शाळेच्या प्रांगणात अवतरली ‘पपेटची दुनिया’

शाळेच्या प्रांगणात अवतरली ‘पपेटची दुनिया’
Published on

पुणे, ता. ४ : शाळेच्या अभ्यास व परीक्षेच्या वातावरणात अचानक पोपट, ससा, कासव, मांजर, हत्तीपासून थेट डायनासोरपर्यंत सगळे प्राणी दाखल झाले आणि छोट्या मुलांनी मौज केली. छोटा भीम आणि चुटकी या पात्रांसोबत मुलांना पपेट्‌स हाताळायला मिळाल्याने विद्यार्थ्यांसह शिक्षकांची सुद्धा धमाल झाली. निमित्त होते सकाळ माध्यम समूहाच्यावतीने राबविण्यात येणाऱ्या सकाळ एनआयई अर्थात न्यूजपेपर इन एज्युकेशन या उपक्रमांतर्गत आयोजित पपेट अर्थात कटपुतळी बनविणे या कार्यशाळेचे.
श्री अनंतराव कुलकर्णी इंग्लिश मीडियम स्कूल नारायणगाव (ता. जुन्नर) व रयत शिक्षण संस्थेचे महात्मा गांधी प्राथमिक विद्यालय मंचर (ता. आंबेगाव) येथे या कार्यशाळांचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यशाळेत मॉडर्न हायस्कूल निगडी येथील उपशिक्षिका मीना अधिकारी यांनी प्रात्यक्षिकासह संवाद साधला. विविध प्रकारच्या आवाजाच्या माध्यमातून त्यांनी विद्यार्थ्यांचे मनोरंजन केले. यावेळी विद्यार्थ्यांनी फिंगर पपेट व स्टीक पपेट रंगीत कागद, कार्डशीट पेपरच्या माध्यमातून साकारले.
पपेट शो वेळी सादर केलेले ‘नाच रे मोरा’ या गाण्यावर विद्यार्थी व शिक्षकांनी सुद्धा ठेका धरला. सर्व प्राण्यांच्या आवाजात बोलायला मिळाल्याने मुले खूष झाली. सध्याच्या मोबाईलच्या काळात स्वतःच्या हातात घातलेल्या पपेटचे संवाद आयत्यावेळी स्वतःच्या मनाने बोलताना मुलांनी गम्मत उडवून दिली. यावेळी मुख्याध्यापिका अनघा जोशी, सीमा कुलकर्णी, वैशाली पुंडे, रंजना पिल्ले, कलाशिक्षक संतोष खुडे, स्मिता मंडलिक, स्वाती थोरात तसेच महात्मा गांधी प्राथमिक विद्यालयाचे मुख्याध्यापक संजय दवंडे, ज्योती बेळगे, सुनेत्रा एरंडे, सुरेखा लोंढे, ललिता खांडगे, गोविंद केंगले, स्वाती लोंढे उपस्थित होते. यावेळी ‘सकाळ एनआयई़’चे व्यवस्थापक विशाल सराफ यांनी संयोजन केले. सकाळ एनआयई या उपक्रमाच्या माध्यमातून विविध उपक्रम राबविले जातात. विद्यार्थ्यांच्या वाचन व लेखन कौशल्याला वाव मिळावा या हेतूने मागील वीस वर्षापासून हा उपक्रम महाराष्ट्रभर राबविला जात आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com