
‘कृषी उद्योजकते’बाबत उद्या पुण्यात कार्यशाळा
पिरंगुट, ता. ५ : पुणे येथील ‘रामकृष्ण हरी कृषी प्रतिष्ठान’च्यावतीने शनिवारी (ता. ७) शेतकऱ्यांसाठी व्यवसाय मार्गदर्शन कार्यशाळेचे आयोजन केले आहे. दुपारी ४ ते सायंकाळी ७ या दरम्यान आयोजित केलेली ही कार्यशाळा सिद्धी साज, सिद्धी बँक्वेट हॉलसमोर, डी पी रोड, म्हात्रे पुलाजवळ, एरंडवणे, पुणे येथे होणार आहे. या कार्यशाळेत ‘आपण निर्यात करू शकतो का?’ या विषयावर अभिजित शिंदे हे व ‘कृषी उद्योजकता निर्मिती व शेतकरी उत्पादक कंपनी संधी’ या विषयावर भूषण निकम हे मार्गदर्शन करणार आहेत, अशी माहिती इम्पोर्ट एक्स्पोर्ट फेडरेशनचे संस्थापक अभिजित शिंदे यांनी दिली.
यावेळी अॅग्रोकेअर ग्रुपचे अध्यक्ष भूषण निकम, मंदार चिकणे आदी उपस्थित होते. या कार्यशाळेत सहभागासाठी शेतकऱ्यांनी मंदार चिकणे यांच्याशी ७०३००८८२२२ व सूरज मुरकुटे यांच्याशी ८४८४८६९६९९ या क्रमांकावर संपर्क साधावा. तसेच, पूर्व नोंदणीसाठी https://bit.ly/RKH_Agri या लिंकचा वापर करावा.