

पुणे, ता. ६ : ‘‘जिल्हा परिषदेच्या महिला व बालकल्याण विभागाच्या सर्व योजना पात्र लाभार्थ्यांपर्यंत प्रभावीपणे पोहोचवून त्यांची काटेकोर अंमलबजावणी केली जाईल. विभागाचे काम अधिक लोकाभिमुख करण्यावर विशेष भर दिला जाईल,’’ अशी ग्वाही जिल्हा परिषदेच्या महिला व बालकल्याण सभापती अंकिता पाटील ठाकरे यांनी सोमवारी केले.
सभापतिपदाचा कार्यभार स्वीकारल्यानंतर पत्रकारांशी संवाद साधताना त्या बोलत होत्या. या वेळी उपमुख्य कार्यकारी अधिकारी आनंद खंडागळे उपस्थित होते. त्या म्हणाल्या, ‘‘जिल्ह्यात ‘आदिशक्ती’ अभियानाची अंमलबजावणी सुरू आहे. ग्रामस्तरावर महिलांच्या समस्या जाणून घेऊन त्यांचे संवेदनशील निवारण करणे, कुपोषण तसेच बाल व माता मृत्यूदर कमी करणे, किशोरवयीन मुलींमध्ये शिक्षणाचे प्रमाण वाढविणे, बालविवाहमुक्त व हिंसामुक्त समाज निर्माण करणे, ही या अभियानाची प्रमुख उद्दिष्टे आहेत. महिलांना शिक्षण, रोजगार, निर्णयप्रक्रिया आणि हक्कांमध्ये समान संधी उपलब्ध करून देत त्यांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्यावर भर दिला जात आहे. या अभियानासाठी ग्राम, तालुका आणि जिल्हास्तरावर त्रिस्तरीय समित्यांची स्थापना केली आहे. जिल्ह्यातील १३७० ग्रामपंचायतींनी या सहभाग नोंदविला असून, गुणांकनाची प्रक्रिया ऑनलाइन पद्धतीने सुरू आहे. तसेच, महिला व बालकल्याण विभागामार्फत लेक लाडकी योजना, बेटी बचाओ बेटी पढाओ अभियान, ग्राम बाल विकास योजना, तसेच महिलांसाठी विविध प्रशिक्षण योजना राबविल्या जात आहेत. पाचवी ते बारावी उत्तीर्ण मुलींसाठी संगणक प्रशिक्षण योजना देखील सुरू आहे. २०२३ नंतर जन्मलेल्या मुलींना १८ वर्षे पूर्ण झाल्यानंतर ‘लेक लाडकी’ योजनेतून एक लाख एक हजार रुपयांची मदत दिली जाणार आहे. महिलांच्या आरोग्यविषयक प्रश्नांवर विशेष लक्ष केंद्रित केले जाणार असून, अंगणवाडी केंद्रांना अधिक सुविधा उपलब्ध करून त्यांना आदर्श बनविण्याचा प्रयत्न केला जाईल.’’
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.