

पुणे, ता. २६ : ग्रामीण भागात मुलांना पुढील शिक्षणासाठी गावाबाहेर जावे लागते. यामुळे पुणे जिल्हा परिषदेने गावातच दहावीपर्यंतचे वर्ग सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार काही गावांतील शाळांमध्ये सुरू करण्यास मान्यताही दिली आहे. केवळ दहावीच नव्हे, तर पाचवीपुढच्या वर्गांसाठी ४० शाळांना जिल्हा परिषदेने मान्यता दिली आहे.
जिल्हा परिषद प्रशासनाने निवडक शाळांमध्ये उच्च वर्ग सुरू करण्याचा निर्णय घेतला. प्रत्येक गावाची गरज, विद्यार्थ्यांची संख्या आणि उपलब्ध सुविधा यांचा विचार करून टप्प्याटप्प्याने विस्तार केला जात आहे. जिल्हा परिषद शाळेतील शिक्षण अधिक सक्षम, गुणवत्तापूर्ण आणि सर्वसमावेशक करण्याच्या दिशेने शासनाच्या आदेशानुसार जिल्हा परिषद शाळांचा दर्जावाढीचा महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला. यामध्ये तालुक्यांनी प्रस्तावित केल्यानुसार विद्यार्थ्यांची संख्या, स्थानिक गरज आणि पायाभूत सुविधा यांचा आढावा घेऊन आवश्यकतेनुसार हा विस्तार केल्याची माहिती जिल्हा परिषदेकडून देण्यात आली. याअंतर्गत काही प्राथमिक शाळांना पाचवी ते आठवीपर्यंत वाढ दिली आहे तर उच्च प्राथमिक शाळांमध्ये नववी, दहावीचे वर्ग सुरू झाले आहेत.
‘ग्रामीण पुण्यातील प्रत्येक विद्यार्थ्याला त्यांच्या सर्वांगीण विकासाच्या दृष्टीने आपल्या गावाजवळच सातत्यपूर्ण आणि गुणवत्तापूर्ण शिक्षण मिळावे, हा आमचा मुख्य उद्देश आहे.
- गजानन पाटील, मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद
शाळा सोडण्याचे प्रमाण होणार कमी
जिल्हा परिषद शाळांमध्ये दहावीपर्यंतच्या शिक्षणाची सुविधा उपलब्ध करून देण्याच्या दिशेने हा महत्त्वपूर्ण निर्णय आहे. यामुळे शाळा सोडण्याचे प्रमाण कमी होईल आणि पालकांचा शासकीय शिक्षण व्यवस्थेवरील विश्वास बळकट होण्यास मदत होईल, असा विश्वास जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी गजानन पाटील यांनी व्यक्त केला आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.