वेगऱ्याच्या सरपंचांचे पद, सदस्यत्वही रद्द | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

वेगऱ्याच्या सरपंचांचे 
पद, सदस्यत्वही रद्द
वेगऱ्याच्या सरपंचांचे पद, सदस्यत्वही रद्द

वेगऱ्याच्या सरपंचांचे पद, सदस्यत्वही रद्द

sakal_logo
By

पिरंगुट, ता. २५ : वेगरे (ता. मुळशी) येथील ग्रामपंचायतीचे सरपंच मीननाथ कानगुडे यांचे सदस्यत्व रद्द करण्याचा आदेश जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी दिला आहे. त्यामुळे त्यांचे सरपंचपद व सदस्यत्वही रद्द केले आहे.
वेगरे ग्रामपंचायतीच्या एप्रिल २०२२ मध्ये झालेल्या तहकूब ग्रामसभेत माजी सरपंच भाऊ मरगळे यांच्याबरोबर झालेल्या हाणामारीत सरपंच कानगुडे यांना सहा महिने अटक झाली होती. त्यानंतर मुंबई उच्च न्यायालयाने कानगुडे यांना ऑक्टोबर २०२२ मध्ये जामीन मंजूर केला, परंतु पुढील आदेश होईपर्यंत वेगरे गावात येण्यास मनाई केली होती. त्यामुळे ते मे २०२२ ते ऑक्टोबर २०२२ या कालावधीत ग्रामपंचायतीच्या सलग सहा मासिक सभांना अनुपस्थित होते. त्या कालावधीत ते एकदाही गावात आले नाहीत. त्यामुळे जिल्हा परिषदेचे प्रशासक आयुष्य प्रसाद यांनी १५ फेब्रुवारी २०२३ पासून त्यांना वेगरे ग्रामपंचायतीच्या सदस्यपदी राहण्यास अपात्र ठरविले आहे.