सुंदर हस्ताक्षर हा दागिना आहे : अश्विनी वाडेकर
पारगाव, ता. १८ : ‘‘सुंदर हस्ताक्षर असणे हे मौल्यवान दागिना असण्यासारखे आहे. त्यामुळे प्रत्येक विद्यार्थ्याने लहानपणापणापासून सुंदर व वळणदार हस्ताक्षर काढण्याचा प्रयत्न केला पाहिजे. सुंदर व वळणदार हस्ताक्षरामुळे आपले लिखाण अधिक प्रभावी होते. वळणदार हस्ताक्षराची सवय शालेय जीवनापासून जोपासण्यास भविष्यात त्याचा अधिक फायदा होतो,’’ असे मत सुलेखनकार अश्विनी वाडेकर यांनी केले.
सकाळ माध्यम समूहाच्यावतीने राबविण्यात येणाऱ्या सकाळ एनआयई अर्थात न्यूजपेपर इन एज्युकेशन या उपक्रमांतर्गत आंबेगाव तालुक्यातील दत्तात्रयनगर पारगाव तर्फे अवसरी येथील डि. जी. वळसे पाटील इंग्लिश मीडियम स्कूल व जिल्हा परिषद आदर्श प्राथमिक शाळा पिंपळगाव तर्फे महाळुंगे येथे सुंदर हस्ताक्षर व कथाकथन या कार्यशाळेचे आयोजन केले होते. सुंदर हस्ताक्षर या कार्यशाळेत विद्यार्थ्यांना हस्ताक्षर बाबत प्रात्यक्षिकासह मार्गदर्शन करण्यात आले. यावेळी विद्यालयाच्या प्राचार्या सोनल कानडे, शुभांगी पोदे, संपदा गावडे, कावेरी जाधव तसेच जिल्हा परिषद प्राथमिक शाळा प्रभारी मुख्याध्यापिका अश्विनी मेंगडे, मच्छिंद्र चासकर व सहकारी शिक्षक उपस्थित होते.
वाडेकर म्हणाल्या की, सुंदर अक्षर हे आपल्या व्यक्तिमत्वाचे प्रतिबिंब असते त्यामुळे प्रत्येकाने सुंदर हस्ताक्षरासाठी आग्रही राहिले पाहिजे. सध्याच्या सोशल मिडियाच्या काळात लिखाणाची सवय कमी होत आहे, त्यामुळे मुलांना लिखाणाची सवय लहानपणापासूनच पालक व शिक्षकांनी लावली पाहिजे. यावेळी त्यांनी विद्यार्थ्यांना उभी, आडवी व सरळ रेषा तसेच पेन धरण्याची पद्धत, वळणदार अक्षर काढताना अक्षरांची रचना याची माहिती प्रात्यक्षिकासह दिली.
त्याचप्रमाणे विद्यार्थ्यांच्या संभाषण कौशल्याला वाव मिळावा या हेतूने जिल्हा परिषद आदर्श प्राथमिक शाळा पिंपळगाव तर्फे महाळुंगे व डि. जी. वळसे पाटील इंग्लिश मीडियम स्कूल येथे कथाकथनकार विवेक गुरव यांनी विद्यार्थ्यांना क्रांतिकारकांच्या कथा सादर केल्या. भारतीय स्वातंत्र्य लढ्यातील योगदान याची माहिती दिली. क्रांतिकारक वासुदेव बळवंत फडके, क्रांतिकारक तात्या टोपे, उधमसिंग, चापेकर बंधू या क्रांतिकारकांच्या कथा त्यांनी साभिनय सादर केल्या. या कार्यशाळांना विद्यार्थी व शिक्षकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. सकाळ एनआयईचे व्यवस्थापक विशाल सराफ यांनी कार्यशाळेचे संयोजन केले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

