जुने वाहन चालविणे होणार महाग
सकाळ वृत्तसेवा
पिंपरी, ता. १६ ः शासनाने एक एप्रिल पासून पर्यावरण करात दुपटीने वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे. दुचाकी वाहनांवरील पर्यावरण कर दोन हजार रुपयांवरून वाढवून चार हजार रुपये करण्यात आला आहे. तर पेट्रोलवरील हलक्या मोटार वाहनांसाठीचा म्हणजे कारसाठीचा पर्यावरण कर तीन हजार रुपयांवरून सहा हजार रुपये करण्यात आला.
तर डिझेल कारवरील कर साडेतीन हजार रुपयांवरून सात हजार रुपये करण्यात आला आहे. त्यामुळे वाहनचालकांना भुर्दंड पडेल. जुन्या वाहनांमुळे प्रदूषणात वाढ होऊ नये म्हणून परिवहन कार्यालयामार्फत २०१० पासून पर्यावरण कर आकारला जात आहे. जुन्या वाहनांचा पर्यावरण कर भरून घेताना त्या वाहनामुळे प्रदूषण होत नाही ना, याची खात्री करून घेतली जाते. तसेच, सुरक्षित वाहतुकीसाठीचे निकष ते पूर्ण करीत असेल, तरच हा कर भरून घेतला जातो. मालवाहतूक आणि प्रवासी वाहतूक करणाऱ्या व्यावसायिक डिझेल वाहनांना (पिवळी नंबरप्लेट) आठ वर्षांनी, तर आठ वर्षांनंतर दरवर्षी पर्यावरण कर भरावा लागतो. मालवाहतूक आणि प्रवासी वाहतूक करणारी व्यावसायिक पेट्रोल आणि सीएनजी वाहनांना (पिवळी नंबरप्लेट) आणि खासगी वाहनांना १५ वर्षांनंतर पर्यावरण कर भरून फिटनेस चाचणी करून फिटनेस प्रमाणपत्र घेणे बंधनकारक आहे. त्यानंतर दर पाच वर्षांनी पर्यावरण कर भरावा लागतो. शासनाने आता या करात दुपटीने वाढ केली आहे. त्यामुळे जुने वाहन वापरणे चांगलेच ‘महागात’ पडणार आहे.
----------
...तर व्याजासह वसुली
मुदतीपूर्वी हा कर न भरल्यास प्रादेशिक परिवहन कार्यालयातर्फे हा दंड व्याजासह वसूल केला जातो. यासाठी प्रत्येक महिन्यास दोन टक्क्यांप्रमाणे व्याज आकारले जाते.
---------
-----------
कोणत्या वाहनाला किती कर?
वाहनाचा प्रकार, सध्याचे शुल्क, नवे शुल्क
दुचाकी ः २००० - ४०००
तीनचाकी ः ७५० - १५००
मालवाहतूक हलकी वाहने ः २५०० - ५०००
चारचाकी (पेट्रोल) ः ३००० - ६०००
चारचाकी (डिझेल) ः ३५०० - ७०००
-----
शासनाने पर्यावरण करतात वाढ केल्यामुळे जुनी वाहने असणाऱ्यांना आर्थिक फटका बसणार आहे. पेट्रोल, डिझेलच्या किमती स्थिर नाहीत आता करात देखील वाढ केली आहे. त्यामुळे व्यवसाय करणे वघड झाले आहे.
- राकेश कांबळे, वाहन चालक
---
आकडे बोलतात
३७ हजार ४३८ ः २०२५-२६ आर्थिक वर्षात पुनर्नोंदणी झालेली पिंपरी चिंचवड प्रादेशिक परिवहन विभागातील वाहने
८ कोटी ४५ लाख ५९ हजार ४५९ रुपये ः आरटीओला मिळालेला कर
१ कोटी ११ लाख ३० हजार ८३६ रुपये ः आरटीओने आकारलेला दंड
९ कोटी ५६ लाख ९० हजार रुपये ः आरटीओला मिळालेले एकूण उत्पन्न
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

