प्रभाग क्रमांक २१ पिंपरीगाव

प्रभाग क्रमांक २१ पिंपरीगाव

Published on

प्रभाग २१ : पिंपरीगाव - मिलिंदनगर

उद्यानांची स्थिती दयनीय;
खराब रस्ते, कचऱ्याचा प्रश्न

पिंपरी, ता. २४ ः प्रभाग क्रमांक २१ मधील विविध भागात मोकाट जनावरांचा प्रश्‍न गहन बनला आहे. अपुरा आणि कमी दाबाने पाणी पुरवठ्याची समस्या आहे. पिंपरीगावातील उद्यानांतील दयनीय अवस्था आहे. अंतर्गत रस्त्यांची दुरवस्था आहे. पिंपरी कॅम्प मुख्य बाजारात अपुरे स्वच्छतागृह असल्याने नागरिकांची गैरसोय होत आहे. रस्त्याच्या दुतर्फा अनधिकृत विक्रेते आहेत. सांडपाणी आणि स्वच्छतेचा अभाव आहे. पिंपरीगावात मोकाट जनावरे, हातगाडी व्यावसायिकांचे अतिक्रमण डोकेदुखी ठरत आहे.
पिंपरी चिंचवड शहराचा मध्यवर्ती आणि सर्वात जुना परिसर म्हणून पिंपरी गावाची ओळख आहे. पिंपरी आणि लगतच्या परिसराचा समावेश महापालिकेच्या प्रभाग २१ मध्ये होतो. दाटीवाटीत वसलेल्या झोपडपट्ट्या, पिंपरी कॅम्पसारखी शहरातील सर्वात मोठी बाजारपेठ आणि भाजी आणि फूलबाजार आहे. गणेशनगर, संजय गांधीनगर, मिलिंदनगर, शास्त्रीनगर, कैलाश नगर परिसर मोठ्या झोपडपट्ट्या, पिंपरी गावात घरोघरच्या कचरा संकलनासाठी घंटागाड्या अपुऱ्या पडत आहेत. परिणामी, कचरा साचल्याने नागरिकांच्या तक्रारी वाढल्या आहेत. हेमू कलानी गार्डन, अशोक टॉकीज रोड परिसरात कचरा दिसून आला. तर, वाघेरे कॉलनी एक मेन रोड रस्त्यासमोर कचरा वर्गीकरण केले जात नाही. अनेक गाड्या नादुरुस्त आहेत. लोकसंख्येच्या तुलनेत आठ गाड्यांवर कचरा संकलनाचा ताण येतो. कचराकुंडीमुक्त प्रभाग संकल्पना राबविताना घरोघरच्या कचरा संकलनासाठी मुबलक स्वरूपात उपाययोजना केली गेली नाही. सुभाष घाट, पिंपरी मार्केट, अशोक थिएटर, गणेशनगर, महात्मा फुले महाविद्यालय परिसर, रेल्वे स्टेशन, फूलबाजार, पिंपरी गाव म्हाडा इमारत आदी ठिकाणी रस्त्यांकडेला कचऱ्याचे ढीग लागलेले दिसून येत आहेत.

असे आहेत मतदार
पुरुष : २८,०७१
स्त्री : २६,९१६
इतर : ०३
एकूण : ५४,९९०

समाविष्ट भाग
मिलिंदनगर, सुभाषनगर, गौतमनगर, आदर्शनगर, इंदिरानगर, शास्त्रीनगर, बलदेवनगर, गणेशनगर, जिजामाता हॉस्पिटल, संजय गांधीनगर, वैभवनगर, अशोक थिएटर, वैष्णवीदेवी मंदिर, मासुळकर पार्क, पिंपरीगाव, तपोवन मंदिर, बालामल चाळ, कैलासनगर, ज्ञानेश्‍वर नगर, डॉ बाबासाहेब आंबेडकर कॉलनी.

चतुःसीमा
पूर्वेला - डेअरी फर्म ते रेल्वे लाईन
पश्चिमेला - डॉ. बाबासाहेब आंबेडकर कॉलनी ते रिव्हर रोड
उत्तरेला - वाघेरे कॉलनी क्रमांक २, पिंपरी गाव
दक्षिणेला - राधिका चौक ते आर्य समाज मंदिर शाळा

प्रमुख समस्या
मोकाट जनावरे ः पॉवर हाऊस चौक, पिंपरी, म्हाडा टॉवर परिसरात महावितरणच्या डीपी बॉक्समुळे पिंपरीत गाईचा तडफडून मृत्यू झाला होता. पोलिसांकडून एफआयआर दाखल केली नाही.
अपुरा पाणीपुरवठा ः प्रभाग २० अपुरा पाणीपुरवठा होतो, दिवसाआड पाणीपुरवठा होतो. त्यामुले लोकांना पाण्याची वाट पहावी लागते. त्यानुसार लोक नियोजन करतात. कमी दाबाने पाणीपुरवठा आहे.
कचऱ्याचे ढीग ः सुभाष घाट, पिंपरी मार्केट, अशोक थिएटर, गणेशनगर, महात्मा फुले महाविद्यालय परिसर, रेल्वे स्टेशन, फूलबाजार, पिंपरीगाव म्हाडा इमारत आदी ठिकाणी रस्त्याच्या कडेला कचऱ्याचे ढीग लागलेले दिसून येत आहेत.
अपुरा वीजपुरवठा : पिंपरीगावात अपुरा वीज पुरवठ्याची कायम समस्या आहे.
मद्यपींचे ठिकठिकाणी अड्डे ः पिंपरीगावात मद्यपींचे अड्डे असल्याची समस्या नागरिकांकडून सातत्याने मांडली जात आहे, विशेषतः सार्वजनिक ठिकाणी, जुन्या इमारतींमध्ये आणि गल्ल्यांमध्ये असे अड्डे बनतात. ज्यामुळे परिसरातील शांतता व

सुरक्षिततेला धोका निर्माण होत आहे. यावर पोलिसांकडून कारवाईची मागणी केली. पिंपरी कॅम्प गाव, भुयारी मार्ग, म्हाडा रस्ता परिसरात रस्त्यालगतच जुगार आणि मद्यपींनी बस्तान बसवले आहे.
वाहतूक कोंडी ः पिंपरी कॅम्प परिसरात वाहतूक कोंडीची समस्या गंभीर आहे. कारण हा भाग मोठी बाजारपेठ असल्याने वाहनांची प्रचंड गर्दी असते. मुख्य कारणे म्हणजे वाढती वाहने, रस्त्यांची अपुरी रुंदी, आणि अवैध पार्किंगमुळे होणारे अडथळे, वाहतूक मंदावते आणि प्रवाशांचा वेळ वाया जातो.
अवैध पार्किंग : रस्त्याच्या कडेला वाहनांची बेकायदा पार्किंग, ज्यामुळे रस्त्याची रुंदी कमी होते आणि कोंडी होते. अपुऱ्या पायाभूत सुविधा आणि खड्डे यामुळे वाहतुकीचा वेग मंदावतो.

कुठे?, काय?
- पिंपरीगाव हेमू कलानी गार्डन, अशोक टॉकीज रोड चांडक वकील यांच्या कार्यालयासमोर, वाघेरे कॉलनी एक मुख्य रस्त्यासमोर रस्त्यावर कचऱ्याचे ढीग आहेत. कचरा वर्गीकरण केले जात नाही.
- पिंपरी कॅम्प, रिव्हर रोड, गणेशनगर, जिजामाता हॉस्पिटल, संजय गांधीनगर, वैभवनगर, अशोक थिएटर, वैष्णवीदेवी मंदिर परिसरात कचरा संकलनासाठी लागणाऱ्या गाड्यांची संख्या अपुरी आहे. एका गल्लीत एक गाडी भरते. यातच भाजी मंडईचा कचरा, हॉटेल व्यावसायिकांचा कचरा यांची भर पडते. लोकसंख्या पाहता येथे दुपटीने गाड्यांची आवश्यकता आहे.
- संजय गांधीनगर, वैभवनगर, अशोक थिएटर, वैष्णवीदेवी मंदिर, मासुळकर पार्क, पिंपरीगाव, तपोवन मंदिर, बालामल चाळ, कैलासनगर, कराची चौकात हात गाडी व्यावसायिकांचे अतिक्रमण केले आहे. पिंपरी कॅम्प परिसरात वाहतूक कोंडीची समस्या गंभीर आहे. कारण हा भाग मोठी बाजारपेठ असल्याने वाहनांची प्रचंड गर्दी असते. मुख्य कारणे म्हणजे वाढती वाहने, रस्त्यांची अपुरी रुंदी, आणि अवैध पार्किंगमुळे होणारे अडथळे, वाहतूक मंदावते आणि प्रवाशांचा वेळ वाया जातो.
अवैध पार्किंग : भाटनगर ते शगून चौकापर्यंतच्या भागात कोंडी होत आहे. रस्त्याच्या कडेला वाहनांची बेकायदेशीर पार्किंग, ज्यामुळे रस्त्याची रुंदी कमी होते आणि कोंडी होते. अपुऱ्या पायाभूत सुविधा आणि खड्डे यामुळे वाहतुकीचा वेग मंदावतो.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com