भूगावमधून  दोन मुलांसह आई  बेपत्ता

भूगावमधून दोन मुलांसह आई बेपत्ता

Published on

पिरंगुट, ता. २ : भूगाव (ता. मुळशी) येथील माताळवाडी फाटा येथून लहान मुलगा, मुलगी व त्यांची आई, असे तिघेजण बेपत्ता झाले आहेत. मनीषा कैलास शिंदे (वय ३०), मुलगी शिवन्या कैलास शिंदे (वय ३) व मुलगा चेतन्य कैलास शिंदे (वय ४ महिने) (सर्व रा. सुर्वेनगर, माताळवाडी फाटा, भूगाव, ता. मुळशी) अशी बेपत्ता झालेल्यांची नावे आहेत.

हे तिघेजण मंगळवार (ता. २५) जूनपासून बेपत्ता झाले आहेत. याबाबत मनिषाचे पती कैलास बाळू शिंदे (वय ४१) यांनी पोलिसात माहिती दिली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, भूगाव येथील माताळवाडी फाटा येथून मुलगा, मुलगी व त्यांची आई मनिषा असे तिघेजण मंगळवारपासून बेपत्ता झाले आहेत. मनिषा शिंदे यांचा रंग गोरा, चेहरा उभट, डोळे घारे, बांधा मध्यम, केस लांब अशा वर्णनाच्या असून त्यांनी हिरव्या रंगाचा पंजाबी ड्रेस परिधान केलेला आहे. त्यांची मुलगी शिवन्या हिचा रंग सावळा, चेहरा गोल असून तिने अंगात टीशर्ट घातलेला आहे. मुलगा चैतन्य त्याचा रंग गोरा, चेहरा गोल आहे. संबंधित वर्णनाच्या व्यक्ती कोणाला आढळल्या तर पौड पोलिस ठाण्याच्या हवालदार अनिता रवळेकर यांच्याशी ९१३०५४१०२६ या क्रमांकावर संपर्क साधण्याचे आवाहन केले आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.