यांनी डोळ्यासमोर ठेवला आहे. त्यानुसार त्यांनी आपले काम सुरू ठेवले आहे. गायकवाड वस्ती, इंद्रायणी पार्क येथे अखंड वीजपुरवठ्यासाठी निलेश बोराटे यांनी आमदार महेशदादा लांडगे यांच्याकडे त्वरीत निवेदन पोहोचविले.
महेशदादांच्या तातडीच्या सूचनेवरून आणि महावितरण अधिकाऱ्यांच्या सहकार्याने नवीन वीज वाहिनी सुरू करण्यात आली. या उपक्रमामुळे गायकवाड वस्ती आणि इंद्रायणी पार्क भागातील रहिवाशांना अखंड व स्थिर वीजपुरवठा करणे शक्य होणार आहे.

सावता महाराजांना अभिवादन
मोशी ग्रामस्थ आणि महात्मा फुले मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने, भक्तिपूर्ण वातावरणात संत सावता महाराज यांचा संजीवन समाधी सोहळा अत्यंत श्रध्देने आणि उत्साहात झाला. त्यांच्या समता, भक्ती आणि अध्यात्माच्या संदेशाचा अंगीकार करत प्रसिद्ध कीर्तनकार निवृत्ती महाराज देशमुख (इंदूरीकर) यांच्या मार्गदर्शनातून सर्व उपस्थितांच्या मनात नवचैतन्य आणि प्रेरणेचा संचार झाला.

Marathi News Esakal
www.esakal.com