व्यसनमुक्तीचा वसा हाती घेतलेले स्वयंभू निळकंठेश्वर देवस्थान

व्यसनमुक्तीचा वसा हाती घेतलेले स्वयंभू निळकंठेश्वर देवस्थान

Published on

व्यसनमुक्तीचा वसा हाती घेतलेले निळकंठेश्वर देवस्थान

गुरुवर्य शिवभक्त शंकर रंगनाथ सर्जे मामा यांनी डावजे (ता. मुळशी) येथे श्री क्षेत्र स्वयंभू निळकंठेश्वर देवस्थान (देवभूमी) परिसराची निर्मिती केली व व्यसनमुक्तीच्या कार्याचा वसा हाती घेतला. देशभर व्यसनमुक्तीसाठी प्रसिद्ध असलेल्या या तीर्थक्षेत्राच्या धार्मिक व शैक्षणिक ट्रस्टच्या माध्यमातून विनामूल्य व्यसनमुक्ती, धार्मिक, सामाजिक, शैक्षणिक कार्याचा नंदादीप १९६२ पासून अविरतपणे इतरांना प्रकाशित करीत आहे. ''व्यसनमुक्त भारत - सशक्त भारत'' या यज्ञामुळे सुमारे दोन कोटीहून अधिक जणांच्या जीवनाला नवी दिशा मिळाली आहे.
..................................


श्री क्षेत्र स्वयंभू निळकंठेश्वर देवस्थान मंदिराची निर्मिती हा एक अलौकिक आणि अद्‌भूत चमत्कार आहे. पुरंदरमधील मोरगाव गणपती येथे जन्मलेल्या गुरुवर्य शिवभक्त शंकर रंगनाथ सर्जे मामा यांना लहानपणापासून परमेश्वर भक्तीची गोडी होती. सिंहगड वनक्षेत्रात वनसंरक्षक पदावर कार्यरत असताना सहा मार्च १९६२ रोजी परमपूज्य गुरुवर्य सर्जे मामांच्या आयुष्याला कलाटणी मिळाली. डावजे वनक्षेत्रात गस्त घालताना साक्षात परमेश्वराचा प्रचंड ऊर्जेचा ध्वनी त्यांच्या कानी आला. "ऊठ सावध हो, मला तहान लागली आहे. पाणी पाज " या आकाशवाणीनंतर खोदकामात स्वयंभू शिवलिंग व नंदीची प्राप्ती झाली. निळकंठेश्र्वर मंदिरात लाखो भाविकांच्या उपस्थितीत महाशिवरात्री, शिवलिंग प्रकट दिनानिमित्त, महारुद्र होमहवन यज्ञ, हरिनाम सप्ताह, त्रिपुरारी पौर्णिमा, गुरुपौर्णिमा इत्यादी कार्यक्रम होतात.


शिवभक्तीतून व्यसनमुक्ती
निळकंठेश्वर मंदिर परिसरात निवासाची व भोजनाची सोय उत्तम व मोफत केली जाते. देशभरातील भाविक दर्शनासाठी व व्यनमुक्तीसाठी येतात. त्यातूनच ही पुण्यभूमी म्हणजे ''शिवभक्तीतून व्यसनमुक्ती'' करणारे एकमेव ठिकाण म्हणून देशभरात प्रसिद्ध झाले. इथे विनामूल्य व्यसनमुक्तीचे कार्य आवरीत चालल्याने आजपर्यंत दोन कोटी लोक व्यसनमुक्त झाले आहेत. वृक्षारोपण, सांस्कृतिक कार्यक्रम, भजन स्पर्धा, वनऔषधांची विक्री, निर्माल्यातून खतनिर्मिती, गोशाळा, पर्यावरण संवर्धन, स्मृतिवन अंतर्गत
झाड तुमचं संवर्धन आमचं'' आदी उपक्रम होतात. व्यसनमुक्तीच्या कार्याची दखल घेऊन हिंदू कल्चरल आणि एज्युकेशन फाउंडेशनने देवस्थानचे अध्यक्ष गुरुवर्य शिवदास भाऊंना ''राष्ट्रीय पातळीवरील हिंदुत्वाचे आधारस्तंभ '' पुरस्काराने सन्मानित केले.


मामांचा वारसा चालविणारे गुरुवर्य शिवदास सर्जे
गुरूवर्य सर्जेमामांच्या पश्चात आता त्यांचे सुपुत्र देवस्थानचे अध्यक्ष गुरुवर्य शिवदास सर्जे (भाऊ महाराज) देवस्थानचे काम पाहत आहेत. मामांच्या या कार्याला त्यांची मुले शिवदास सर्जे, कै. संतोष सर्जे, पत्नी शालिनी सर्जे तसेच मुली संगीता आगलावे व रेखा देशमुख व त्यांचा सर्व परिवार मोलाची साथ देत आहेत. सद्या गुरुवर्य शिवदास शंकरराव सर्जे (भाऊ महाराज) हे या कार्याचा कार्यभार सक्षमपणे सांभाळत मामांचा वारसा पुढे नेत आहेत. दरम्यान, भविष्यात अनाथ मुलांसाठी व निराधार वृद्धांसाठी आश्रमशाळा आणि रुग्णांसाठी रुग्णवाहिका उपलब्ध करून देण्याचा अध्यक्षांचा मानस आहे. कुठल्याही शासकीय निधी व आधाराशिवाय देवस्थानचे सामाजिक कार्य अविरत चालते.

येथे करा संपर्क
देवस्थानाविषयी अधिक माहितीसाठी खालील नंबरवर संपर्क साधावा. अन्नदान व गोपालन यासाठी ऑनलाइन अथवा प्रत्यक्ष भेटून देणगी देऊ शकता. स्टेट बँक ऑफ इंडिया - खाते क्र. 10735399764 -IFSC CODE: SBIN000215
फेडरल बॅंक - खाते क्र. 22150200001375 - IFSC CODE: FDRL0002215.
गुगल पे नं. 7722080110
Website: www.neelkantheshwardewasthanpune.com
Email:

info@neelkantheshwardewasthanpune.com
Mo. 9922425912
..........................
02321, 02323, 02322, 02325, 02326

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com