पाणी टंचाई रोखण्यासाठी पाऊल पडते पुढे
पुणे, ता. ९ : जिल्ह्यात यंदाच्या उन्हाळ्यात संभाव्य पाणी टंचाईचा सामना करण्यासाठी तब्बल ७७६ गावांमध्ये टंचाई निवारणाच्या उपाययोजना राबविण्याचा जिल्हा प्रशासनाने आराखडा तयार केला आहे. त्याअंतर्गत तीन हजार ३३० कामे प्रस्तावित आहेत. विंधन विहिरी घेणे, नळपाणी योजनांची दुरुस्ती, टँकरद्वारे पाणीपुरवठा, खासगी विहिरी अधिग्रहित करणे तसेच स्रोत बळकटीकरण अशा विविध उपाययोजनांसाठी सुमारे ३५ कोटी ६४ लाख रुपयांचा खर्च अपेक्षित आहे.
जिल्हा प्रशासनाने तयार केलेल्या टंचाई निवारण आराखड्यात संभाव्य टंचाईग्रस्त गावांचा आढावा घेऊन उपाययोजना प्रस्तावित केल्या आहेत. पिण्याच्या पाण्याची समस्या लक्षात घेऊन विंधन विहिरी घेणे आणि टँकरद्वारे पाणीपुरवठा यावर भर देण्यात आला आहे. आराखड्यानुसार सर्वाधिक कामे टँकरने पाणीपुरवठा करण्याची प्रस्तावित आहे.
दरम्यान, जिल्हा परिषदेकडून तयार करण्यात आलेल्या आराखडा जिल्हाधिकाऱ्यांकडे मंजुरीसाठी पाठविण्यात येणार आहे. त्यानंतर तांत्रिक मान्यता झाल्यानंतर निविदा प्रक्रिया पूर्ण होणार असल्याची माहिती प्रशासनाकडून देण्यात आली.
टँकरची व्यवस्था
२३८....... गावे
१२००....वाड्या
एक हजार ३७३ कोटी ५५ लाख रुपये.... अपेक्षित खर्च
ही कामे कामे प्रस्तावित
विंधन विहिरींची दुरुस्ती
नवीन विंधन विहिरी
नळपाणी योजनांची दुरुस्ती
खासगी विहिरी अधिग्रहित करणे
विहिरींचे खोलीकरण, गाळ काढणे
ठिकाणी स्रोत बळकटीकरण
टंचाई होण्यापूर्वीच प्रस्ताव तयार
ज्या गावांमध्ये कायमस्वरूपी योजना तातडीने सुरू करणे शक्य नाही, त्या ठिकाणी तात्पुरत्या नळपाणी पुरवठा योजना सुरू करण्याचाही प्रस्ताव आहे. उन्हाळ्यात टंचाई तीव्र होण्यापूर्वीच कामे सुरू करण्यासाठी हा प्रस्ताव तयार करण्यात आला आहे. गेल्या काही वर्षांत पावसाचे अनियमित प्रमाण, घटलेली भूजलपातळी आणि वाढती पाण्याची मागणी यामुळे जिल्ह्यात दरवर्षी टंचाईची समस्या निर्माण होत आहे. यंदा आगाऊ नियोजन करण्यात आल्याने टंचाई भासल्यास त्याची तीव्रता कमी होण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
उपाययोजना --- योजनांची संख्या --- अपेक्षित खर्च (लाखात)
विंधन विहिरी -- २७५ -- १५३.९५
नळ पाणीपुरवठा योजनांची दुरुस्ती -- ६१ -- ७९५.८०
विंधन विहिरींची दुरुस्ती -- ११९९-- ३९०.४४
तात्पुरत्या नळ पाणी पुरवठा योजना -- ७ -- ९८
टँकरने पाणी पुरवठा -- १४६० -- १३७३.५५
खासगी विहीरी अधिग्रहीत करणे -- १८४ -- १२९.१०
विहिरीचे खोलीकरण किंवा गाळ काढणे -- ७१ -- ७१.३०
स्रोत बळकटीकरण -- ४३ -- ५५२.३०
एकूण -- ३,३३० --- ३५६४.४
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

