नांदे येथे एस.जे. कंपनीच्या गोदामाला आग | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

नांदे येथे एस.जे. कंपनीच्या गोदामाला आग
नांदे येथे एस.जे. कंपनीच्या गोदामाला आग

नांदे येथे एस.जे. कंपनीच्या गोदामाला आग

sakal_logo
By

पिरंगुट, ता. ५ : नांदे (ता.मुळशी) येथील एस. जे. कन्स्ट्रक्शन कंपनीतील गोदामाला आज रविवारी (ता. ५) दुपारी बारा वाजता आग लागली. मात्र रविवारची सुट्टीचा दिवस असल्याने कोणतीही जीवितहानी झाली नाही. या आगीत कंपनीतील एसीचे फायबर शीट जळून खाक झाले. त्यामुळे सुमारे पंचवीस ते तीस लाख रुपयांचे नुकसान झाल्याची माहिती सरपंच निकिता रानवडे यांनी दिली.

शॅार्ट सर्किटमुळे ही आग लागली असण्याचा प्राथमिक अंदाज आहे. आग लागल्याची माहिती समजताच नांदे गावच्या ग्रामविकास समितीचे रोहिदास रानवडे, युवा कार्यकर्ते शेखर रानवडे यांनी माण येथील फेज थ्री येथील जीएमआरडीएच्या तसेच मारुंजी येथील अग्निशमन दलाच्या केंद्राशी तातडीने संपर्क साधला. अग्निशमन दलाचे जवान घटनास्थळी दाखल झाले व अवघ्या अर्ध्या तासातच आग आटोक्यात आली.
आग आटोक्यात आणण्यासाठी भानुदास करंजावणे, सुनील जाधव, हनुमंत करंजावणे, योगेश शिंदे, सागर जाधव, शिवाजी रानवडे, लक्ष्मण चांगले, राजेंद्र आमले तसेच नांदे ग्रामस्थांनी शर्थीचे प्रयत्न केले.
................
01839