अर्चिता दामले, रुचा नवरे दुहेरीच्या उपांत्य फेरीत
पुणे, ता. २ : बालेवाडी येथील एम.आय.एस. इंटरनॅशनल स्कूलच्या अर्चिता दामले व रुचा नवरे यांनी प्रतिस्पर्धी जोडीवर संघर्षपूर्ण विजय मिळवत पूनावाला फिनकॉर्प प्रस्तुत सकाळ स्कूलिंपिक्स बॅडमिंटन स्पर्धेत १२ वर्षांखालील मुलींच्या दुहेरी गटाची उपांत्य फेरी गाठली. याखेरीज, मुलींमध्ये विस्डम वर्ल्ड, एमईएस बाल शिक्षण मंदिर, संस्कृती स्कूलचेही संघ उपांत्य फेरीत दाखल झाले.
बाणेर येथील डब्ल्यू १८ स्पोर्ट्स युनिव्हर्स येथे ही स्पर्धा सुरू आहे. अर्चिता- रुचा जोडीने उपांत्यपूर्व सामन्यात एरंडवणे येथील अभिनव विद्यालय इंग्लिश मीडियम स्कूलच्या अनिका राजोपाध्ये व सान शिरगुळकर यांचा तीन सेटमध्ये १०-११, ११-१०, ११-४ असा पराभव केला. दुसऱ्या उपांत्यपूर्व लढतीत वाकड येथील विस्डम वर्ल्ड स्कूलच्या आरोही निओडिंग व आस्था अग्रवाल यांनी एरंडवणे येथील अभिनव विद्यालय इंग्लिश मीडियम स्कूलच्या अकिरा जगदाळे व रुतवा पांडे या जोडीवर
सरळ दोन सेटमध्ये ११-२, ११-५ ने विजय नोंदविला. याशिवाय एमईएस बाल शिक्षण मंदिर इंग्रजी माध्यम शाळेच्या अन्वी जोशी व शनाया राजवाडे या जोडीनेही प्रभात रोड येथील सिंबायोसिस स्कूलच्या अनन्या घाणेकर व ईशा उकीडवे यांच्यावर ११-२, ११-८ असा सहज विजय नोंदवून अंतिम चारमध्ये प्रवेश निश्चित केला. तर भूकूम येथील संस्कृती स्कूलच्या अनुष्का धारप व अन्या हळदणकर जोडीला माउंट सेंट पॅट्रिक ॲकॅडमी, लोहगावच्या सेजल घोंगडे - अनन्या अग्रवाल यांच्याविरुद्ध पुढे चाल मिळाली.
अन्य निकाल
१२ वर्षांखालील मुले ः दुहेरी - अर्जुन चॅटर्जी - सिद्धांत धामा (अभिनव विद्यालय इंग्लिश मीडियम स्कूल, एरंडवणे वि. वि. क्षितिज कुरळे - श्यामक कुचे (श्री चैतन्य स्कूल, बावधन) ११-३, ११-९. अरिथ भाटिया- यथार्थ तिवारी (संस्कृती स्कूल, वाघोली) वि वि. आर्यन शाहपूरकर - श्रीवत्स जोशी (मिलेनियम नॅशनल स्कूल, कर्वेनगर) ११-२, ११-१. अर्चित खानदेशे - कबीर तांबे (ध्रुव ग्लोबल स्कूल, लवळे) वि. वि. अन्वय अत्रे - सात्विक बेंडाळे (अभिनव विद्यालय इंग्लिश मीडियम स्कूल, एरंडवणे) ११-२, ११-१. अन्वित राजवाडे - इशान रॉय (मिलेनियम नॅशनल स्कूल, कर्वेनगर) वि. वि. अर्णव गद्रे - इशान बापट (सेवासदन इंग्रजी माध्यम शाळा, एरंडवणे) ११-४, ११-६.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

