''अच्छे दिन'' गेले कुठे?
पुणे, ता. १४ : जिल्ह्यात सध्या सर्वत्र व्यावसायिक गॅस सिलिंडरचा भीषण तुटवडा जाणवत असून याचे पडसाद घराघरांत आणि बाजारपेठेत उमटू लागले आहेत. घरगुती गॅस सिलिंडर मिळवण्यासाठी नागरिकांना रात्रीपासूनच एजन्सीबाहेर रांगा लावाव्या लागत आहेत. व्यावसायिक सिलिंडरच्या अनुपलब्धतेमुळे हॉटेल व्यवसाय धोक्यात आला असून खाद्यपदार्थांच्या दरात मोठी वाढ करण्यात आली असून अनेक पदार्थ गायब झाले आहेत. गॅससाठीची ही वणवण थांबण्याचे नाव घेत नसल्याने नागरिक हवालदिल झाले आहेत. काळ्या बाजाराला ऊत आला असल्याचे नागरिकांचे म्हणणे असून सामान्य ग्राहक मात्र हताश झाला आहे. पुरवठा सुरळीत न झाल्यास परिस्थिती अधिक बिकट होण्याची चिन्हे दिसत आहेत.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

