ब्लॉसम पब्लिक, इंदिरा नॅशनलची आगेकूच

ब्लॉसम पब्लिक, इंदिरा नॅशनलची आगेकूच

Published on

पुणे, ता. २८ ः पूनावाला फिनकॉर्प प्रस्तुत सकाळ स्कूलिंपिक्स क्रिकेट स्पर्धेच्या १६ वर्षांखालील गटात ताथवडे येथील ब्लॉसम पब्लिक स्कूल, भूगाव येथील श्री श्री रविशंकर स्कूल आणि वाकड येथील इंदिरा नॅशनल स्कूल यांनी विजय मिळविले.
मुंढवा येथील कोद्रे फार्म्स येथे ही स्पर्धा सुरू आहे. पहिल्या सामन्यात ब्लॉसम पब्लिक स्कूलने हडपसर येथील विबग्योर स्कूलवर दहा गडी राखून मात केली. दुसऱ्या सामन्यात श्री श्री रविशंकर स्कूलने बालेवाडी येथील सी. एम. इंटरनॅशनल स्कूलचा सात गडी राखून पराभव केला. तसेच इंदिरा इंटरनॅशनल स्कूलने नारायणगाव येथील ब्लूमिंगडेल इंटरनॅशनल स्कूलवर २८ धावांनी मात केली. अष्टपैलू खेळीसाठी ‘ब्लॉसम पब्लिक’चा प्रथमेश राऊत, ‘श्री श्री रविशंकर’चा शरण्य गायकवाड आणि ‘इंदिरा नॅशनल’चा भाव्य वदोदरीय हे सामनावीर ठरले.

संक्षिप्त धावफलक
विबग्योर स्कूल ः १० षटकांत ९ बाद ६७ (विराज वासुदेवन २३, स्वयंम धोपट ४-१७, प्रथमेश राऊत ४-११) पराभूत विरुद्ध ब्लॉसम पब्लिक स्कूल ः ६.१ षटकांत बिनबाद ६८ (रुद्र शिंदे नाबाद ४५, सारंग दिघे नाबाद ११).
सी.एम. इंटरनॅशनल ः १० षटकांत ४ बाद ७७ (आराध्य सोळंकी १३, अथांग नगरकर २-१६, शरण्य गायकवाड १-१५) पराभूत विरुद्ध श्री श्री रविशंकर स्कूल ः ९ षटकांत ३ बाद ८२ ः (शरण्य गायकवाड नाबाद २२, आराध्य सोळंकी २-१२, पार्थ पांडे १-१३). इंदिरा नॅशनल ः १० षटकांत ७ बाद १०८ (अथांग शिंदे ५०, भाव्य वदोदरीय ३८, जय वायकर ३-२०) वि.वि. ब्लूमिंग डेल इंटरनॅशनल ः १० षटकांत ४ बाद ८० (ह्रदन गांधी २६, भाव्य वदोदरीय २-७, वेदांत गवळी १-३).

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com