कुसगाव-काले गट
कुसगाव बुद्रुक जिल्हा परिषद गट
बहुरंगी लढतीची शक्यता
जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत कुसगाव बुद्रुक-काले गट हा सर्वसाधारण गटासाठी खुला झाल्याने स्थानिक राजकारणात हालचाल सुरू झाली आहे. तरुण तसेच अनुभवी नेत्यांमध्ये उमेदवारीसाठी चांगलीच चुरस निर्माण झाली आहे. गटात बहुरंगी लढतीची शक्यता असून, यंदा बदललेली गटाची रचना कुणाच्या पथ्यावर पडणार? याविषयी उत्सुकता आहे.
- भाऊ म्हाळसकर
गे ल्या वेळच्या कुसगाव-वरसोली गटाची रचना बदलत यंदा नव्याने कुसगाव बुद्रुक-काले गट अस्तित्वात आला आहे. जिल्हा परिषद गट आणि पंचायत समिती गणाच्या दोन्ही जागा खुल्या प्रवर्गासाठी राखीव झाल्याने चुरस वाढली आहे. गेल्या वेळेस कुसगाव बुद्रुक-वरसोली गट हा अनुसूचित जमाती महिलेसाठी राखीव होता.
शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस या दोन्ही पक्षांच्या फुटीचा परिणाम ग्रामीण भागात फारसा जाणवलेला नाही. वैयक्तिक चेहरा, पक्षाचे पाठबळ याचबरोबर गावकी-भावकी, नातेवाईक हा घटक निवडणुकीत महत्त्वाचा ठरणार आहे. नवीन रचना भाजपला अनुकूल मानली जात असले तरी आमदार सुनील शेळके यांचा प्रभाव निवडणुकीत जाणवणार आहे. या गटात विकास आणि स्थानिक प्रश्न अग्रस्थानी असून रस्ते, पाणीपुरवठा, शिक्षण, पर्यटन आणि युवकांना रोजगार या प्रश्नांवर चर्चा रंगत आहे.
गटातील समाविष्ट गावे
कुरवंडे, कुसगाव बु. औंढे खु., औंढोली, देवले, भाजे, लोहगड, गेव्हंडे आपटी, दुधिवरे, आतवण, मोरवे, कोळेचाफेसर, आंबेगाव, शिंदगाव, तुंग, केवरे, चावसर, शिळींब वाघेश्वर, कादव, अजिवली, कोथुर्णे, वारू, ब्राम्हणोली, काले, महागाव, धालेवाडी, मालेवाडी, सावंतवाडी, प्रभाचीवाडी, येळसे, कडधे, करुंज, बेडसे, थुगाव, आर्डव, शिवली, भडवली.

