सेवाभाव, नेतृत्व आणि विकासाचे प्रतीक
सेवाभाव, नेतृत्व आणि विकासाचे प्रतीक
पिंपळे सौदागर म्हटले की अनेक उपक्रम, सामाजिक बांधिलकी, संस्कृतीचे संवर्धन आणि नागरिकांशी जोडून राहणारे नेतृत्व यात अग्रभागी नाव येते अनिता संदीप काटे आणि संदीप विठ्ठल काटे यांचे. त्यांनी केवळ कार्यक्रम आयोजित केले, सभा घेतल्या किंवा घोषणाबाजी केली असे नाही. त्यांच्या कामाचा उद्देश नेहमीच समाजाला एकत्र आणणे, समस्या सोडवणे आणि पुढील पिढ्यांसाठी सक्षम, सुरक्षित आणि सुसंस्कृत परिसर उभा करणे हा राहिला आहे.
---------------------------
संदीप काटे यांनी आपला सामाजिक आणि राजकीय प्रवास २००७ मध्ये अपक्ष म्हणून निवडणूक लढवत सुरू केला. २०१७ मध्ये राष्ट्रवादीसोबत लढत असताना थोडक्यात विजय निसटला. पण, त्यांनी त्याला पराभव नव्हे, तर शिकवण म्हणून स्वीकारले.
मागील काही वर्षांपासून ते भारतीय जनता पक्षासोबत कार्यरत असून पोटनिवडणूक असो किंवा विधानसभा निवडणूक अश्विनी जगताप आणि विद्यमान आमदार शंकर जगताप यांच्या विजयात त्यांचे कार्य महत्वाचे ठरले. त्यांनी नेहमीच नागरिकांच्या दैनंदिन समस्यांवर आवाज उठविला.
रस्ते विकसित करणे, पाणीपुरवठा व्यवस्थेत सुधारणा, वाहतूक नियोजन, स्वच्छता आणि सुरक्षा यावर सातत्याने पाठपुरावा
संरक्षण विभागाच्या जमिनीवरील रस्ता तयार करण्यासाठी प्रयत्न, पोलिस ठाणे आणि नागरिकांमध्ये समन्वय साधण्याचे काम ते करत आहेत. काम पूर्ण होईपर्यंत पाठपुराव करणे हे त्यांचे सर्वात मोठे वैशिष्ट्य ठरले आहे.
समाजाशी जोडलेले उपक्रम
संदीप काटे आणि अनिता काटे त्यांच्या सहकाऱ्यांनी अनेक सामाजिक आणि सांस्कृतिक उपक्रम सुरू ठेवले आहेत.
रक्तदान शिबिरे, आरोग्य शिबिरे, गणेशोत्सव, शिवजयंती, नवरात्र कार्यक्रम, हर घर तिरंगा मोहीम, वृक्षारोपण उपक्रम
प्लॅस्टिकमुक्त परिसरासाठी जनजागृती, कपडी पिशवी मोहीम, हॅपी स्ट्रीट, दहीहंडी, बालमेळावे
‘वॉल ऑफ ह्युमॅनिटी’ यासारखे देणगी आणि मदतीची भावना वाढवणारा उपक्रम त्यांनी घेतले. हे उपक्रम केवळ कार्यक्रम नव्हते. त्याद्वारे त्यांनी परिसरात एकता, संस्कृती आणि नागरिकत्व भावना वाढवली.
शिक्षण क्षेत्रात महत्वाची भूमिका
गेल्या १५ वर्षांपासून चालणाऱ्या चॅलेंजर पब्लिक स्कूलच्या माध्यमातून त्यांनी शिक्षणात नवकल्पना आणली. कोरोना काळात अनेक कुटुंबांना फी सवलत, तांत्रिक मदत आणि मानवी समर्थन देऊन त्यांनी शिक्षण अबाधित ठेवले.
संवेदनशील नेतृत्व
चॅलेंजर पब्लिक स्कूलच्या अध्यक्षा म्हणून अनिता काटे विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासावर काम करतात. त्यांच्यासाठी शिक्षण म्हणजे फक्त पुस्तके नव्हेत, तर कौशल्य, आत्मविश्वास आणि संस्कार. रोबोटिक्स डे, आविष्कार प्रकल्प, क्रीडा, कला आणि विज्ञानाची जोड, व्यवहारिक शिक्षण, व्यक्तिमत्त्व विकास यावर त्या भर देत असतात.
महिला सक्षमीकरण
महिलांना आर्थिकदृष्ट्या मजबूत, आत्मविश्वासी आणि स्वतंत्र बनवणे हे त्यांचे ध्येय. त्यांनी अनेक उपक्रम राबवले आहेत. आरोग्य तपासणी, लघुउद्योग प्रशिक्षण, स्वयंसाहाय्य गट मार्गदर्शन, व्यक्तिमत्व विकास आणि नेतृत्व कार्यशाळा यासारखे महिला सक्षमीकरणाचे उपक्रम त्यांनी राबविले. त्यामुळे आज अनेक महिला व्यवसाय, रोजगार आणि सामाजिक भूमिकांमध्ये पुढे येत आहेत.
युवकांसाठी प्रेरणा
संदीप काटे आणि नीलेश काटे युवा मंच यांच्या सहकार्याने युवकांना क्रीडा, प्रोत्साहन आणि नेतृत्वासाठी व्यासपीठ उपलब्ध करून देण्यात आले. सौदागर प्रीमियर लीग, कबड्डी स्पर्धा, युवक नेतृत्व कार्यशाळा यामुळे युवक खेळाडू, आयोजक आणि उत्तरदायी नागरिक म्हणून विकसित झाले.
पर्यावरण, स्वच्छतेसाठी प्रयत्न
वृक्षारोपण, प्लॅस्टिक मुक्त सौदागर मोहीम, स्वच्छता आणि जनजागृती, प्रदूषणविरहित परिसरासाठी उपक्रम त्यांनी राबविले आहेत. स्वच्छ परिसर म्हणजे फक्त महापालिकेची जबाबदारी नव्हे, तर नागरिकांचीही असल्याचा स्पष्ट संदेश ते देत असतात.
लोकांशी जोडलेले नेतृत्व
संदीप आणि अनिता काटे यांचे नेतृत्व कागदावर नाही, तर लोकांच्या अनुभवात आहे. लोक म्हणतात, ते फक्त नेतृत्त्व करत नाहीत, ते ऐकतात, समजून घेतात आणि काम करून देतात. सशक्त, सुरक्षित आणि सुसंस्कृत पिंपळे सौदागर हे त्यांचे ध्येय आहे. सुविधांयुक्त आधुनिक परिसर, सांस्कृतिक वारसा, शिक्षित, प्रगत आणि एकसंघ समाज आणि आगामी पिढ्यांसाठी उत्तम वातावरण देण्याचा त्यांचा मानस आहे. सेवा प्रसिद्धीसाठी नाही. ती समाजासाठी असते आणि ती सातत्याने केली पाहिजे, अशी त्यांची धारणा आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

