

अविनाश ढगे : सकाळ वृत्तसेवा
पिंपरी, ता. १६ : आखातातील युद्धामुळे भारतात ‘एलपीजी’चा तुटवडा निर्माण झाला. त्यामुळे नागरिक आता ‘पाइप्ड नॅचरल गॅस’कडे (पीएनजी) वळत आहेत. पाइपद्वारे गॅस जोडणीची मागणी जवळपास तिप्पट वाढली आहे. त्यातच मनुष्यबळाचा तुटवडा आहे. त्यामुळे नवीन जोड देताना प्रशासनाची दमछाक होत आहे. तर, घराजवळ गॅस वाहिनी असूनही नवीन जोडणीसाठी नागरिकांना प्रतीक्षा करावी लागत आहे.
‘एलपीजी’ तुटवड्यामुळे भारतात गॅस सिलिंडरचे वितरण विस्कळित झाले. त्यामुळे नागरिकांनी गॅस एजन्सीबाहेर रांगा लावल्या. तसेच वर्षातून बारा सिलिंडरची मर्यादा ओलांडली किंवा २१ दिवसांच्या आत सिलिंडर बुकिंग होत नव्हते. यामुळे सर्वसामान्य नागरिकांसह व्यावसायिक आणि उद्योजकही मेटाकुटीला आले. त्यामुळे ‘एलपीजी’ला पर्याय म्हणून, तसेच सुरक्षित ऊर्जेमुळे आता ‘पीएनजी’कडे वळू लागले आहेत. पुणे, पिंपरी चिंचवडसह लगतच्या गावांमध्ये ‘एमएनजीएल’ अर्थात महाराष्ट्र नॅचरल गॅस लिमिटेड कंपनीकडून वाहनांसाठी कॉम्प्रेस्ड नॅचरल गॅस (सीएनजी) आणि घरांसाठी/व्यावसायिक वापरासाठी पाइप्ड नॅचरल गॅस (पीएनजी) पुरवला जात आहे. तर, आठ लाखांवर वापरकर्त्यांना उपयुक्त होईल, इतकी सुविधा उभारण्यात आली आहे.
‘एमएनजीएल’चा दावा
नवी कनेक्शनची मागणी अचानक वाढल्यामुळे जोड देण्यापूर्वी सर्व्हे आणि परवानग्या देताना मनुष्यबळाचा तुटवडा जाणवत आहे.
अर्ज केल्यानंतर सर्व्हे, जोडणीसाठी कर्मचारी नाहीत, मीटर नाहीत अशी कारणे ‘एमएनजीएल’कडून दिली जात आहेत. महापालिका स्तरावर सर्व परवानग्या मिळवून दिल्या, तरी ‘एमएनजीएल’कडूनच उशीर होत आहे.
- नवीन लायगुडे, हॉटेल व्यासायिक
मी ऑनलाइन अर्ज केला होता. संबंधित अधिकाऱ्यांना संपर्क साधला असता त्यांनी माझ्याकडून अर्ज आणि कागदपत्रे घेतली. मात्र, मनुष्यबळ नाही म्हणून अजून सर्व्हेदेखील झालेला नाही. आमच्या बिल्डिंगमधून गॅस पाइपलाइन गेली आहे. तरीदेखील कनेक्शन मिळण्यासाठी अडचणी येत आहे.
- राजू पिल्ले, व्यावसायिक
पीएनजी कनेक्शनची अचानक मागणी वाढली असल्यामुळे थोडा उशीर होत आहे. पण, सर्वांना वेळेत कनेक्शन देण्यासाठी आमचे प्रयत्न सुरू आहेत.
- वरिष्ठ अधिकारी, ‘एमएनजीएल’
या भागांत होतो पुरवठा
पुणे, पिंपरी चिंचवड, चाकण, हिंजवडी, तळेगाव दाभाडे
सिंलिडर तुटवड्यापूर्वी
दररोज सुमारे १९० नवीन जोड
सद्यस्थितीत जोडणी
दररोज सुमारे ४५० पेक्षा जास्त
नागरिकांच्या अडचणी
- सर्व्हे होत नाहीत, जोडणी मिळत नाही
- गॅस वाहिनी असूनही जोडणीसाठी २५ ते ३० दिवस प्रतीक्षा
- अर्ज करुनही वेळेत कनेक्शन मिळत नाही
अडीच हजार किलोमीटर
गॅस वाहिनीचे जाळे
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.