समाजातील घटकांसाठी निःस्वार्थी भावनेने काम
माझा प्रभाग-माझी जबाबदारी ः स्नेहा कलाटे
दुर्बल घटकांसाठी निःस्वार्थी भावनेने काम
समाजाच्या प्रत्येक घटकाचा सर्वांगीण विकास साधून त्याला प्रगतीच्या मुख्य प्रवाहात आणायचे झाल्यास समाजकारणाला राजकारणाची जोड असणे आवश्यक आहे. त्यामुळे पिंपरी चिंचवड स्मार्ट सिटीमध्ये खऱ्या अर्थाने प्रभाग क्रमांक २६ स्मार्ट प्रभाग म्हणून ओळखला जावा याकरिता व प्रत्येक दुर्बल घटकांसाठी नि:स्वार्थ भावनेने काम करण्यासाठी पिंपरी चिंचवड महापालिकेच्या निवडणुकीला सामोरे जाण्याचा स्नेहा कलाटे यांचा मानस आहे. भाजप आणि रणजित आबा कलाटे फाउंडेशनच्या माध्यमातून केलेल्या कार्याची दखल जनता आशीर्वादरूपी पाठिंबा देऊन घेईलच असा त्यांना ठाम विश्वास आहे.
----------------
प्रभाग क्रमांक २६ वाकड, कस्पटे वस्ती, विशालनगर, जगताप डेअरी, पिंपळे निलख परिसरात चिंचवडच्या विकासाचे शिल्पकार दिवंगत आमदार लक्ष्मणभाऊ जगताप यांच्या प्रेरणेने व चिंचवड विधानसभेचे कार्यसम्राट आमदार शंकर जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली रणजित आबा कलाटे फाउंडेशनच्या माध्यमातून स्नेहा कलाटे या शैक्षणिक, सामाजिक, कला, क्रीडा, सांस्कृतिक व आध्यात्मिक क्षेत्रात कार्यरत आहेत. त्यांना समाजकार्याचा वारसा वडील कालिदास वाडेकर व आई शीला कालिदास वाडेकर यांच्याकडून मिळाला. आई-वडील हे दोघेही चाकण (पुणे) औद्योगिकनगरीतील राजकीय व सामाजिक व्यक्तिमत्त्व. दोघेही सक्रिय राजकारणी आणि समाजसेवक. विशेष म्हणजे दोघांनीही चाकणनगरीचे सरपंचपद भूषविल्याने त्यांना लहानपणापासून त्यांची समाजाबाबतची धडपड, आत्मियता, रंजल्या-गांजलेल्या दीनदुबळ्यांबाबत असलेला जिव्हाळा अनुभवायला मिळाला. त्यामुळेच स्नेहा कलाटे यांच्यात मनात आपण समाजाचे काही देणे लागतो ही भावना निर्माण झाली. समाजाचे ऋण कायम आपल्यावर असते. या विचारधारेतून त्यांच्यात समाजसेवेची ओढ निर्माण झाली आणि महाविद्यालयीन शिक्षणाबरोबर समाजसेवेला प्राधान्य देत त्यांनी कॉम्प्युटर इंजिनिअरिंगच्या पदविकेचे शिक्षण एसएनबीपी इंजिनिअरिंग आणि तंत्रशिक्षण महाविद्यालय, पिंपरी येथून पूर्ण केले.
लग्नानंतरही समाजसेवेचा वसा
समाजसेवेचा वसा लग्नानंतरही असाच पुढे घेऊन जाण्याचे स्वप्न प्रत्यक्षात उतरत असल्याचा आनंद स्नेहा कलाटे यांना आहे. त्यांचे सासरे प्रगतशील शेतकरी असून दीर व पती यशस्वी उद्योजक व बांधकाम व्यावसायिक आहेत. समाजसेवेचे हे व्रत हाती घेऊन प्रामाणिक सेवा करताना यामध्ये मोठे दीर संतोष कलाटे, पती रणजित कलाटे यांची खंबीर साथ आणि मोलाचे मार्गदर्शन त्यांना लाभत आहे. २०१२ पासून रणजित आबा कलाटे फाउंडेशनच्या अध्यक्षपदाची धुरा त्या सांभाळत असताना सामाजिक माध्यमातून परिसरातील आपण प्रत्येक कुटुंबाचा घटक झाल्याची त्यांची भावना आहे.
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या राष्ट्रसेवेच्या आणि भारतीय जनता पक्षाच्या विकासाच्या विचारांनी प्रेरित होऊन गेली अनेक दशके संपूर्ण कलाटे कुटुंब शहरामध्ये कार्यरत आहे. पती रणजित कलाटे आणि चिरंजीव यशवर्धन देखील राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे वाकड नगराचे स्वयंसेवक असून त्या देखील राष्ट्र सेवा समितीच्या माध्यमातून गेली अनेक वर्ष कार्यरत आहे. मोठ्या भावाप्रमाणे असणारे दीर संतोष हे देखील शहराच्या राजकारणात गेली अनेक वर्षे सक्रिय असून आजवर विशेष निमंत्रित सदस्य भाजप, महाराष्ट्र प्रदेश, प्रदेश कार्यकारिणी सदस्य, प्रभारी चिंचवड विधानसभा, भाजप अशी अनेक जबाबदारीची पदे त्यांनी समर्थपणे भूषविलेली आहेत.
उच्चशिक्षित चेहरा
पिंपरी चिंचवड महापालिकेच्या निवडणुकीत प्रभाग क्रमांक २६, वाकड, कस्पटे वस्ती, विशाल नगर, जगताप डेअरी, पिंपळे निलख या स्मार्ट प्रभागासाठी उच्च शिक्षित, संवेदनशील, विकासाची व्याख्या खऱ्या अर्थाने कामाच्या माध्यमातून जनतेसमोर घेऊन येणाऱ्या प्रतिनिधीलाच आपण सर्वांनी साथ द्यावी ही स्नेहा कलाटे यांची प्रामाणिक भावना आहे. त्यामुळे जनतेचे मार्गदर्शन आणि शुभाशीर्वाद हे नक्कीच सोबत कायम राहतील, अशी खात्री त्या बाळगत आहेत.
विविध सामाजिक कार्य
रणजित आबा कलाटे फाउंडेशनच्या माध्यमातून स्नेहा कलाटे यांनी केलेल्या सामाजिक कार्याची दखल विविध स्तरावर घेण्यात आली आहे. सकाळ माध्यम समूहाकडून त्यांना ‘आयडॉल ऑफ महाराष्ट्र’ हा पुरस्कार देऊन गौरविण्यात आले आहे. युवा खेळाडूंना प्रोत्साहन देण्यासाठी वाकड - पिंपळे निलख बॅडमिंटन प्रीमिअर लीग व नमो चषक २०२४ अंतर्गत बॅडमिंटन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले. कार्यसम्राट आमदार दिवंगत लक्ष्मणभाऊ जगताप यांच्या जयंतीनिमित्त बुद्धिबळ स्पर्धेचे यशस्वी आयोजन करण्यात आले. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या शताब्दी वर्षपूर्तीनिमित्त राष्ट्रसेविका समितीच्या वाकड नगर येथील विजयादशमी संचलनात स्नेहा कलाटे यांनी पती रणजित (आबा) कलाटे आणि चिरंजीव यशवर्धन यांचा देखील सहभाग राहिला.
मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त भव्य वृक्षारोपण अभियानाद्वारे शेकडो वृक्षांची लागवड करून पर्यावरण संवर्धनाचा संकल्प स्नेहा कलाटे यांनी केला आहे.हर घर तिरंगा अभियानाअंतर्गत त्यांच्या पुढाकाराने प्रभागातील तब्बल ५ हजार कुटुंबियांना राष्ट्रध्वजाचे वितरण करण्यात आले. प्रभागातील प्राथमिक व माध्यमिक शाळांमध्ये विद्यार्थ्यांना परीक्षेसाठी आवश्यक रायटिंग पॅडचे वाटप व जागतिक महिला दिनानिमित्त शाळेतील मुलींना सॅनेटरी पॅड्सचे मोफत वाटप करण्यात आले.
याशिवाय नागरिकांसाठी मोफत नेत्र तपासणी, चष्मे वाटप, सांधेदुखी वेदनाशमन आरोग्य शिबिर भरविण्यात आले.
७० वर्षांवरील जेष्ठ नागरिकांच्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याद्वारे सुरू करण्यात आलेले ‘आयुष्मान वय वंदना’ कार्डांचे स्नेहा कलाटे यांच्या उपस्थितीत वाटप करण्यात आले. भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या वाढदिवसानिमित्त मोफत आधार कार्ड अद्ययावत शिबिर तसेच दरवर्षी प्रभागातील नागरिकांसाठी पर्यावरणपूरक घरगुती गौरी-गणपती सजावट स्पर्धेचे आयोजन करून विजेत्यांना आकर्षक भरघोस बक्षिसांचे वितरण स्नेहा कलाटे यांच्या माध्यमातून करण्यात आले. जागतिक पर्यावरण दिनानिमित्त नागरिकांना कापडी पिशव्यांचे वाटप करत पर्यावरणाचे संवर्धन आणि जतन करण्याचा संदेश दिला. रिक्षा चालकांना मोफत गणवेश तसेच पाणी बॉटल्सचे वाटप, वाकड पोलिस ठाण्यातील सर्व पोलिस बंधू-भगिनींसोबत रक्षा बंधनाचा पवित्र सण विविध सोसायट्यांमधील महिलांसोबत साजरा केला. याशिवाय, स्नेहा कलाटे यांनी गणेशोत्सवानिमित्त आमदार शंकर जगताप यांच्या हस्ते आरती संग्रहाचे प्रकाशन करून हजारो प्रतींचे वितरण केले आहे. मकर संक्रांतीनिमित्त महापालिकेच्या महिला सफाई कामगारांना वाण देऊन मकर संक्रांत साजरी केली आहे. प्रभागातील महिला व ज्येष्ठ नागरिकांसाठी देहू, आळंदी, तुळापूर, एकवीरादेवी, प्रतिशिर्डी येथे आध्यात्मिक सहलीचे आयोजन करण्यात आले. ज्येष्ठ नागरिकांसाठी प्रतिवर्षी कोजागरी पौर्णिमेनिमित्त स्नेहमिलन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येते. त्यामध्ये सर्वजण आनंदाने सहभागी होत कविता, गायन अशा विविध गोष्टींच्या सादरीकरणातून आनंद घेतात. जागतिक योग दिनानिमित्त ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले उद्यानात परिसरातील नागरिकांसाठी तीन दिवसीय योग शिबिर भरविण्यात आले. परिसरातील कष्टकरी गरजू कुटुंबीयांची दिवाळी गोड व्हावी यासाठी फराळ व दिवाळी साहित्याचे किट वाटप करण्यात आले.
अन्य कार्यांतही पुढाकार
स्नेहा कलाटे यांनी अन्य सामाजिक कार्यांतही मोलाचे योगदान दिले आहे. त्यामध्ये २०२२ च्या कालनिर्णय दिनदर्शिकेचे प्रकाशन दिवंगत आमदार लक्ष्मण जगताप यांच्या हस्ते तर २०२३-२४-२५ च्या ३० हजारांहून अधिक दिनदर्शिकांचे प्रकाशन आमदार शंकरभाऊ जगताप यांच्या हस्ते करून त्यांचे प्रभागातील नागरिकांमध्ये वितरण
करण्यात आले. ज्येष्ठांच्या आरोग्यापासून ते वैयक्तिक अडीअडचणी सोडविण्यासाठी पोलिसांमार्फत ज्येष्ठांशी कनेक्ट विशेष अँपची निर्मिती करण्यात आली. यासंबंधी वाकड पोलिस ठाण्यातील अधिकाऱ्यांनी ज्येष्ठ नागरिकांना माहिती देऊन मार्गदर्शन केले.
पर्यावरणाचे भान राखत गणेशोत्सवात ‘माझा विघ्नहर्ता- पर्यावरणाचा रक्षणकर्ता’ उपक्रम राबविण्यात आला. त्यामध्ये पर्यावरण पूरक गणेश मूर्ती विसर्जन करणाऱ्या नागरिकांना प्रशस्तिपत्रक देऊन गौरविण्यात आले. पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांच्या वाढदिवसानिमित्त अनाथ आश्रमात खाऊ वाटप तसेच गोशाळेमध्ये चारा वाटप करण्यात आले.
प्रभागातील विविध सोसायटीधारकांनी स्वयंस्फूर्तीने दिलेल्या नादुरुस्त सायकली, राष्ट्रीय स्वयंसेवक संघ शाखा वाकड व रणजित आबा कलाटे फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने दुरुस्त करून वनवासी कल्याण आश्रम (पौड, मुळशी) या ठिकाणी भेट म्हणून देण्यात आल्या.
विविध कार्यक्रमांत सहभाग
राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि महिला समिती आयोजित स्नेह मेळाव्यास स्नेहा कलाटे यांनी उपस्थिती दाखविली.
श्री चंद्रप्रभू दिगंबर जैन मंदिर, वाकड आयोजित सिद्धचक्र विधान चार्तुमास आध्यात्मिक सोहळ्यात त्यांनी सहभाग घेतला.
प्रभागातील विविध ज्येष्ठ नागरिक संघाचे वर्धापन दिन तसेच स्नेहमेळाव्यास उपस्थित राहून त्यांना शुभेच्छा दिल्या.
वाकड, पिंपळे निलख परिसरातील कुटुंबियांना कलाटे यांनी १० हजार छत्र्यांचे तसेच पथारी व्यावसायिकांना ५०० छत्र्यांचे मोफत वाटप केले. चिंचवड विधानसभेचे आमदार शंकर जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली आमदार निधीमधून परिसरातील विविध रहिवासी सोसायट्यांमध्ये सौरऊर्जा प्रकल्प तसेच बोअर वेल कार्यान्वित करून लोकार्पण करण्यात आले.
रस्त्याचे डांबरीकरण, सांडपाणी वाहिन्या, गटारे दुरुस्ती, रस्त्याचे काँक्रिटीकरण, वृक्ष छाटणी, पाणी पुरवठा यांसारख्या नागरिकांना भेडसावणाऱ्या समस्यांचे निराकरण करण्यात आले. भाजप प्राथमिक सदस्यता अभियान राबवून स्नेहा कलाटे यांनी नागरिकांना पक्षाशी जोडण्याचे काम तसेच ‘मन की बात’ या कार्यक्रमाचे नागरिकांसाठी खास आयोजन केले.
दहशतवादी हल्ल्यांचा निषेध
जम्मू-काश्मीरमधील पहलगाम दहशतवादी हल्ला असो किंवा बांगलादेशमध्ये हिंदूंवर होत असणारे अत्याचार यांच्या निषेधार्थ राष्ट्रीय स्वयंसेवक संघ, महिला, ज्येष्ठ नागरिक, सोसायटीतील नागरिक व ग्रामस्थ यांच्या साथीने स्नेहा कलाटे यांनी वेळोवेळी रस्त्यावर उतरून आंदोलन केले. प्रभागामध्ये पक्षाच्या अभियानाअंतर्गत भित्ती चित्र रेखन उपक्रम तसेच ‘मेरी माटी, मेरा देश’ अभियानाअंतर्गत स्वातंत्र्यासाठी बलिदान देणाऱ्या हुतात्म्यांना नमन करण्यासाठी परिसरात विविध ठिकाणी कार्यक्रम राबविण्यात आले. लोकसभा - विधानसभा निवडणुकीमध्ये मतदानाचा हक्क बजावणाऱ्या नागरिकांना झाडाचे रोप भेट देऊन त्यांना वृक्षारोपणासाठी प्रेरित केले. पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त ‘सेवा पंधरवडा’ उपक्रमाअंतर्गत वाकड परिसरामध्ये स्वच्छता कर्मचाऱ्यांसोबत स्वच्छता अभियान उपक्रम राबविला. अयोध्येतील श्रीराम जन्मभूमी प्राणप्रतिष्ठापना दिनानिमित्त त्यांच्या पुढाकाराने कलश पूजन समारोह भक्तिभावात साजरा करण्यात आला. मावळ लोकसभा तसेच चिंचवड विधानसभा निवडणूक २०२४ मध्ये महायुतीचे अधिकृत उमेदवार मार्गदर्शक खासदार श्रीरंग बारणे व आमदार शंकर जगताप यांच्या प्रचारात त्यांनी सक्रिय सहभाग घेतला.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

