हेरिटेज शाळेत डॉक्टर्स डे साजरा

हेरिटेज शाळेत डॉक्टर्स डे साजरा

Published on

पिरंगुट, ता. ७ : कासार आंबोली (ता. मुळशी) येथील हेरिटेज इंटरनॅशनल स्कूलमध्ये डॉक्टर्स डे उत्साहात साजरा केला. डायबेटिस मुक्त भारत अभियानच्या डॉ. मोनिका मोरे यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. यावेळी विद्यार्थ्यांमधील मधुमेह व स्थूलपणा या विषयावर संवाद साधला. आहारतज्ज्ञ दिशा गांधी यांनी विद्यार्थ्यांमधील निरोगी जीवनशैली, आरोग्याची काळजी व जागरूकता, ताजे घरगुती अन्नाचे महत्त्व आदीबाबत माहिती दिली. त्यानंतर, मुख्य विपणन अधिकारी भूषण यंदे यांनी मानसिक आणि शारीरिक आरोग्याबद्दल आणि या काळात सकारात्मक कसे राहायचे याबद्दल मार्गदर्शन केले. शाळेच्या प्राचार्या डॉ. रेणू पाटील यांनी मनोगत व्यक्त केले. संस्थेचे संस्थापक अध्यक्ष कृष्णा भिलारे, सचिव संगीता भिलारे, संचालक कुणाल भिलारे तसेच यशश्विनी भिलारे यांनी डॉक्टरांशी व विद्यार्थ्यांशी संवाद साधला.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.