गॅस सिलिंडरसाठी रांगा, वाद अन् संघर्ष

गॅस सिलिंडरसाठी रांगा, वाद अन् संघर्ष

Published on

पिंपरी, ता. ११ : ‘मी दोन दिवस झाले गॅस सिलिंडर ऑनलाइन बुक करतोय, होत नाहीए’, ‘अहो, तुम्ही बुकिंग करा, मी तुम्हाला सिलिंडर देतो’, ‘होत नाहीए ना!’, ‘मग, विदाऊट बुकिंग नाही देता येणार!’, ‘कसं देता येणार नाही, तुमचं नाव सांगा, तुमची तक्रारच करतो’, ‘बिनधास्त करा!, पण बुकिंगशिवाय सिलिंडर मिळणार नाही,’ ‘अहो, काका काय झालंय?’, ‘काय नाही हो! हे सिलिंडर देत नाहीए, आमचे उपवास सुरू आहेत, यांच्या घरी सिलिंडर आहेत, म्हणून आपल्याला आडून पाहताहेत’, ‘आमच्या घरापर्यंत जाऊ नका, तुम्ही ऑनलाइन बुक करा, कोड दाखवा लगेच तुम्हाला सिलिंडर देतो, पण वाद घालू नका!’ हे संवाद आहेत पिंपरीतील एका गॅस एजन्सी कार्यालयातील कर्मचारी आणि ग्राहकांतील. गॅस सिलिंडरच्या तुटवड्यामुळे असे प्रसंग व ग्राहकांच्या रांगा, गर्दी प्रत्येक एजन्सी कार्यालयांत बघायला मिळत आहेत.

अमेरिका- इस्राईल आणि इराण यांच्यातील युद्धाची झळ पिंपरी चिंचवडपर्यंत पोहोचली आहे. घरगुतीसह व्यावसायिक गॅस सिलिंडरचा तुटवडा निर्माण झाला आहे. घरपोच डिलिव्हरी जवळपास बंद झाली आहे. ऑनलाइन बुकिंगचा कालावधी २५ दिवसांवर पोहोचला आहे. बुकिंग करूनही वेळेत सिलिंडर मिळणार नाही, या शक्यतेने काही नागरिक थेट एजन्सीचे कार्यालय गाठून सिलिंडरची मागणी करू लागले आहे. परंतु, ‘‘ऑनलाइन बुकिंग असेल तरच सिलिंडर मिळेल,’’ अशी भूमिका काही एजन्सी चालकांनी घेतल्यामुळे वादाचे प्रसंग घडत आहेत. असे चित्र बुधवारी शहरात अनेक ठिकाणी बघायला मिळाले.

एजन्सी कार्यालयांतील प्रत्यक्ष स्थिती
१. जाधववाडीतील एजन्सी कार्यालयात सकाळी गर्दी होती. दहानंतर गर्दी कमी झाली. डिलिव्हरी बॉय छोट्या टेम्पोतून सिलिंडर वितरणासाठी गेले होते.

२. मोशी प्राधिकरणातील कार्यालयात दोन-तीन नागरिक होते. टेम्पोतून सिलिंडर वितरणासाठी पाठवले होते. गर्दी नाही, पण सिलिंडर कमी मिळत असल्याचे कर्मचाऱ्यांनी सांगितले.

३. पिंपरी एमआयडीसीतील एजन्सी कार्यालयात दुपारी एकच्या सुमारासही गर्दी होती. ‘‘बुकिंग करूनही सिलिंडर मिळत नाही’’, ‘‘महिना होऊनही बुकिंग होत नाही,’’ अशा नागरिकांच्या तक्रारी होत्या.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com