राष्ट्रीय सेवा योजनेच्या विद्यार्थ्यांना निरोप

राष्ट्रीय सेवा योजनेच्या विद्यार्थ्यांना निरोप

Published on

- राजर्षी शाहू अभियांत्रिकी महाविद्यालय
ताथवडे येथील राजर्षी शाहू अभियांत्रिकी महाविद्यालयातील राष्ट्रीय सेवा योजनेच्या विद्यार्थ्यांना नवीन विद्यार्थ्यांकडून एक अनोखा निरोप देण्यात आला. राष्ट्रीय सेवा योजना युनिटकडून २०२४-२०२५च्या बॅचचा निरोप समारंभ पार पडला. याप्रसंगी संचालक डॉ. संतोष भोसले यांनी स्वयंसेवकांना मार्गदर्शन केले. एनएसएस समन्वयक हर्षवर्धन काजळे, अक्षता काजळे, हर्षवर्धन गायकवाड, रवींद्र सोनुने, स्वप्निल सावंत, निर्मिती चौधरी, वेदांत कोकिल, तेजस मुंडे, प्रियांका सोनुनिस, हर्षिता दफ्तरी, शरद पवार, आकांक्षा बोंगडे, विनय सुतार, चैतन्य गरजे यांनी मनोगत व्यक्त केले. या वेळी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे प्रमाणपत्र, महाविद्यालयाचे प्रमाणपत्र देण्यात आले. याप्रसंगी संस्थेचे कार्यकारी संचालक डॉ. सुधीर भिलारे, रवी सावंत, उपसंचालक डॉ. अविनाश बडदे, प्रशासकीय अधिष्ठाता डॉ. सुनील कांदळकर, डॉ. सुनीता यादव, डॉ. नितीन मुजुमदार, सहा. अधिष्ठाता डॉ. प्रीती तोमर, डॉ. अजय पैठणे, प्रा. कुशल लोढा उपस्थित होते. कार्यक्रमाधिकारी प्रा. बी.बी. गाडेकर यांनी प्रास्ताविक केले. सृष्टी गंगाधर, साक्षी देशमुख, यश मकोडे यांनी नियोजन केले. सूत्रसंचालन आदिती कोंडे आणि हर्षदा पाटील यांनी केले.

स्मार्ट इंडिया हॅकाथॉनमध्ये डीवायपीआयईएमआर प्रथम
- डॉ. डी. वाय. पाटील इन्स्टिट्यूट
देशातील सर्वात मोठ्या नावीन्यपूर्ण स्पर्धांपैकी एक, स्मार्ट इंडिया हॅकाथॉन २०२५ सॉफ्टवेअर विभागमध्ये डॉ. डी. वाय. पाटील इन्स्टिट्यूट ऑफ इंजिनिअरिंग, मॅनेजमेंट अँड रिसर्च (डीवायपीआयईएमआर), आकुर्डीच्या विद्यार्थ्यांनी राष्ट्रीय स्तरावर प्रथम क्रमांक मिळवून यश संपादन केले. या यशासाठी टीम इनोवेदा दीड लाखांचे पारितोषिक प्रदान करण्यात आले. स्पर्धेची अंतिम फेरी नागपूर येथील जी. एच. रायसोनी अभियांत्रिकी महाविद्यालय येथे नोडल सेंटर म्हणून पार पडली. यात ५०० पेक्षा जास्त संघांनी सहभाग नोंदवला. टीममध्ये कॉम्प्युटर आणि आर्टीफिशिअल इंटेलिजन्स अँड डेटा सायन्स विभागातील हिमांशू केजडीवाल, शुभम गुप्ता, रोहित साबळे, साईश केनेकर, सार्थक सोनटक्के आणि दिया केसकर यांचा समावेश होता. डॉ. वंदना पाटील, प्रा. आकांक्षा कुलकर्णी आणि प्रा. शिवाजी वसेकर यांनी मार्गदर्शन केले. एसआयएच विभाग समन्वयक म्हणून प्रा. तुषार मोहिते आणि प्रा. दीपाली हजारे यांनी भूमिका बजावली. संस्थेचे अध्यक्ष सतेज पाटील, प्रतिष्ठानचे विश्वस्त तेजस पाटील, अमित विक्रम, डॉ. डी. वाय. पाटील युनिव्हर्सिटीचे कुलगुरू डॉ. मनीष भल्ला आणि प्राचार्या डॉ. अनुपमा पाटील, कुलसचिव वाय. के. पाटील, प्रा. प्रतीक्षा शेवतेकर, प्रा. डॉ. सुवर्ण पाटील यांनी अभिनंदन केले.

हिमाचल प्रदेशमधील उच्चस्तरीय अधिकाऱ्यांचा दौरा
- वाय. बी. पाटील पॉलिटेक्निक कॉलेज
आकुर्डी येथील वाय. बी. पाटील पॉलिटेक्निक कॉलेजमध्ये हिमाचल प्रदेश तांत्रिक शिक्षण विभाग व कौशल्य विकास निगमच्या शिष्टमंडळाने भेट दिली. पॉलिटेक्निकच्या यशस्वी कार्यपद्धती व संस्थात्मक कार्यप्रणालीचा सखोल अभ्यास व निरीक्षण करण्याच्या उद्देशाने हा दौरा आयोजित करण्यात आला होता. या शिष्टमंडळाचे नेतृत्व तांत्रिक शिक्षण संचालक अक्षय सूद (हिमाचल प्रदेश) यांनी केले. त्यांच्यासमवेत अशोक पाठक उपस्थित होते. संकुल संचालक रिअर अ‍ॅडमिरल अमित विक्रम आणि प्राचार्य डॉ. ए. एस. कोंडेकर यांनी मान्यवरांचे स्वागत केले. कॅम्पस प्रशासनाने शिष्टमंडळाला पॉलिटेक्निकमधील महत्त्वाच्या पायाभूत सुविधा व शैक्षणिक विभागांची पाहणी करून दिली. प्राचार्य डॉ. ए. एस. कोंडेकर यांनी सविस्तर व प्रभावी सादरीकरण केले.

कौशल्य आधारित अभ्यासक्रमाचे उद्‍घाटन
- प्रा. रामकृष्ण मोरे महाविद्यालय
नोकरी आणि व्यवसायामध्ये तंत्रज्ञानाचा वाढता वापर लक्षात घेऊन, महाविद्यालयातील विद्यार्थ्यांमध्ये तांत्रिक कौशल्ये विकसित करण्याच्या उद्देशाने विविध कौशल्य-आधारित अभ्यासक्रम सुरू करण्यात आले आहेत. या वेळी एमकेसीएल कंपनीचे प्रोडक्ट मॅनेजर सौम्या पाणी व सोमनाथ अंबुलगे उपस्थित होते. तर अध्यक्षस्थानी प्राचार्य डॉ. अभय खंडागळे होते. उपप्राचार्य डॉ. मधुकर राठोड, डॉ. अमोल सोनवणे, डॉ. विदुला व्यवहारे, प्रा. संजय भोई आदी उपस्थित होते. डॉ. पद्मावती इंगोले यांनी प्रास्ताविक केले. आयोजनासाठी डॉ. रिटा वर्मा, डॉ. धनश्री खटावकर यांचे सहकार्य लाभले. या वेळी डॉ. सुनील लंगडे, डॉ. अर्चना माळी, प्रा. विक्रांत शेळके, प्रा. शिल्पा वाजे, प्रा. रेवती राजपूत, प्रा. सुप्रिया बिराजदार, प्रा. रेशमा रोडे, प्रा. अल्फिया मुलानी, प्रा. श्रीनिधी भुरके, प्रा. वर्षा ढमाले आदी उपस्थित होते. सूत्रसंचालन प्रिया भारद्वाज आणि आभार डॉ. रामदास लाड यांनी मानले.

डीवायपीआयइएमआरमध्ये रंगला माजी विद्यार्थी मेळावा
- डॉ. डी. वाय. पाटील इन्स्टिट्यूट
आकुर्डी येथील डॉ. डी. वाय. पाटील इन्स्टिट्यूट ऑफ इंजिनिअरिंग, मॅनेजमेंट अँड रिसर्चच्या वतीने आयोजित करण्यात आलेला माजी विद्यार्थी मेळावा २०२५ उत्साहात पार पडला. या वेळी प्राचार्या डॉ. अनुपमा पाटील, प्लेसमेंटच्या डीन जस्मीता कौर, कुलसचिव वाय. के. पाटील, युनिव्हर्सिटीचे आयक्यूएसीचे संचालक डॉ. सुनील डंभारे, सहयोगी संचालक प्रा. मानबर्धन कांत, डॉ गणेश जाधव, प्रा. अमृता अदवंत, केतन अवळेलू, अमोल चौधरी आदी उपस्थित होते. माजी विद्यार्थी अमोल चौधरी याने विद्यार्थ्यांना २५ लाख रुपयांपर्यंत स्टार्टअपसाठी निधी देण्याचे आश्वासन दिले. समन्वयाची जबाबदारी डॉ. गणेश जाधव आणि प्रा. अमृता अदवंत यांनी यशस्विरित्या पार पाडली. तसेच प्रा. सुशील गायकवाड, प्रा. चेतन पवार, प्रा. नितीन मोटगी, प्रा. मोहिनी अवताडे, प्रा. अमृता कुलकर्णी, प्रा. तेजश्री गुळवे आणि डॉ. धुंडिराज देशपांडे यांनी कार्यक्रम यशस्वितेसाठी परिश्रम घेतले.

वाणिज्य विभागाच्या माजी विद्यार्थी मेळावा उत्साहात
- प्रा. रामकृष्ण मोरे महाविद्यालय
आकुर्डी येथील प्रा. रामकृष्ण मोरे महाविद्यालयाच्या वाणिज्य विभागाच्या वतीने माजी विद्यार्थी सुसंवाद सभा आयोजित करण्यात आली होती. याप्रसंगी प्रमुख पाहुणे माजी विद्यार्थी संघटना उपाध्यक्ष ज्ञानेश्वर कुटे उपस्थित होते. अध्यक्षस्थानी प्राचार्य, डॉ. अभय खंडागळे उपस्थित होते. कुटे यांनी माजी विद्यार्थी संघटनेच्या कार्याचा आढावा देऊन सामाजिक कार्यावर प्रकाश टाकला. प्राचार्य डॉ. खंडागळे यांनी महाविद्यालयाच्या विकासाचा लेखाजोखा मांडला. याप्रसंगी माजी विद्यार्थी संदीप उबाळे (पार्श्व गायक), सुजाता शितोळे (पर्सनल मॅनेजर), रेश्मा माने (टॅक्स कन्सल्टंट), सागर झोपे (एच. आर. मॅनेजर), रवी रसाळ (उद्योजक), डॉ. स्वाती जगताप, प्रा. विकास जगताप, प्रा. दीपक खामकर, रवीराज काळे यांनी मनोगत व्यक्त केले. तर गायक संदीप उबाळे, डॉ. स्वाती जगताप, प्रा. विक्रांत शेळके यांनी महाविद्यालयातील विद्यार्थी व शिक्षक यांच्यावर आधारित गाणे व कविता सादर केली. उपप्राचार्य डॉ. एच. बी. सोनवणे, डॉ. मधुकर राठोड, डॉ. सुधीर बोराटे उपस्थित होते. डॉ. सुनील लंगडे यांनी प्रास्ताविक केले. डॉ. रामदास लाड यांनी सूत्रसंचालन केले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com