बारामती, पुरंदरमध्ये अभूतपूर्व जल्लोषात स्वागत

बारामती, पुरंदरमध्ये अभूतपूर्व जल्लोषात स्वागत

Published on

पुणे, ता. २२: ‘बजाज पुणे ग्रँड टूर-२०२६’ चा तिसऱ्या टप्प्याचा प्रारंभ गुरुवारी (ता. २२) दुपारी साडेबारा वाजता सासवड (ता.पुरंदर) येथील शिवतीर्थावरून उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते झाला. बारामती व पुरंदर तालुक्यातून ठिकठिकाणी मोठ्या उत्साहात विद्यार्थी तसेच नागरिकांनी अभूतपूर्व जल्लोषात स्पर्धकांचे स्वागत केले.
सासवडमधील विद्यार्थ्यांनी पारंपरिक वेषभूषेमध्ये सादर केलेली नृत्ये लक्षणीय ठरली. नीरानगरीतून स्पर्धक ४०-५० किलोमीटर प्रतितासाच्या वेगाने जात होते. नीरेकरांनी जागतिक स्तरावरील सायकल स्पर्धेचा थरार डोळ्यात साठवून स्पर्धेचा आनंद घेतला.
सुपामार्गे पानवडी घाटातील तीव्र उतार वेडीवाकडी वळणे अवघड चढ माथा पार करत काळदरी, धनकवडी, मांढर, माहूर, परिंचे, वाल्हे मार्गे दुपारी दोन वाजता बारामतीकडे मार्गस्थ झाला. नीरा-मोरगाव रस्त्यावर ठिकठिकाणी जल्लोषात स्वागत करण्यात आले. ‘भारत माता की जय’ अशा घोषणा देत आणि टाळ्या वाजवत स्पर्धकांचा उत्साह वाढविण्यात आला. वडगाव निंबाळकर पोलिसांनी परिसरातील विविध संस्थांकडून लोकसहभाग घेत स्पर्धेचे यशस्वी नियोजन केले.
दरम्यान, बारामतीकरांनी पुणे ग्रँड टूर सायकल स्पर्धेतील सायकलपटूंचे जल्लोषात स्वागत केले. शहरात जागोजागी विद्यार्थी व नागरिकांनी सायकलस्वारांना प्रोत्साहित करत घोषणा दिल्या तसेच विद्यार्थ्यांनी विविध कवायती सादर करत सायकल स्पर्धेचे स्वागत केले. बारामतीच्या प्रवेशद्वारापासून सायकलपटूंचा उत्साह वाढविण्याचा प्रयत्न उपस्थितांनी केला.

परदेशी पाहुण्यांवर संस्कृतीची छाप
वाल्हेकरांच्या उत्साहाने संपूर्ण वाल्मिकनगरीच जणू सायकलपटूंबरोबर धावली. पारंपरिक पोशाख, लेझीम, ढोल-ताशांचा गजर आणि विद्यार्थ्यांनी केलेल्या उत्स्फूर्त स्वागतामुळे परदेशी पाहुण्यांवर येथील संस्कृतीची छाप पडली. सायकलपटू गावात दाखल होताच ढोल-ताशांचा निनाद, विद्यार्थ्यांच्या घोषणांनी आणि पारंपरिक वेशभूषेने संपूर्ण परिसर भारावून गेला. दरम्यान, दुपारी ही स्पर्धा वाल्मिकनगरीतून नीरा मार्गे बारामती तालुक्याकडे मार्गस्थ झाली.

14290

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com