तरूणीच्या आत्महत्येप्रकरणी तरूणीवर गुन्हा दाखल

तरूणीच्या आत्महत्येप्रकरणी
तरूणीवर गुन्हा दाखल
Published on

पुणे, ता. ४ ः विवाहाच्या आमिषाने फसवणूक केल्याने तरुणाने आत्महत्या केल्याची घटना घडली. तरुणाला आत्महत्येस प्रवृत्त केल्याच्या आरोपावरून एका तरुणीवर फुरसुंगी पोलिसांनी गुन्हा दाखल केला. याबाबत तरुणाचे वडील राजेंद्र पांडुरंग मेमाणे (वय ६३, रा. पारगाव मेमाणे, ता. पुरंदर) यांनी फुरसुंगी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, श्रेया दादासाहेब खोपडे (रा. आंबवडे, ता. भोर) हिच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तरुण आणि आरोपी तरुणीचे प्रेमसंबंध होते. तिने त्याला विवाहाचे आमिष दाखवले होते. हडपसर परिसरातील एका सराफी पेढीतून तिने ५० हजार रुपयांचे सोन्याचे दागिने खरेदी केले होते. त्यानंतर तिने तरुणाला त्रास देण्यास सुरुवात केली. त्याच्या त्रासामुळे मुलाने आत्महत्या केली, असे फिर्यादीत म्हटले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com