घोटावडे येथील 
अपघातात एकाचा मृत्यू

घोटावडे येथील अपघातात एकाचा मृत्यू

पिरंगुट, ता. २ : घोटावडे (ता. मुळशी) येथील झालेल्या अपघातात एकाचा मृत्यू झाला आहे. ॲन्थोनी भरत एल (रा. हिंजवडी फेज १. मूळ रा. तमिळनाडू) असे मयत व्यक्तीचे नाव आहे.
ही घटना शुक्रवारी (ता.३१) मे रात्री साडेअकराच्या सुमारास घडली. याबाबत इंद्रनील दिलीप रॉय (वय २७ , रा. हिंजवडी फेज १) यांनी रविवारी (ता.२) जून पौड पोलिसांत फिर्याद दाखल केली आहे. पौड पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शुक्रवारी (ता.३१) रात्री साडेअकराच्या सुमारास घोटावडे (ता.मुळशी) येथील राजयोग हॅाटेलजवळ ही घटना घडली. ॲन्थोनी व फिर्यादी इंद्रनील हे दोघेजण मोटरसायकलवरून जात होते. अॅन्थोनी चालवीत होता. यावेळी ट्रक व मोटारसायकलच्या अपघात दोघेही रस्त्यावर पडले. त्यात ॲन्थोनी याच्या डोक्याला गंभीर दुखापत झाल्याने त्याचा मृत्यू झाला, तर फिर्यादी इंद्रनीलच्या हाता पायाला दुखापत झाली. पोलिस निरीक्षक मनोजकुमार यादव यांच्या मार्गदर्शनाखाली पुढील तपास सुरू आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com