शैक्षणिक मूल्यमापनात झेडपीच्या शाळा अव्वल

शैक्षणिक मूल्यमापनात झेडपीच्या शाळा अव्वल

Published on

पुणे, ता. २४ : राज्यस्तरीय शैक्षणिक मूल्यमापनात पुणे जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळांनी राज्यात अव्वल स्थान मिळवले आहे. राज्य शैक्षणिक संशोधन आणि प्रशिक्षण परिषदेच्या वतीने घेण्यात आलेल्या परीक्षेच्या अधिकृत डॅशबोर्डनुसार, महाराष्ट्रातील जिल्हा परिषद शाळांच्या श्रेणीमध्ये पुणे जिल्ह्याने सर्व घटकांमध्ये उच्च गुणवत्ता असल्याची माहिती जिल्हा परिषदेकडून देण्यात आली.

जिल्हा परिषद (प्राथमिक) श्रेणीत पुणे जिल्ह्याची तुलना अहिल्यानगर, सातारा, रत्नागिरी, सिंधुदुर्ग आणि कोल्हापूर या जिल्ह्यांशी करण्यात आली. वाचन, लेखन, संख्याज्ञान आणि संख्येवरील क्रिया या चारही घटकांमध्ये पुणे जिल्ह्याने सर्वाधिक टक्केवारी नोंदविली गेली. तुलनात्मक आकडेवारीनुसार इतर जिल्ह्यांच्या तुलनेत जिल्ह्याने सर्वच घटकांत सातत्यपूर्ण आणि सरस कामगिरी नोंदवली आहे. विशेषतः संख्याज्ञान या घटकात ९०.२९ टक्के गुणांसह राज्यात सर्वाधिक आघाडी घेतली आहे. याबाबत मुख्य कार्यकारी अधिकारी गजानन पाटील म्हणाले, ‘‘एससीईआरटीच्या राज्यस्तरीय मूल्यमापनात प्रथम क्रमांक मिळवणे ही सर्व शिक्षक, मुख्याध्यापक, शिक्षण विस्तार अधिकारी आणि पालक यांच्या संयुक्त प्रयत्नांची फलश्रुती आहे. गुणवत्तापूर्ण शिक्षण, नियमित शैक्षणिक निरीक्षण आणि विद्यार्थी केंद्रित उपक्रमांमुळे ही यशस्वी कामगिरी साध्य झाली आहे. आगामी काळातही जिल्हा परिषद शाळांची गुणवत्ता अधिक उंचावण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत.’’

पुणे जिल्हा परिषदेच्या शाळांची कामगिरी
वाचन -- ८३.१२ टक्के
लेखन -- ८१.८५ टक्के
संख्याज्ञान -- ९०.२९ टक्के
संख्येवरील क्रिया -- ८६.७९ टक्के

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com