पावसाने पाठ फिरवल्याने शेतकरी चिंतातूर

पावसाने पाठ फिरवल्याने शेतकरी चिंतातूर

Published on

पुणे, ता. २२ : जिल्ह्यात जूनच्या महिन्यात पावसाच्या दमदार हजेरीनंतर जुलै महिन्यात अनेक तालुक्यांमध्ये पावसाने पाठ फिरवली आहे. इंदापूर, बारामती यांसारख्या भागांत पावसाचे प्रमाण अत्यल्प राहिल्यामुळे पेरण्या झालेली पिके संकटात आली आहेत. सोयाबीन, मका आणि बाजरी यासारख्या पिकांना सध्या पावसाची अत्यंत गरज असताना, सिंचनाची सुविधा नसलेल्या शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे.

यंदा मे महिन्यातच दाखल झालेल्या मॉन्सून जोरदार सुरुवात केली. चांगला पाऊस झाल्याने पिकांना अतिशय पोषक वातावरण तयार झाले. वाफसा मिळताच शेतकऱ्यांनी पेरण्यांना सुरुवात केली. सध्या भात लावणीला वेग आला आहे. जिल्ह्यात सर्वाधिक पेरणी झालेल्या सोयाबीन, बाजरी आणि मका पिकांची जोमाने वाढ सुरू असतानाच पावसाचा खंड पडला. अगदी तुरळक स्वरूपात होत असलेल्या पावसाने इंदापूर, बारामती, जुन्नर, दौंडसह इतर

तालुक्यातील अशी आहे सद्यःस्थिती
१. पिके सुकून जाण्याच्या अवस्थेत
२. सोयाबीन चांगले उगवले आहे,
३. आता पाने पिवळी पडत आहेत.
४. उत्पादनात घट होण्याची शक्यता
५. मोठे नुकसान करणारे लागणार सहन


इंदापूरमध्ये अवघे १८ मिलिमीटर पाऊस
इंदापूर तालुक्यात जुलै महिन्यात केवळ १८ मिलिमीटर म्हणजेच २२.२ टक्के पावसाची नोंद झाली आहे. बारामती तालुक्यातही १९.३ मिलिमीटर पाऊस झाला असून, पुरंदरमध्ये ही स्थिती अधिकच बिकट असून २८.८ मिलिमीटर म्हणजेच २२.६ टक्के पावसाची नोंद आहे. तर जुन्नरमध्ये १८.३ पावसाची नोंद झाली असून सर्वाधिक पाऊस हा मावळ तालुक्यात १०६.७ टक्के जुलै महिन्यात झाला आहे.

मे महिन्यामध्ये पडलेल्या पावसामुळे शेतकरी वर्ग सुखावला होता. मात्र, पेरण्या झाल्यानंतर दीड महिन्यापासून पाऊस थांबल्याने पिकांच्या वाढीवर परिणाम होऊन पिके सुकू लागली आहेत. त्यामुळे आता बाजरी, मका, फळबागा व तरकारी पिकांना पाणी द्यावे लागत आहे. पाऊस आणखी लांबला तर बाजरीच्या उत्पादनात घट होण्याची शक्यता आहे.
- सुनील वाघ, प्रगतशील शेतकरी, जळगाव सुपे (ता. बारामती)

चांगला पाऊस झाल्याने मका केली. मका चांगली उगवली. पण आता दुपारी कोमेजून जात आहेत. ज्यांनी पावसावर अवलंबून पिके केली त्या सर्वच शेतकऱ्यांना पीक हातातून जाण्याची भीती वाटत आहे. ज्या शेतकऱ्यांकडे पाण्याची व्यवस्था आहे, त्यांनी पाणी सोडण्यास सुरुवात केली आहे.
- मारुती भोंग, शेतकरी, निमगाव केतकी (ता. इंदापूर)


१ लाख ६५ हजार ९६१ हेक्टरवर..... खरीप हंगामातील पेरणी

तालुकानिहाय पावसाची आकडेवारी (मिलिमीटरमध्ये)
तालुका -- सरासरी पाऊस -- जुलैचा पाऊस -- टक्केवारी
पुणे शहर -- १८४.० -- ९७.१ -- ५२.८
हवेली -- १९६.० -- ६३.६ -- ३२.४
मुळशी -- ६४५.५ -- ३७३.७ -- ५७.९
भोर -- ३६६.५ -- २५९.९ -- ७०.९
मावळ -- ४६८.२ -- ४९९.६ -- १०६.७
वेल्हे -- ९८८.८ -- ४०५.० -- ४१.०
जुन्नर -- २१९.० -- ४०.० -- १८.३
खेड -- १६५.६ -- ७८.३ -- ४७.३
आंबेगाव -- २४७.२ -- १३७.९ -- ५५.८
शिरूर -- ७२.५ -- २३.९ -- ३३.०
बारामती -- ६०.२ -- १९.३ -- ३२.१
इंदापूर -- ८१.२ -- १८.० -- २२.२
दौंड -- ६४.५ -- ४१.५ -- ६४.३
पुरंदर -- १२७.३ -- २८.८ -- २२.६

Marathi News Esakal
www.esakal.com