पशुधनाचे आरोग्य ‘खासगी’च्या भरवशावर
पुणे, ता. १६ : जिल्ह्यातील पशुसंवर्धन विभागातील रिक्त जागांमुळे पशुपालकांना जनावरांच्या उपचारासाठी खासगी डॉक्टरवर अवलंबून राहावे लागत आहे. जिल्ह्यातील २० दवाखान्यांना डॉक्टरच नसल्याने खासगी डॉक्टरशिवाय पर्याय नाही. पुण्यात पूर्वीच्या पशुगणनेनुसार जनावरांची संख्या ११ लाख आहे.
शेतकऱ्यांनी जोडधंदा म्हणून दुभत्या जनावरांचा पर्याय निवडला. जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात दुधाचा व्यवसाय वाढीस लागला आहे. मात्र, त्या तुलनेत शासनाकडून गावातील पशुसंवर्धन विभागाचे दवाखान्यांचे सक्षमीकरण केले जात नसल्याची तक्रार सातत्याने पशुपालक करत आले आहेत. पुणे जिल्ह्यात पशुधन विकास अधिकाऱ्यांची २० पदे रिक्त आहेत. सध्या अतिरिक्त कार्यभार आणि सहाय्यक पशुधन विकास अधिकाऱ्यांकडून या ठिकाणची कामे करून घेतली जात आहेत. मात्र, पूर्णवेळ डॉक्टर मिळाल्यास जनावरांवर योग्य आणि वेळेत उपचार मिळण्यास मदत होणार असल्याची पशुपालकांची भावना आहे.
पशुपालकांचे आर्थिक नुकसान
‘लम्पी स्कीन’सारख्या साथीच्या रोगाचा प्रादुर्भाव जिल्ह्यात मागील काही दिवसांपूर्वी वाढला होता, अशावेळी रिक्त पदांमुळे पशुपालकांचे आर्थिक नुकसानही होते. खासगी डॉक्टर पशुपालकांकडून अधिकचे पैसे उकळत असल्याने त्यांच्यावर कुणाचा अंकुश राहिलेला नाही.
रिक्त पदांच्या ठिकाणी पशुपालकांची गैरसोई टाळण्यासाठी डॉक्टरांची नियुक्ती केलेली आहे. मंजूर रिक्त पदांचा प्रस्ताव करण्यात आलेला आहे.
-डॉ. विष्णू गर्जे, जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी
एकूण मंजूर पदे - ११६
कार्यरत पदे - ९६
रिक्त पदे - २०
पशुसंवर्धन दवाखाने
श्रेणी १ : १०१
श्रेणी २ : १२७
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

