विद्यार्थ्यांनी क्षमतेनुसार करिअरची निवडावे

विद्यार्थ्यांनी क्षमतेनुसार करिअरची निवडावे

Published on

घोडेगाव, ता. १८ : ‘‘विद्यार्थ्यांनी आपल्यातील क्षमता ओळखून करिअरची निवड केली पाहिजे. प्रत्येक क्षेत्रात करिअरच्या अनेक संधी असून काळानुसार नवीन शिक्षण पद्धतीचा अभ्यास स्वीकारला तर यश हमखास मिळेल,’’ असे प्रतिपादन करिअर मार्गदर्शक व व्याख्याते प्रा. विजय नवले यांनी केले.
सकाळ माध्यम समूहाच्यावतीने राबविण्यात येणाऱ्या ‘सकाळ एनआयई’ व टाटा मोटर्स विद्याधनम उपक्रम, योजक संस्था यांच्यावतीने आंबेगाव तालुका विद्या विकास मंडळ संचलित जनता विद्या मंदिर व शासकीय इंग्रजी माध्यम आश्रमशाळा घोडेगाव येथे ‘करिअर निवडताना’ या विषयावरील मार्गदर्शनपर कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. यात सहभागी विद्यार्थ्यांशी प्रा. नवले यांनी संवाद साधला. ‘सकाळ एनआयई’च्या वतीने शैक्षणिक वर्षात अनेक विद्यार्थिप्रिय उपक्रम राबविले जातात.
प्रा. नवले पुढे म्हणाले की, १० वीनंतर करिअरच्या अनेक संधी सध्या उपलब्ध आहेत. अभियांत्रिकी, वैद्यकीय क्षेत्रातील करिअरसोबत अनेक अशा शाखा आहेत ज्याठिकाणी आपण प्रवेश घेऊन उत्तम करिअर करू शकतो. कृषी, अन्न व औषध प्रशासन, पॅरामेडिकल कोर्सेस, आयआयटी, आयटीआय, एआय रोबोटीक, इव्हेन्ट मॅनेजमेंटसोबत संशोधन, संरक्षण, प्रशासकीय, पर्यावरण, नैसर्गिक साधनसंपत्ती क्षेत्रात करिअरच्या संधी उपलब्ध आहेत. आपल्या आवडी व क्षमतेनुसार करिअरची निवड केल्यास अधिक फायदेशीर होते. अभ्यास करताना प्रचंड जिद्द, संयम व सातत्य ठेवले पाहिजे. दहावी बारावी हे आपल्या आयुष्याला कलाटणी देणारे वर्ष असते, त्यामुळे त्याकडे गांभिर्याने पाहिले पाहिजे. गुणांच्या आधारावर करिअर निवडण्यापेक्षा अगोदर करिअर निवडा आणि तशा पद्धतीने आपल्या अभ्यासाला सुरुवात करा असे, आवाहनही त्यांनी केले.
याप्रसंगी संस्थेचे सचिव विश्‍वास काळे, ज्येष्ठ संचालक अजित काळे, जनता विद्या मंदिर व कनिष्ठ महाविद्यालयाचे प्राचार्य अविनाश कळंबे, शासकीय इंग्रजी माध्यम आश्रमशाळेचे मुख्याध्यापक चंद्रकांत नाईकडे, पर्यवेक्षक शीतल पवार, रेखा काळे, प्रियांका जाधव, प्रणाली वाकचौरे, संजय कदम, महेंद्र आवटे आदी उपस्थित होते. ‘सकाळ एनआयई’चे व्यवस्थापक विशाल सराफ यांनी कार्यक्रमाचे संयोजन केले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com