लोकप्रतिनिधींना प्रशिक्षणाची गरज

लोकप्रतिनिधींना प्रशिक्षणाची गरज
Published on

पीतांबर लोहार ः सकाळ वृत्तसेवा
पिंपरी, ता. २ : लोकनियुक्त प्रतिनिधींच्या हाती तब्बल चार वर्षांच्या खंडानंतर महापालिकेचा कारभार आला आहे. मात्र, सभाशास्र सर्वांना अवगत नसल्याचे चित्र आहे. कारण, पीठासीन अधिकाऱ्यांनी परवानगी न देताच बोलायला सुरुवात करणे, एका वेळेस दोघा-तिघांनी बोलायला उभे राहणे, पीठासीन अधिकाऱ्यांकडे दुर्लक्ष करून सभागृहाबाहेर जाणे किंवा येणे, एकमेकांची खिल्ली उडवणे, महिला प्रतिनिधी विचार मांडत असताना आपापसांत बोलणे, पीठासीन अधिकाऱ्यांचे न ऐकणे, उलट उत्तर देणे, महिलांविषयी अपशब्द वापरणे असे प्रकार घडत आहेत. त्यामुळे बहुतांश कारभाऱ्यांना सभाशास्राचे धडे देण्याची अर्थात त्यांच्या प्रशिक्षणाची गरज आहे.
महापालिकेत २०१७ मध्ये निवडून आलेल्या लोकप्रतिनिधींची मुदत १३ मार्च २०२२ रोजी संपली. कोविड प्रतिबंधक नियम, इतर मागासवर्गीय आरक्षणाचा न्यायप्रविष्ट मुद्दा, राज्यातील बदलती समीकरणे यामुळे वेळेत निवडणूक होऊ शकली नाही. त्यामुळे १४ मार्च २०२२ पासून प्रशासक म्हणून आयुक्तांनी कामकाज पाहिले. आता निवडणूक होऊन सहा फेब्रुवारी २०२६ पासून लोकप्रतिनिधींनी कारभार हाती घेतला आहे. मात्र, त्यात बहुतांश सदस्य नवीन आहेत. त्यांच्यासह बेताल वक्तव्य करणाऱ्या अनुभवींनाही सभाशास्राचे धडे देण्याची गरज आहे. कारण, महापालिकेच्या आतापर्यंत दोन सर्वसाधारण सभा झाल्या आहेत. त्यांत काहींचे वागणे आणि बोलणे चुकीचे ठरले आहे.

असे आहेत सभासद
प्रकार / महिला / पुरुष / एकूण
नवीन / ३८ / १९ / ५७
अनुभवी / २६ / ४५ / ७१
एकूण / ६४ / ६४ / १२८

चुकीचे वागणे, बोलणे बरं नव्हे
- सभागृहात येताना-जाताना पीठासीन अधिकाऱ्यांना हात व मानेने अभिवादन करणे, काही सदस्यांकडून होत नाही
- हात वर करून बोलण्याची परवानगी घ्यावी, मात्र अनेकजण थेट उभे राहून बोलतात, एकावेळी दोघे-तिघे सुरुवात करतात
- किती वेळ बोलू द्यावे, हे पीठासीन अधिकारी ठरवतात, मात्र, एका सदस्याने ‘नेत्यांनी मला एक तास दिला आहे’ असे म्हणत बोलणे सुरूच ठेवणे
- स्मार्ट सिटीवर बोलताना महिलांच्या सौंदर्याचा शब्द प्रयोग पुरुष सदस्याने केला, त्यावर महिला सदस्यांनी आक्षेप घेतल्यानंतर शब्द मागे
- सर्व कार्यवाही मराठीतून अपेक्षित आहे. मराठी येत नसल्यास पीठासीन अधिकाऱ्यांची परवानगीने इंग्रजी किंवा हिंदी बोलता येईल, परंतु परवानगी न घेता आणि मराठी बोलता येत असतानाही इंग्रजी, हिंदीचा काही सदस्यांकडून वापर
---

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com