चौकांच्या रुंदीकरणाला प्राधान्य
पिंपरी : राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने (एनएचएआय) पुणे-नाशिक महामार्गावरील वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी पहिल्या टप्प्यात नाशिक फाटा ते राजगुरूनगरपर्यंत प्रमुख चौकांच्या रुंदीकरणाचा निर्णय घेतला आहे. काही चौकांमध्ये रुंदीकरणाऱ्या कामाला सुरुवात झाली असली, तरी ती अत्यंत संथ गतीने सुरू आहेत.
पुणे- नाशिक महामार्गाच्या रुंदीकरणाचा प्रस्ताव अनेक वर्षांपासून लालफितीत अडकला आहे. या महामार्गावर कोंडी आणि अपघातांचे प्रमाण वाढले आहे. दिवसेंदिवस गंभीर स्थिती होत आहे. या संदर्भात वारंवार आंदोलने करून नागरिकांनी शासन व प्रशासनाचे लक्ष वेधले आहे. उपाय म्हणून केंद्र शासनाने नाशिक फाटा ते राजगुरूनगरपर्यंत आठ पदरी उन्नत आणि दहा पदरी जमिनीवरील रस्ता प्रस्तावित आहे.
सद्यस्थिती
१) राष्ट्रीय महामार्गाकडून तब्बल ७ हजार ८२७ कोटी रुपयांची निविदा प्रसिद्ध केली आहे. परंतु, प्रत्येक वेळेस तांत्रिक कारणे देऊन निविदा प्रक्रियेला वारंवार मुदतवाढ दिली जात होती. अखेर शुक्रवारी (ता. ६) निविदा उघडण्यात आल्या आहेत. मात्र, उन्नत मार्गाचे काम कोणाला द्यायचे यावर अजून निर्णय झालेला नाही.
२) आंबेठाण चौक, रोहकल फाटा आणि स्पायसर चौक रुंदीकरणाच्या कामाला सुरुवात झाली आहे. चौकातील गॅस पाईपलाईन, इलेक्ट्रिकल पोल शिफ्टिंगचे काम सुरू आहे. चौक रुंदीकरणासाठी काही ठिकाणी खडी टाकली आहे. मात्र, हे काम अत्यंत संथ गतीने सुरू आहे. रस्त्यावर खडी टाकली असून डांबरीकरणाअभावी दुचाकी घसरून अपघात होत आहे. वाहतूकही संथ होऊन नागरिक, वाहनचालक त्रस्त आहेत.
अशाही हालचाली
उन्नत मार्गाच्या कामाला दोन ते तीन वर्षांचा कालावधी लागणार आहे. त्यामुळे कोंडीतून तत्काळ सुटकेसाठी नाशिक फाटा ते राजगुरूनगरदरम्यानच्या प्रमुख पाच चौकांच्या रुंदीकरणाचा आणि चाकणमधील आळंदी फाटा ते स्पायसर चौकापर्यंतच्या सुमारे अर्धा मीटर अंतरावर (५.५० मीटर रुंद) एक मार्गिका वाढवण्याचा निर्णय घेतला आहे.
महत्त्वाचे चौक
चिंबळी फाटा, स्पायसर चौक, आळंदी फाटा, आंबेठाण चौक आणि रोहकल फाटा या चौकांचे रुंदीकरण प्राधान्याये केले जाणार आहे. चौकांमधून ‘फ्री लेफ्ट’, ‘क्रॉस ड्रेन’, चौकांना जोडणाऱ्या रस्त्यांची मार्गिका वाढविण्यात येणार आहे.
कोंडी सोडविण्यास प्राधान्य
‘‘वाहतूक कोंडी सोडविण्यासाठी पाच चौक विकसित करण्यात येत आहेत. चौकातून फ्री लेफ्ट, एक लेन वाढविणे, पावसाचे पाणी वाहून नेणाऱ्या नलिका टाकण्याचे काम सुरू आहे. मात्र, गॅसवाहिनी, इलेक्ट्रिकल पोल शिफ्टिंगसाठी अडचणी आहेत. त्यावर काम सुरू आहे,’’ ‘एनएचएआय’च्या अधिकाऱ्यांनी सांगितले.
नाशिक फाटा-राजगुरूनगर महामार्ग
अंतर : २८ किलोमीटर
प्रमुख चौक : १४
---
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

