विद्यार्थ्यांसाठी सायबर सिक्युरिटी महत्त्वाची
चाकण, ता. १३ : ‘‘वेगाने विकसित होत असलेल्या डिजिटल युगात विद्यार्थ्यांसाठी सायबर सुरक्षा महत्त्वाची असून त्यासाठी पालकांनी सुद्धा जागरूक राहिले पाहिजे, सोशल मीडिया काळात विद्यार्थ्यांनी गरजेपुरता मोबाइलचा वापर केला पाहिजे. आपल्या पालकांच्या देखरेखीखाली मोबाईल हाताळण्याची सवय लावली पाहिजे. सायबर सुरक्षा महत्त्वाची असून भविष्यातील धोके टाळण्यासाठी विद्यार्थ्यांनी सायबर सुरक्षा अंमलात आणली पाहिजे.’’ असे आवाहन सायबर सुरक्षा अभ्यासक ॲड. शालिनी शर्मा यांनी केले. सकाळ माध्यम समूहाच्या वतीने राबविण्यात येणाऱ्या ‘सकाळ एनआयई’ अर्थात न्यूजपेपर इन एज्युकेशन या उपक्रमांतर्गत चाकण (ता. खेड) येथील पी. के. इंटरनॅशनल स्कूल चाकण आणि विद्यानिकेतन इंग्लिश मीडियम स्कूल, राक्षेवाडी या शाळांमध्ये सायबर सुरक्षा विषयावरील मार्गदर्शन कार्यशाळा घेण्यात आली. यावेळी सहभागी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना त्या बोलत होत्या. याप्रसंगी पी. के. इंटरनॅशनल स्कूल व्यवस्थापक संचालक डॉ. निकिता खांडेभराड, मुख्याध्यापक रोहिदास भोर, विद्या व्हॅली संस्थेचे अध्यक्ष श्यामराव देशमुख व सचिव डॉ. रोहिणी देशमुख, विद्यानिकेतन इंग्लिश मीडियम स्कूल, राक्षेवाडीचे प्राचार्य दीपक शिंदे, वरिष्ठ वितरण प्रतिनिधी परशुराम सैद उपस्थित होते.
ॲड. शर्मा म्हणाल्या, ‘‘शालेय वयातच विद्यार्थ्यांना सायबर गुन्हे आणि त्याबाबत माहिती दिल्यास त्यातून कळत नकळत त्यांची भविष्यात होणारी फसवणूक टळेल. अनोळखी व्यक्तींना पासवर्ड न देता. कोणत्याही माहिती नसलेल्या लिंक आपण खात्रीशिवाय उघडू नये. शक्यतो आपल्या पालकांच्या देखरेखीखाली किंवा मार्गदर्शनाखाली मोबाइलचा वापर केला पाहिजे. मोबाईलवर गेम खेळणे, रिल्स पहाणे यामुळे आपल्या डोळ्यांना सुद्धा त्रास होतो त्यामुळे मोबाईल वापरण्याचा अतिरेक टाळला पाहिजे. सायबर सुरक्षेची माहिती आपल्या परिवारातील सदस्यांना सुद्धा दिली पाहिजे. त्यामुळे ते सुद्धा सतर्क राहू शकतात.’’ यावेळी त्यांनी विद्यार्थ्यांना सायबर सुरक्षेची माहिती दिली. कार्यशाळांना विद्यार्थ्यांसह शिक्षकांचाही उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. ‘सकाळ एनआयई’चे वरिष्ठ व्यवस्थापक विशाल सराफ यांनी प्रास्ताविक केले. यावेळी विद्यार्थ्यांना ‘सकाळ एनआयई’ उपक्रमाची माहिती देण्यात आली.
सुरक्षा नियमांचे पालन करा
सध्याचे विद्यार्थी मोठ्या प्रमाणावर ऑनलाइन फॉर्म, शिष्यवृत्ती अर्ज, सोशल मीडिया आणि डिजिटल पेमेंटचा वापर करत आहेत. त्यातच सायबर फसवणुकीच्या घटनाही वाढत आहेत. विद्यार्थ्यांनी स्वतःची माहिती सुरक्षित ठेवण्यासाठी काही महत्त्वाच्या सायबर सुरक्षा नियमांचे पालन करणे गरजेचे आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

