अध्यक्षपदाचा निर्णय ‘कोअर कमिटी’च्या हाती
पुणे, ता. २६ : राज्य शासनाच्या आदेशानंतर पुणे जिल्हा परिषदेचे नवे पदाधिकारी २० मार्चपूर्वी निवडले जाणार हे स्पष्ट झाले आहे. जिल्हा परिषदेत राष्ट्रवादी काँग्रेसला स्पष्ट बहुमत असल्याने सत्तेची सूत्रे त्यांच्या हाती जाणे निश्चित आहे. त्यामुळे आता सर्वांचे लक्ष अध्यक्षपदावर खिळले आहे. निकाल जाहीर झाल्यापासून अध्यक्षपदासाठी इच्छुकांच्या नावांची जोरदार चर्चा सुरू आहे. मात्र, अंतिम निर्णय पक्षाच्या कोअर कमिटीच्या बैठकी नंतर असल्याची शक्यता आहेत. परिणामी जिल्हा परिषदेत इच्छुक पदाधिकाऱ्यांची नजर आता या बैठकीकडे लागली आहे.
राष्ट्रवादीला जिल्हा परिषदेत ७३ जागांपैकी ५१ ठिकाणी उमेदवार विजयी झाले. तर १३ पैकी आठ पंचायत समित्यांमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस हा सर्वांत मोठा पक्ष ठरला आहे. त्यामुळे निकालाच्या दिवसांपासून अध्यक्ष आणि सभापती पदांच्या निवडणुकीकडे सर्वांचे आहे. पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्षपदाबाबतचा निर्णय झाल्यानंतर पुढील काही दिवसांत कोअर कमिटीची बैठक होण्याची शक्यता व्यक्त होत आहे. ग्रामविकास विभागाने पहिली बैठक ही २० मार्च पूर्वी जिल्हा परिषद आणि पंचायत समितीची घेण्याचे जिल्हाधिकाऱ्यांना दिलेल्या आदेश दिले आहेत. निवडून आलेल्या सदस्यांचा कार्यकाळ हा पहिल्या बैठकीपासून सुरू होणार आहे. त्यामुळे लवकरच पंचायत समितीच्या सभापती निवडणुकीसाठी उपजिल्हाधिकाऱ्यांची नियुक्ती केली जाणार असून, त्यानंतर जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदाची निवडणूक होणार आहे. जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी हे पंचायत समित्यांच्या सभापती आणि उपसभापती निवडणुकीसाठी १३ उपजिल्हाधिकाऱ्यांची नियुक्ती करतील. त्यानंतर सर्व सदस्यांना नोटीस देऊन निवडणुकीचे वेळापत्रक जाहीर केले जाईल. पंचायत समितीच्या सभापती निवडणुकीनंतर पुढील सहा ते सात दिवसांमध्ये जिल्हा परिषदेच्या पदाधिकाऱ्यांची निवडणूक घेतली जाण्याची शक्यता आहे. सभापती आणि अध्यक्षपदाच्या निवडणुकीसाठी अर्ज दाखल करण्याची तारीख, माघार घेण्याची मुदत, मतदान आणि निकालाची तारीख पुढील काही दिवसात जाहीर केली जाईल, असे जिल्हा प्रशासनाच्या वतीने सांगण्यात आले आहे.
आता अध्यक्षपदासाठी होणार ओढाताण...
राष्ट्रवादी काँग्रेसची एक हाती सत्ता आली असली तरी अध्यक्ष पद मिळवण्यासाठी ओढाताण होणार हे निश्चित आहे. कारण आत्तापर्यंत ज्या तालुक्यांना अध्यक्षपद मिळाले नाही, त्या भागातून अधिक प्रमाणात प्रयत्न होण्याची शक्यता आहेच. दरम्यान, पक्षांतर्गत इच्छुकांची संख्या अधिक असल्याने राजकीय हालचालींना वेग आला आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

