कळसमधील बैलगाडी निर्मितीचा व्यवसाय हद्दपार

कळसमधील बैलगाडी निर्मितीचा व्यवसाय हद्दपार
Published on

कळस, ता. २६ : कळस (ता. इंदापूर) हे गाव एकेकाळी बैलगाडी निर्मितीचे प्रमुख केंद्र म्हणून ओळखले जात होते. येथील कुशल सुतार कारागीर लाकडापासून मजबूत, टिकाऊ आणि देखण्या बैलगाड्या तयार करण्यात पटाईत होते. मात्र, आधुनिक तंत्रज्ञानाच्या वाढत्या प्रभावामुळे आणि शेतीतील बदलत्या पद्धतींमुळे, बदलत्या काळानुसार हा पारंपरिक व्यवसाय आता पूर्णपणे हद्दपार झाला आहे.
ब्रिटीश राजवटीपासून कळसमधील सुतार बांधवांची अनेक कुटुंबे या व्यवसायावर अवलंबून होती. गावातील सुतार कारागीर दिवस-रात्र मेहनत करून बैलगाड्या तयार करत. यांत्रिकीकरणाचा फारसा गंध नसलेल्या या काळात व दळण-वळणाचे प्रमुख साधन असलेल्या, बैलगाडी तयार करणारे कारागीर सुतार नेटावर हमखास दिसत असायचे. आताच्या डिजिटल युगातील संपर्क यंत्रणेसारखी त्याकाळी संपर्क यंत्रणा नसतानाही येथील बैलगाडी कोल्हापूर, पंढरपूर, अहिल्यानगर, सोलापूर भागातील अनेक शेतकऱ्यांच्या दारात पोचली होती.
मात्र कालांतराने शेतीत मोठ्या प्रमाणावर ट्रॅक्टर- ट्रॉली आणि इतर यांत्रिक साधनांचा वापर वाढला, त्यामुळे शेतकऱ्यांप्रती बैलगाडीचे महत्त्व कमी झाले. ज्याप्रमाणे ग्रामीण भागात शेतकऱ्यांच्या दारातील दिसणारी बैलजोडी यांत्रिकीकरणामुळे दिसेनासी झाली. तशी बैलांसोबत बैलगाडीही हद्दपार झाली आहे. पूर्वी मालवाहतूक, शेतीकाम आणि प्रवासासाठी वापरली जाणारी बैलगाडी आज केवळ परंपरेपुरती मर्यादित राहिली आहे.

यामुळे व्यवसायाकडे पाठ
- नव्या पिढीची पारंपरिक व्यवसायाला बगल
- अनेकांचा नोकरी, बांधकाम, फर्निचर किंवा इतर उद्योगांकडे कल
- व्यवसायातील अनिश्चितता, कमी उत्पन्न
- नव्या पिढीला या व्यवसायात रस उरलेला नाही.
- शिक्षण आणि नोकरीच्या संधी वाढल्या

पूर्वजांच्या पाच पिढ्यांनी बैलगाडी तयार करण्याचा व्यवसाय केला. ठराविक लोक यामध्ये निष्णात होते. बाभळ व सागाच्या लाकडांपासून टिकाऊ व मजबूत बैलगाडी तयार केली जात होती. महिन्याकाठी ५ ते ७ बैलगाड्या त्यावेळी तयार होत असतं. परंतु हा व्यवसाय बंद होऊन दोन दशकांचा कालावधी उलटला आहे. गावात वेगवेगळ्या क्षेत्रातील कुशल कारागिरांची संख्या मोठी होती.
- अशोक सुतार, कारागीर

3520

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com