वेगरे येथे सरपंचपदासाठी तिरंगी लढत

वेगरे येथे सरपंचपदासाठी तिरंगी लढत

Published on

पिरंगुट, ता. ३ : वेगरे (ता. मुळशी) येथील ग्रामपंचायतीचे सरपंचपद सर्वसाधारण स्त्री या जागेसाठी राखीव असून, रोशनी संतोष कानगुडे या सीए झालेल्या उमेदवार सरपंचपदाची निवडणूक लढवीत आहेत. त्यांच्या विरोधात रखमाबाई मारुती कोकरे व राजश्री रामदास मरगळे यांनी उमेदवारी अर्ज दाखल केल्याने येथील सरपंचपदाची निवडणूक तिरंगी होत आहे.
या ग्रामपंचायतीच्या एकूण तीन वॅार्डमधील सात जागांसाठी एकूण १३ उमेदवार रिंगणात आहेत. वेगवेगळ्या वॉर्डमिळून एकूण तीन पॅनेल निवडणूक रिंगणात उतरले आहेत. श्री सोनभैरवनाथ कोंडजाईमाता ग्रामविकास परिवर्तनचे नेतृत्व माजी सरपंच भाऊ मरगळे हे करीत आहेत. श्री सोनभैरवनाथ ग्रामविकास पॅनेलचे नेतृत्व नवनाथ कानगुडे; तर वेगरे नवनिर्माण ग्रामविकास पॅनेलचे नेतृत्व सतीश बावधाने हे करत आहेत.
सरपंचपदासाठी श्री सोनभैरवनाथ कोंडजाईमाता पॅनेलकडून रखमाबाई मारुती कोकरे, श्री सोनभैरवनाथ ग्रामविकास पॅनेलकडून रोशनी संतोष कानगुडे; तर वेगरे नवनिर्माण पॅनेलकडून राजश्री रामदास मरगळे आदी तीन उमेदवारांत सामना होत आहे.
वॉर्ड क्रमांक एकमधून तीन जागांसाठी पाच उमेदवार रिंगणात असून, या वॉर्डमधील सर्वसाधारण या एका जागेसाठी श्री सोनभैरवनाथ कोंडजाईमाता पॅनेलचे कृष्णा ठकू बावधाने व वेगरे नवनिर्माण पॅनेलचे बाळू गंगाराम बावधाने यांच्या सरळ लढत होत आहे. याच वॉर्डात सर्वसाधारण स्त्री या दोन जागांसाठी श्री सोनभैरवनाथ कोंडजाईमाता पॅनेलच्या माधुरी मारुती ढेबे, वेगरे नवनिर्माणच्या सुनीता भाऊ कोकरे व सुनीता शंकर कोकरे यांच्यात लढत होत आहे.
वॉर्ड क्रमांक दोनमधून दोन जागांसाठी चार उमेदवार रिंगणात असून, या वॉर्डमधील सर्वसाधारण या एका जागेसाठी श्री सोनभैरवनाथ कोंडजाईमाता पॅनेलचे मलिक महादेव कोकरे व वेगरे नवनिर्माण पॅनेलचे भाऊ तानाजी कोकरे यांच्यात सरळ लढत होत आहे. याच वॉर्डात सर्वसाधारण स्त्री या जागेसाठी श्री सोनभैरवनाथ कोंडजाईमाता पॅनेलच्या रंजना सदाशिव ढेबे; तर वेगरे नवनिर्माण पॅनेलच्या संगीता सतीश बावधाने यांच्यात दुरंगी लढत होत आहे.
वॉर्ड क्रमांक तीनमधूनही दोन जागांसाठी चार उमेदवार रिंगणात असून, या वॉर्डमधील सर्वसाधारण या एका जागेसाठी श्री सोनभैरवनाथ कोंडजाईमाता पॅनेलचे राजेंद्र तानाजी गुंड व सोनभैरवनाथ ग्रामविकास पॅनेलचे नवनाथ मारुती कानगुडे यांच्यात सरळ सामना होत आहे. याच वॉर्डात नागरिकाचा मागास प्रवर्ग स्त्री या एका जागेसाठी श्री सोनभैरवनाथ कोंडजाईमाता पॅनेलच्या मंगल पांडुरंग मरगळे; तर वेगरे नवनिर्माण पॅनेलच्या मंगल तानाजी कोकरे यांच्यात दुरंगी लढत होत आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.