जिल्ह्यात विकसित नियोजन अक्षय ऊर्जा हब

जिल्ह्यात विकसित नियोजन अक्षय ऊर्जा हब
Published on

पुणे, ता. ७ : वाढते प्रदूषण रोखण्यासाठी आणि वाहतूक व्यवस्थेला चालना देण्यासाठी जिल्ह्यात इलेक्ट्रिक वाहन चार्जिंग स्टेशन तयार करण्यात येणार आहेत. या ठिकाणांना ऊर्जा उपाययोजनांसह ‘अक्षय ऊर्जा मॉडेल केंद्र’ करण्यावर या आर्थिक वर्षात जिल्हा परिषद भर देणार आहे. या उपक्रमामुळे पुणे जिल्हा शाश्वत ऊर्जेच्या वापरामध्ये रोल मॉडेल ठरणार आहे.


जिल्हा परिषदेच्या योजनेअंतर्गत उभारण्यात येणारी चार्जिंग स्टेशन केवळ वाहन चार्जिंगपुरती मर्यादित न राहता, त्यांना ‘मॉडेल अक्षय ऊर्जा हब’ म्हणून विकसित करण्यात येणार आहे. या केंद्रांमध्ये चार्जिंगसाठी लागणारी वीज सौरऊर्जा आणि बायोगॅससारख्या पर्यावरणपूरक स्रोतांमधून निर्माण केली जाणार आहे. त्यामुळे पारंपरिक विजेवरील अवलंबित्व कमी होऊन ऊर्जा बचतीसह पर्यावरण संरक्षणालाही चालना मिळणार आहे.
जिल्ह्यातील महामार्ग, शहरी भाग तसेच वर्दळीच्या ग्रामीण ठिकाणांची निवड करून ही केंद्रे उभा करण्याचे नियोजन आहे. यामुळे ईव्ही वापरणाऱ्या नागरिकांना सुलभ आणि जलद चार्जिंग सुविधा उपलब्ध होणार असून, इलेक्ट्रिक वाहनांच्या वापरात वाढ होण्यास मदत होईल, अशी अपेक्षा जिल्हा परिषद प्रशासनाला आहे.

प्रकल्पाचे वैशिष्ट्य...
- स्थानिक पातळीवर बायोगॅस निर्मिती करून वीज तयार होणार
- सौर पॅनेलच्या माध्यमातून दिवसा वीज निर्मिती होईल
- बायोगॅस प्रकल्पामुळे सातत्यपूर्ण ऊर्जा उपलब्ध राहणार
- मॉडेल केंद्रे ‘प्रात्यक्षिक केंद्र’ म्हणूनही कार्य करणार


रोजगारनिर्मितीला मिळणार चालना
नागरिक, स्थानिक स्वराज्य संस्था आणि विद्यार्थ्यांमध्ये अक्षय ऊर्जेबाबत जनजागृती केली जाणार आहे. ऊर्जा व्यवस्थापन, सौर तंत्रज्ञान आणि बायोगॅस प्रकल्पांविषयी प्रत्यक्ष प्रशिक्षण देण्याची संधी विद्यार्थ्यांना येथे मिळणार आहे. दरम्यान, या प्रकल्पामुळे स्थानिक पातळीवर रोजगारनिर्मितीलाही चालना मिळण्याची शक्यता आहे.

दृष्टिक्षेपात
- पहिल्या टप्प्यात दोन ठिकाणी ईव्ही चार्जिंग स्टेशन करण्याचा प्रस्ताव
- जिल्हा परिषदेच्या अर्थसंकल्पामध्ये ईव्ही चार्जिंग स्टेशन व अक्षय ऊर्जेवर भर
- चार्जिंगसाठी सौरऊर्जा आणि बायोगॅसवर आधारित वीज निर्मितीचा वापर
- महामार्ग, शहरी व वर्दळीच्या ठिकाणी धोरणात्मक पद्धतीने केंद्रांची उभारणी
- किफायतशीर दरात चार्जिंग सुविधा उपलब्ध होऊन ईव्ही वापराला चालना
- नागरिक, संस्था व विद्यार्थ्यांसाठी प्रात्यक्षिक केंद्रांद्वारे जनजागृती व प्रशिक्षण


स्वच्छ वाहतूक आणि शाश्वत ऊर्जा ही काळाची गरज आहे. या मॉडेल केंद्रांमुळे जिल्ह्यातील नागरिकांना फायदा होईल. पारंपरिक ऊर्जेला सक्षम, पर्यावरणपूरक पर्याय मिळेल.
- गजानन पाटील, मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com