‘झेडपी’च्या शाळांना आधुनिकतेची जोड

‘झेडपी’च्या शाळांना आधुनिकतेची जोड
Published on

पुणे, ता. १० : ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना आधुनिक व तंत्रज्ञानाधारित शिक्षणाची संधी उपलब्ध करून देण्यासाठी पुणे जिल्हा परिषदेने महत्त्वपूर्ण पाऊल उचलले आहे. मॉडेल स्कूल उपक्रमांतर्गत निवडक जिल्हा परिषद शाळांमध्ये ८८ अत्याधुनिक प्रयोगशाळा तयार करण्यात आल्या आहेत. यामुळे कृत्रिम बुद्धिमत्ता, इंटरनेट ऑफ थिंग्ज, रोबोटिक्स यांसारख्या आधुनिक तंत्रज्ञानाची ओळख विद्यार्थ्यांना शालेय स्तरावरच होणार आहे.
या प्रयोगशाळांमुळे ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना केवळ पाठ्यपुस्तकांपुरते मर्यादित न राहता प्रत्यक्ष प्रयोग, सिम्युलेशन आणि डिजिटल माध्यमातून शिकण्याची संधी मिळणार आहे. या उपक्रमांतर्गत विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष अनुभवातून शिक्षण मिळावे, यासाठी विविध प्रकारच्या प्रयोगशाळा उभारल्या आहेत. विद्यार्थ्यांचा कौशल्य विकास करणाऱ्या या प्रयोगशाळांमध्ये आधुनिक उपकरणे, डिजिटल साधने आणि प्रयोगावर आधारित शिक्षणाची सुविधा उपलब्ध करून दिली आहे. खानवडी (ता. पुरंदर) येथील ज्योती सावित्री जिल्हा परिषद शाळा उद्‍घाटन प्रसंगी प्रयोगशाळांचेही उद्‍घाटन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते होणार आहे. याबाबत प्राथमिक शिक्षणाधिकारी संजय नाईकडे यांनी सांगितले, ‘‘की जिल्हा परिषदेच्या या उपक्रमामागे विद्यार्थ्यांमध्ये कौशल्ये विकसित करणे हा प्रमुख उद्देश आहे. या प्रयोगशाळांच्या माध्यमातून विद्यार्थ्यांमध्ये नवोन्मेष, समस्या सोडवण्याची क्षमता आणि तांत्रिक कौशल्ये विकसित होण्यास मोठी मदत होणार आहे. अशा प्रकारच्या उपक्रमांमुळे गुणवत्तापूर्ण शिक्षण मिळणार आहे.’’

दृष्टिक्षेपात
- प्रयोगशाळांसाठी सुमारे १० कोटी रुपये
- एका प्रयोगशाळेसाठी साधारण १० लाख रुपयांचा खर्च
- प्रयोगशाळांमध्ये आणखी वाढ होणार
- जिल्हा परिषदेला प्रयोगशाळांसाठी सीएसआरचाही हातभार

ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना गुणवत्तापूर्ण आणि आधुनिक शिक्षण मिळावे, यासाठी जिल्हा परिषद सातत्याने प्रयत्न करत आहे. ८८ अत्याधुनिक प्रयोगशाळा हा त्याचाच एक महत्त्वपूर्ण भाग आहे. या प्रयोगशाळांमुळे विद्यार्थ्यांना केवळ पुस्तकांमधील ज्ञान न घेता प्रत्यक्ष प्रयोगांद्वारे शिकण्याची संधी मिळेल.
- गजानन पाटील, मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद

जिल्हा परिषदेच्या माध्यमातून शैक्षणिक गुणवत्तावाढीसाठी चांगले उपक्रम राबविण्यात येत आहेत. त्याचाच एक भाग या प्रयोगशाळा आहेत. स्पर्धात्मक काळात विद्यार्थ्यांना योग्य मार्गदर्शन शाळांमधून मिळण्यास मदत होणार आहे.
- वीरधवल जगदाळे, अध्यक्ष, जिल्हा परिषद

प्रयोगशाळा संख्या
रोबोटिक्स प्रयोगशाळा - २५
अटल टिंकरिंग प्रयोगशाळा - २५
एआर-व्हीआर प्रयोगशाळा - २६
खगोलशास्त्र प्रयोगशाळा - १२

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com