

पुणे, ता. १ : जिल्हा परिषद शाळांमधील विद्यार्थ्यांची पायाभूत साक्षरता आणि संख्याज्ञानाचा स्तर उंचावण्यासाठी राबविण्यात आलेला ‘निपुण पुणे’ हा उपक्रम पुढील वर्षीही राबविण्यात येणार आहे. या उपक्रमांतर्गत शाळांमध्ये प्रत्येक महिन्याला परीक्षा, त्वरित मूल्यमापन या संदर्भात काटेकोर आढावा घेण्यात येणार आहे.
‘निपुण पुणे या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांच्या गुणवत्तेत सुधारणा झाली. जिल्ह्यातील ३ हजार ५२१ शाळांमधील एक लाख ४२ हजार ३४८ विद्यार्थ्यांचा या उपक्रमात समावेश केल्याचे शिक्षण विभागाकडून सांगण्यात आले. विद्यार्थ्यांची प्रगती सातत्याने मोजता यावी यासाठी दरमहा परीक्षा घेण्याची पद्धत सुरू केली आहे. या परीक्षांमुळे प्रत्येक विद्यार्थ्याच्या शिकण्याच्या स्तराचे अचूक आकलन होऊ लागले आहे. विशेष म्हणजे, परीक्षा झाल्यानंतर लगेचच शिक्षकांना विद्यार्थ्यांच्या कौशल्यांचा तपशील नोंदवता यावा, यासाठी त्वरित नोंदणी आणि देखरेख व्यवस्था विकसित केली आहे.
गणित आणि भाषा पेटी...
प्रावीण्य निकष पूर्ण करणाऱ्या शाळांची संख्या सहा महिन्यांत ३८१ वरून एक हजार ९८४ पर्यंत वाढली आहे. त्याचप्रमाणे प्रवीण विद्यार्थ्यांची संख्या ४५ हजार ९१९ वरून ९१ हजार ८७९ पर्यंत दुपटीने वाढली आहे. या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांच्या शिकण्यात असलेली तफावत लगेच ओळखणे शक्य झाले आहे. त्यामुळे परीक्षा झाल्यानंतर अवघ्या ४८ तासांच्या आत संबंधित विद्यार्थ्यांसाठी सुधारणेच्या दृष्टीने उपाययोजना सुरू करता येत आहेत. वर्गात शिकवणी अधिक प्रभावी व्हावी यासाठी ‘गणित पेटी’ आणि ‘भाषा पेटी’सारखी साधने वापरली जात असून, तीही मूल्यमापनाशी जोडली आहेत.
दृष्टीक्षेपात
- जिल्हा तसेच गट स्तरावर दरमहा गुणवत्ता आढावा बैठक घेण्याची पद्धत
- शिक्षकांना मार्गदर्शन करण्यासाठी विशेष साहाय्य व्यवस्था
- शिक्षक, मुख्याध्यापक, गटस्तरीय अधिकारी, जिल्हा प्रशासन यांच्यासाठी स्वतंत्र माहितीफलक
- जिल्हा परिषदेने पायाभूत शिक्षणाच्या निरीक्षणासाठी डिजिटल प्रशासन आराखडा
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.