कुणालची ४१ चेंडूंत १०७ धावांची वादळी खेळी
पुणे, ता. २ ः पूनावाला फिनकॉर्प प्रस्तुत सकाळ स्कूलिंपिक्स क्रिकेट स्पर्धेच्या १६ वर्षांखालील गटात कर्वेनगरच्या मिलेनियम नॅशनल स्कूल, बाजीराव रस्त्यावरील नूतन मराठी विद्यालय (नूमवि), भांडगाव येथील ऑलिंपस स्कूल फॉर एक्सलन्स आणि पोदार इंटरनॅशनल स्कूल यांनी विजय मिळविले. नूमविच्या कुणाल कुंभारने अवघ्या ४१ चेंडूत १०७ धावांची वादळी शतकी खेळी केली.
मुंढवा येथील कोद्रे फार्म्स येथे ही स्पर्धा सुरू आहे. पहिल्या सामन्यात पोदार इंटरनॅशनल स्कूलने धनकवडीच्या ज्ञानांकुर इंग्लिश मीडियम स्कूलचा सात विकेटने पराभव केला. तसेच नूमविने दहा षटकांत तब्बल १९६ धावा करत सदाशिव पेठेतील ज्ञान प्रबोधिनी शाळेला तब्बल १६४ धावांनी मात दिली. अन्य सामन्यात मिलेनियम नॅशनल स्कूलने येरवडा येथील विबग्योर हायस्कूलचा आठ विकेटने आणि ऑलिंपस स्कूलने पिंपरीतील जयहिंद हायस्कूलचा सात विकेटने पराभव केला. अष्टपैलू खेळीसाठी समर्थ वांजळे, कुणाल कुंभार आणि कार्तिक हरपले हे सामनावीर ठरले.
संक्षिप्त धावफलक
ज्ञानांकुर ः १० षटकांत ५ बाद ८४ (आदित्य गव्हाणे २१, जयनाथ फडतरे नाबाद ११, यज्ञ अलहावत १-१२, आराध्य शेळके १-१२) पराभूत विरुद्ध पोदार इंटरनॅशनल ः ९.४ षटकांत ३ बाद ९० (साई पठारे नाबाद ४६, स्वराज जाधव ११, आदित्य गव्हाणे १-११). विबग्योर ः १० षटकांत ४ बाद ७० (प्रियांश यादव २२, रेयांश अग्रवाल २१, ओम देशपांडे २-११, अर्थ साबळे १-६) पराभूत विरुद्ध मिलेनियम नॅशनल ः ९ षटकांत २ बाद ७४ (समर्थ वांजळे नाबाद २३, समर्थ कासार नाबाद १६, अद्विक पटनाईक १-१३). नूमवि ः १० षटकांत २ बाद १९६ (कुणाल कुंभार १०७, शर्विल शेवळे ६०, अर्णव चौधरी १-३४) वि.वि. ज्ञानप्रबोधिनी ः ७ षटकांत सर्वबाद ३२ (श्लोक परगावकर ५, शर्विल शेवाळे २-१, अर्पित कोकाटे २-२, गौरांग कांबळे २-४, विराज नांगरे २-५). जयहिंद ः १० षटकांत ४ बाद १३० (अधिराज कुर्लेकर ६५, कार्तिक हरपले ३-१७) पराभूत विरुद्ध ऑलिंपस ः ९.५ षटकांत ३ बाद १३३ (आदित्य सोनावणे ५३, कार्तिक हरपले नाबाद ३४, सार्थक शेळके १-२२, शिवराज कापसे १-२६).
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

