

पिंपरी, ता. १२ : भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त मंगळवारी (ता. १४) पिंपरी चिंचवड पोलिस आयुक्तालयाच्या हद्दीत विविध ठिकाणी मिरवणुका काढण्यात येणार आहेत. तसेच पिंपरी व दापोडी येथे भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास अभिवादन करण्यासाठी मोठ्या संख्येने अनुयायी येत असतात. त्यामुळे मिरवणूक मार्गावरील तसेच अभिवादन ठिकाणाकडे येणाऱ्या मार्गावरील वाहतूक पर्यायी मार्गाने वळविण्यात येणार आहे. हा बदल दुपारी बारा ते रात्री दहा या कालावधीसाठी असेल, तरी नागरिकांनी प्रवासासाठी पर्यायी मार्गांचा वापर करावा, असे आवाहन वाहतूक विभागाने केले आहे.
प्रवेश मनाई असलेले मार्ग व कंसात पर्यायी मार्ग
- चिंचवडमधील लोकमान्य रुग्णालय चौकाकडून महावीर चौक (लोकमान्य रुग्णालय चौकापासून डावीकडे वळून दळवीनगर तसेच महावीर चौकातून डावीकडून वळून)
- रिव्हर व्हयू चौकाकडून महावीर चौक (चिंचवड फार्म मार्गाने वाल्हेकरवाडी, रावेतमार्गे मुंबईकडे जातील तसेच भोसरीकडे जाणारी वाहने ही बिजलीनगर चौक, संभाजी चौक, भक्ती-शक्ती चौक मार्गे)
- बसवेश्वर चौकाकडून महावीर चौक (केएसबी चौकाकडून येणारी वाहने सायन्स पार्कमार्गे)
- महावीर चौकाकडून डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौकाकडे सेवा रस्त्याने येण्यास (डी मार्ट इनग्रेड सेपरेटर मार्गे, डी मार्ट पंक्चर येथून डाव्या बाजूने ऑटो क्लस्टरमार्गे)
- नाशिक फाट्याकडून डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक (डेअरी फार्म ग्रेड सेपरेटर इन व एचपी पंप खराळवाडी ग्रेड सेपरेटर इन तसेच कृष्णा हॉटेल येथून डाव्या बाजूने वळून साई चौक)
- नेहरूनगर चौकाकडून एच ए कॉर्नर (रहिवाशांच्या वाहनांव्यतिरिक्त इतर वाहने नेहरूनगर चौकातून वल्लभनगर तसेच नेहरूनगरमार्गे)
- रसरंग चौकाकडून एच ए कॉर्नर व पिंपरी चौक (रसरंग चौकाकडून येणारी वाहतूक एच ए कॉर्नर येथून डाव्या बाजूस वळून नेहरूनगर चौक)
- सम्राट चौकाकडून जयमल्हार खानावळ समोरून मोरवाडी चौक (रसरंग चौकाकडून येणारी वाहतूक सम्राट चौकातून उजव्या बाजूस वळून जुने मोरवाडी न्यायालयमार्गे)
- पिंपरीतील महापालिका आऊटगेट येथून डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक (गांधीनगर कॉर्नरमार्गे एच ए कॉर्नर)
- चिंचवड सायन्स पार्ककडून मोरवाडी चौकाकडे सेवा रस्त्याने येण्यास (सायन्स पार्क/ऑटो क्लस्टरकडून येणारी वाहतूक जिजामाता चौक व मदर टेरेसा पुलावरून)
- क्रोमा शोरूमकडून गोकूळ हॉटेल (मोरवाडी चौकाकडून क्रोमा शोरूमकडे येणारी वाहने पिंपरी पूलमार्गे)
- पिंपरीतील गोकूळ हॉटेल येथून डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक पिंपरी पूलमार्गे)
- दापोडीतील हॅरिस पूल ते फुगेवाडी चौक सेवा रस्ता (हॅरिस पुलावरून ग्रेड सेपरेटरमार्गे)
- बोपोडी संविधान चौकाकडून दापोडी छत्रपती शिवाजी महाराज पुतळा (हॅरिस पूल दापोडीमार्गे)
- शितळादेवी चौकाकडून दापोडीगाव (शितळादेवी चौकाकडून सांगवी मार्गे)
- देहूरोडमधील शितळानगर येथील शिवाजी विद्यालय देहूरोड जामा मस्जिद स्वामी चौक (देहूरोड गावातील अंतर्गत रस्त्याचा वापर)
- गुरुद्वारा ते देहूरोड सुभाष चौक-भाजी मंडई-सवाना चौक (गावातील अंतर्गत रस्ते)
- देहूरोड रेल्वे पूल सवाना चौकाकडे सेवा रस्ता (सेंट्रल चौकमार्गे तसेच अंतर्गत रस्ता)
- गुरुद्वारासमोरील गावात जाणारा अंतर्गत मार्ग व पुलालगत गावात जाणारा सेवा रस्ता (गावातील अंतर्गत रस्ते)
- देहूतील मुख्य कमान ते छत्रपती शिवाजी महाराज चौक-श्री संत तुकाराम महाराज मंदिर-चौदा टाळकरी कमान (गावातील अंतर्गत रस्ते)
- चाकण चौकाकडून महात्मा फुले चौक व नेहरू चौक (माणिक चौक- मेदनकरवाडी मार्गे, तळेगाव चौक-आंबेठाण चौकमार्गे)
- आंबेठाण चौक बाजूकडून महात्मा फुले चौक (चाकण तळेगाव चौकातून मेदनकरवाडी चौकमार्गे शिक्रापूर रस्ता)
- मार्केट यार्ड चाकण बाजूकडून नेहरू चौक (आंबेठाण चौकमार्गे चाकण चौक)
- नेहरू चौकाकडून शनी मंदिर रस्ता (आंबेठाण चौकमार्गे चाकण व बीड वस्तीमधून खंडोबा माळ चौकातून मेदनकरवाडीमार्गे)
- दिघीतील मॅक्झिन चौक-बोपखेल फाटा मार्गे पुणे बाजूकडे (मॅक्झिन चौक येथून उजवीकडे वळून भोसरीमार्गे, मॅक्झिन चौक येथून डावीकडे वळून अलंकापुरममार्गे)
- मोशी येथे पुणे-नाशिक महामार्गावरून छत्रपती शिवाजी महाराज चौक मोशी येथे येण्यास (भारतमाता चौक येथून)
- वाय पॉइंट कुदळेवस्ती येथून अनुष्का सोसायटी तसेच छत्रपती शिवाजी महाराज चौक मोशी येथे येण्यास (भारतमाता चौक येथून इच्छितस्थळी जातील)
- निगडीतील भक्ती-शक्ती उड्डाणपुलावरून पिंपरीच्या दिशेने जाण्यास जड-अवजड वाहनांना प्रवेश बंदी (भक्ती शक्ती सर्कल-अंकुश चौक-त्रिवेणीनगर चौक, दुर्गानगर चौक-थरमॅक्स चौक-केएसबी चौक-भोसरी मार्गे)
रहाटणी, पिंपळे सौदागर परिसर (वेळ दुपारी चार ते रात्री दहा)
- रहाटणी फाटा चौक ते छत्रपती शिवाजी महाराज पुतळा चौक- रहाटणी गाव (रहाटणी फाटा चौक बाजूकडून छत्रपती शिवाजी महाराज पुतळा चौक (रहाटणी गाव) बाजूकडे येणारी जाणारी वाहतूक काळेवाडी फाटामार्गे)
- कुणाल हॉटेल ते नखाते वस्ती चौक बाजूकडे येणाऱ्या जाणाऱ्या मार्गावर (काळेवाडी फाटामार्गे)
- महादेव मंदीर/पिंपळे सौदागर पोलिस चौकी ते रहाटणी फाटा (महादेव मंदीर/पिंपळे सौदागर पोलिस चौकी येथून पी के चौकाकडून)
- जीवनज्योती रुग्णालयजवळील टी पॉइंट ते छत्रपती शिवाजी महाराज पुतळा चौक-रहाटणी गाव (जीवनज्योती रुग्णालय जवळील टी पॉइंट ते पी.के. चौक)
---
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.