मुलखेडला साठ शेतकऱ्यांकडून बिजप्रक्रिया पूर्ण

मुलखेडला साठ शेतकऱ्यांकडून बिजप्रक्रिया पूर्ण

पिरंगुट, ता. ३ : मुलखेड (ता.मुळशी) येथील एकाच वेळी साठ शेतकऱ्यांनी सोयाबीन उगवण क्षमता आणि भात व सोयाबीन जैविक बीजप्रक्रिया पूर्ण केली. येथील शेतकऱ्यांनी दिलेल्या उत्स्फूर्त प्रतिसादामुळे जिल्ह्यातील हा पहिलाच अनोखा उपक्रम ठरला आहे. कृषी विभागाने खरीप हंगाम उपक्रमांतर्गत उत्पादन वाढविण्यासाठी कार्यक्रमाचे आयोजन केले होते.

कृषी सहाय्यक मनीषा शिरसाठ यांच्या मार्गदर्शनाखाली बीजप्रक्रिया उपक्रम राबविण्यात आला. यावेळी खरीप हंगाम पूर्व प्रशिक्षण घेण्यात आले. यावेळी कृषी विभागाच्या योजनांसह फळबाग लागवड, हुमणी नियंत्रण सापळा महत्त्व, भातासाठी गादीवाफे रोपवाटिका, बीजप्रक्रिया,चारसूत्री एस. आर. टी. लागवड, सोयाबीन लागवड सुधारित तंत्रज्ञान, जीवामृत आदींबाबत तालुका कृषी अधिकारी व कृषी सहाय्यकांनी सविस्तर मार्गदर्शन केले.
ग्रामपंचायत सदस्य श्रीकांत तापकीर म्हणाले , ‘‘गेल्या एक वर्षापासून मुलखेडच्या शेतकऱ्यांमध्ये शेती करण्याबाबत दृष्टिकोन बदलला आहे. यामार्गदर्शनचे सगळे श्रेय कृषी सहाय्यक मनीषा शिरसाठ यांना जाते. एकाच वेळी साठ शेतकऱ्यांनी उगवण क्षमता चाचणी व बीजप्रक्रिया करणे जे अशक्यप्राय काम आम्ही त्याच्या मुळेच करू शकलो.’’

यंदाच्या खरीप हंगामात शेतकऱ्यासाठी भात व सोयाबीन पिकांसाठी कृषी विभागाकडून उगवण क्षमता चाचणी व बीजप्रक्रिया मोहीम सुरू आहे. शेतकऱ्यांना याचा फायदा होऊन उत्पन्नात नक्कीच वाढ होण्याच्या दृष्टीने कृषी विभाग प्रयत्न करत आहे.
-मनीषा शिरसाठ, मुलखेड विभाग, कृषी सहाय्यक

03267

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com