करिअरची दिशा आठवी- नववी- दहावीतच ठरवा
माले, ता. १२ : ‘‘आपल्याला भविष्यामध्ये काय करायचे आहे आणि काय व्हायचे आहे. आपल्याला करिअर कशात करायचे आहे, हे विद्यार्थ्यांनी आठवी- नववी- दहावीमध्ये असतानाच ठरवले पाहिजे. त्यासाठी या शालेय जीवनातच पाया भक्कम करायचा आहे. त्यासाठी ही तीन वर्षे महत्त्वाची आहे. त्यासाठी नुसता अभ्यास करून चालणार नाही तर आपले व्यक्तिमत्त्वही घडवले पाहिजे. त्यासाठी अवांतर वाचन केले पाहिजे. खेळांमध्ये लक्ष दिले पाहिजे. चांगल्या गोष्टी शिकल्या पाहिजेत,’’ असा सल्ला अपर पोलिस महासंचालक (लोहमार्ग) प्रवीण साळुंके यांनी दिला.
पुण्यातील सर परशुरामभाऊ महाविद्यालयातील बीएससीच्या सन १९९०च्या विद्यार्थ्यांनी एकत्र येऊन ‘मैत्रक चॅरिटेबल फाउंडेशन’ची स्थापना केली आहे. त्या माध्यमातून दरवर्षी ग्रामीण व दुर्गम भागातील विद्यार्थ्यांच्या शिक्षणासाठी मदत केली जाते. यावर्षी मुळशी तालुक्याच्या दुर्गम भागातील खेचरे येथील अप्पासाहेब ढमाले व माले येथील सेनापती बापट या माध्यमिक विद्यालयात आणि बेलावडे, चिंचवड, कोंढावळे, मांदेडे, आंदेशे, जामगाव, कासार आंबोली येथील प्राथमिक शाळांतील ४२६ विद्यार्थ्यांना दप्तर, रंगपेटी, चित्रकला वही, इंग्रजी शब्दकोश, नवनीत आदी विविध शैक्षणिक साहित्याचे वाटप केले. यावेळी खेचरे व माले येथील विद्यार्थ्यांना प्रवीण साळुंके यांनी मार्गदर्शन केले. यावेळी फाउंडेशनचे अध्यक्ष नरेंद्र चिप्पा, सदस्य मनोज भंडारे, सुनील जगताप, मनीषा दोशी, मनीषा पुराणिक, राजेश पणशीकर, प्रतिमा नगराळे, संदेश जाधव, श्रीपाद लिमये, अभय देव, सुनील बहिरट, विनय अरुंदेकर, आरती परांजपे, अनिता देशपांडे, शशिकांत सातव आदी उपस्थित होते.
प्रवीण साळुंके म्हणाले. ‘‘आज अनेक विद्यार्थी असे आहेत की मोबाईलवर जास्त वेळ खर्च करतात. घरी गेली की मोबाईलवर बसतात. हा आपल्या जीवनातील अत्यंत महत्त्वाचा टप्पा असतो. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना पुढील शिक्षणासाठी पुण्या-मुंबईत जायचे असते. तेथे टिकण्यासाठी आपल्या पाया भक्कम असला पाहिजे. त्यासाठी या वयातच शिक्षणाकडे लक्ष देणे फार गरजेचे आहे.’’
फाउंडेशनचे अध्यक्ष नरेंद्र चिप्पा यांनी फाउंडेशनच्या कामाची माहिती दिली. मुलांच्या सर्वगुणांचा विकास करण्यासाठी प्रयत्न केल्यास ती पुढे यशस्वी होतात. त्यासाठी फाउंडेशनच्या माध्यमातून गेल्या २० वर्षांपासून असा उपक्रम राबवीत असल्याचे त्यांनी सांगितले. यावेळी मुळशी धरण विभाग शिक्षण मंडळाचे कार्याध्यक्ष शरद शेंडे, संचालक नामदेव जाधव, माल्याचे सरपंच सुहास शेंडे, जामगावचे सरपंच विनोद सुर्वे, पोलिस पाटील विजय सुर्वे, कोंढावळ्याचे उपसरपंच नीलेश धनावडे, चिंचवडचे माजी सरपंच दिनेश कंधारे, केंद्रप्रमुख अविनाश टेमघरे, माल्याचे मुख्याध्यापक राजेंद्र पळसकर, खेचऱ्याचे मुख्याध्यपक अशोक सुंभे, गुलाब कंधारे, सागर धुमाळ, गणेश शिर्के, विनोद माझिरे आदी उपस्थित होते.
PNE25V39548
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.