सकाळ स्कूलिंपिक्स स्पर्धेचे आठवे पर्व जल्लोषात सुरू
पुणे, ता. १४ : हजारो विद्यार्थ्यांच्या पंखांना बळ देणाऱ्या पूनावाला फिनकोर्प प्रस्तुत ‘सकाळ स्कूलिंपिक्स’च्या आठव्या पर्वाला शुक्रवारी डेक्कन जिमखान्याच्या सेंटर कोर्टवर दिमाखात प्रारंभ झाला. उत्साह, जल्लोष आणि स्पर्धेची रोमांचकता, अशा वातावरणात उद्घाटन सोहळा पार पडला. ‘सर्व काही विसरुन मैदानात जिंकण्यासाठी उतरा’, ‘खेळात हार पत्करावी लागल्यास खचून नका’, असा कानमंत्र यावेळी प्रमुख पाहुण्यांनी सर्व खेळाडूंना दिला.
पूनावाला फिनकॉर्प लिमिटेडचे मुख्य तंत्रज्ञान अधिकारी सलील हजारनीस, ‘एस.बी. रिअॅलिटी’चे संचालक देवेश अग्रवाल आणि अंकुश बन्सल यांच्याहस्ते विजेतेपदाच्या करंडकाचे अनावरण करण्यात आले. तसेच लॉन टेनिसच्या खेळाडूंच्या हस्ते हवेत फुगे सोडून क्रीडा सोहळ्याला औपचारिकरित्या सुरवात झाली. याप्रसंगी ‘बी. जी. चितळे डेअरी’चे समाधान देशपांडे, ओंकार भिडे, डब्लू१८ स्पोर्ट्स यूनिव्हर्स शटलप्रो बॅडमिंटन अकादमीचे हृषिकेश कुलकर्णी, अक्षरवेल बुक्स अँड स्टेशनरीचे गणेश वांजळे, भारती विद्यापीठाच्या स्पोर्ट्स डेव्हलपमेंट सेंटरचे अभिजित कदम, ‘एनपीएव्ही नेट प्रोटेक्टर’चे सचिन हिंगणे, ‘सकाळ’च्या नवीन उपक्रम विभागाचे प्रमुख हेमंत वंदेकर, तसेच क्रीडाप्रेमी, पालक आणि विद्यार्थी मोठ्या संख्येत उपस्थित होते. ‘सकाळ स्कूलिंपिक्स’ म्हणजे उत्साह, जल्लोष अन् रोमांच. दरवर्षी या क्रीडा सोहळ्याला शहर आणि परिसरातील विविध शाळांचा उदंड प्रतिसाद मिळतो. यंदा या स्पर्धेत २२ खेळांमधून ५५० हून अधिक शाळांमधील २५ हजारांहून अधिक खेळाडू परिश्रम, जिद्द आणि खिलाडूवृत्तीने यशाकडे भरारी घेण्यासाठी मैदानात उतरणार आहेत. सकाळ स्कूलिंपिक्सचा सोहळा १४ डिसेंबरपर्यंत रंगणार आहे.
मुलांमध्ये शिस्त, समर्पण आणि संघभावना रुजविण्यासाठी ‘स्कूलिंपिक्स’ हा उत्तम मार्ग आहे. राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावरील स्पर्धांसाठी मुलांना तयार करत भविष्यातील ऑलिंपियन घडविणे, हा स्पर्धेचा उद्देश आहे. या उपक्रमाचा भाग होण्याचा आम्हाला मनःपूर्वक अभिमान आणि आनंद वाटतो.
- सलील हजारनीस, मुख्य तंत्रज्ञान अधिकारी, पूनावाला फिनकॉर्प लिमिटेड
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

