गुढीपाडव्यानिमित्त दुचाकी, एसयूव्हीना पसंती
सकाळ वृत्तसेवा
पिंपरी, ता. १८ ः साडेतीन मुहूर्तांमध्ये गणल्या जाणाऱ्या गुढीपाडव्याच्या दिवशी वाहन, वास्तू, वस्तू खरेदी शुभ मानली जाते. यंदा दुचाकीप्रमाणेच एसयूव्ही वाहनांनाही मोठी पसंती मिळत आहे.
यंदा गुरुवारी (ता. १९) गुढीपाडवा असल्याने वाहन खरेदीसाठी शहरातील शोरूममध्ये ग्राहकांची गर्दी होत आहे. विक्रेत्यांनीही ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी अनेक सवलती जाहीर केल्या आहेत. गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर वाहन घरी नेण्यासाठी नागरिक आधी आरक्षण करतात. त्यामुळे आधी माहिती घेऊन पसंतीचे वाहन निवडण्यासाठी शोरूमला सहकुटुंब भेट देत आहेत. दुचाकीप्रमाणेच ग्राहक आपल्या बजेटनुसार पेट्रोल, डिझेल आणि सीएनजी, इलेक्ट्रिकवरील चार चाकी वाहने खरेदी करीत आहेत. इलेक्ट्रिक वाहनांना मोठ्या प्रमाणावर मागणी आहे. ग्राहक वाहनाच्या वैशिष्ट्यांना (फीचर्स) जास्त महत्त्व देतात. नवनवीन फीचर्स असलेल्या वाहनांना पसंती मिळते, असे विक्रेत्यांनी सांगितले.
दुचाकींना मोठी मागणी
बाजारात विविध कंपन्यांच्या १०० ते २५० सीसीपर्यंतच्या दुचाकी विक्रीसाठी उपलब्ध आहेत. मोठ्या प्रमाणावर पुरवठा होत असल्याने दुचाकींची कमतरता नाही. त्यामुळे आरक्षणानंतर त्याच दिवशी किंवा दुसऱ्या दिवशी दुचाकी मिळते. डिझाइन, आरामदायक राइड आणि नवीन तंत्रज्ञानाला ग्राहकांचे प्राधान्य असल्याचे शोरूम व्यवस्थापक लक्ष्मण मिसाळ यांनी सांगितले.
एसयूव्हीना पसंती
चार चाकी वाहनांमध्ये उत्तमोत्तम पर्याय उपलब्ध आहे. मध्यम आकाराच्या एसयूव्हीना पसंती मिळते आहे. लुक, इंटेरियर, ग्राउंड क्लीअरन्स, स्पेस जास्त असल्याने ग्राहक तशी माहिती घेतात. काही एसयूव्ही वाहनांना तीन ते चार महिने प्रतिक्षा करावी लागत असल्याचे विक्रेत्यांनी सांगितले.
-----------
युद्धाबाबत ‘वेट ॲण्ड वॉच’
इराण आणि इस्राईल युद्धाच्या झळा अनेक क्षेत्रांना बसल्या आहेत. अनेकांचा व्यवसाय बंद करावा लागला आहे, तर अनेकांचे उत्पादन कमी झाले आहे. वाहन निर्मिती आणि विक्री क्षेत्रालाही झळ बसली आहे. युद्ध आणखी किती काळ चालेल, त्याचा परिणाम आणि घटलेले उत्पन्न त्यामुळे अनेकजण चौकशीसाठी येत असले तरी १० ते २० टक्के नागरिक वाहन खरेदीसाठी ‘वेट ॲण्ड वॉच’च्या भुमिकेत असल्याचे विक्रेत्यांनी सांगितले.
----------
गुढीपाडव्यानिमित्ताने अनेक नागरिक चारचाकी वाहनांच्या चौकशीसाठी येत आहेत आणि बुकिंग देखील करून जात आहेत. अनेकांनी पाडव्याच्या मुहूर्तावर वाहन घरी घेऊन जाण्यासाठी अगोदरच बुकिंग केले आहे.
- प्रशांत पोरे, उपमहाव्यवस्थापक, सेल्स ॲण्ड मार्केटिंग
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

